खलिस्तानी चळवळ आणि शीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने एक नवा व्हिडिजो जारी केला आहे. त्याने १९ नोव्हेंबर रोजी एअर इंडिया विमानावर हल्ला करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. (वाचा संपूर्ण बातमी)
एल्विश प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद-विवाद सुरु झाला आहे. उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरुन संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. त्यांना सकाळी उठून आरोप करण्याव्यतरिक्त दुसरं काम नाही, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना शनिवारी दिवाळी गिफ्ट दिले. पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी पाच वर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गरीब कुटुंबियांना पुढील पाच वर्ष मोफत शिधा दिला जाणार आहे. माहितीनुसार, ८० कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ होत आहे.
अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आंदोलनाच्या दरम्यान त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. आपल्याबाबत गैरसमज पसरवला जात आहे असं म्हणत त्यांनी जरांगेंची भेट घेणार असल्याचं म्हटलं होतं.
महाड येथील कंपनीत आग लागल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत ७ मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याप्रकरणावरुन मनसेने मंत्री उदय सामंत यांचा राजीनामा मागितला आहे. कंपनी औद्योगिक नॉर्म पूर्ण करत नव्हती. हे तपासले जात नाही असं म्हणत मनसेने टीका केली.
नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. कोचीमधील आयएनएस गरुड या हवाई स्टेशनच्या धावपट्टीवर चेतक हेलिकॉप्टर कोसळले.
बिहारनंतर आता आंध्र प्रदेशात जातनिहाय जनगणना होणार आहे. आंध्र प्रदेशच्या कॅबिनेटने जातनिहाय जनगणना करण्याला मंजुरी दिली आहे. आंध्राचे मुख्यमंत्री वाय एस जयनमोहन रेड्डी यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे.
शरद पवार गटाच्या आमदारांनी विधीमंडळाला उत्तर दिलं आहे. सात दिवसात उत्तर देण्याची नोटीस विधानसभा अध्यक्षांनी बजावली होती. पवार गटाने वकीलामार्फत नोटीशीला लेखी उत्तर दिलं आहे. शरद पवार गटातील 10 आमदारांना नोटीस आली होती.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर सांगलीत कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदी शोधण्यासाठी नवीन कक्ष सुरू झाला आहे. सोमवारी शिंदे समितीची सर्व जिल्ह्यातील समिती प्रमुखांसोबत बैठक होणार असून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदी शोधण्याचं काम युुद्ध पातळीवर सुरू आहे.
आदित्य ठाकरे 7 आणि 8 नोव्हेंबरला दोन दिवसांचा कोकण दौऱ्यावर असणार आहेत.
भाजप आमदार नारायण कुचेंसमोर आंदोलकांची घोषणाबाजी करण्यात आली. बदनापूर येथे मराठा आंदोलकांनी हा रोष व्यक्त केला आहे.
संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोवर्धंन शर्मा यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले आहेत. दुपारी २ वाजता गोवर्धंन शर्मा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
पर्यटन आणि रोजगार वाढीसाठी मुख्यमंत्री दौरा करणार आहे. बांबू लागवडीच्या महत्वाकांक्षी योजनेचा लवकरच शुभारंभ होणार आहे. पाशा पटेल यांच्या संकल्पनेतून ही योजना हाती घेण्यात येत आहे.
मनरेगा योजनेअंतर्गत जे पात्र शेतकरी आहे आणि ज्यांची जमीन दोन हेक्टरपेक्षा कमी आहे त्यांना बांबू लागवडीसाठी हेक्टरी ६ लाख ८९ हजार रुपयांचे अर्थसहाय्य सरकार देणार आहे.तीन वर्षानंतर पडीक जमिनीतून उत्पन्नाचे साधन शेतकऱ्यांसाठी तयार होईल. जमिनीची धूप थांबेल, पूर, लॅण्ड स्लाईड सारख्या आपत्ती नियंत्रणात ठेवता येतील. बांबूपासून अनेक बाय प्रोडक्ट तयार करणे शक्य होईल. त्यामुळे या भागाच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे.
महाडमधील कंपनी स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. कंपनीच्या गेटवर कुटुबियांनी आक्रोश केला आहे. काल ७ तर आज शोधकार्य सुरू असताना २ मृतदेह सापडले आहेत.
नेपाळ पुन्हा एकदा भूकंपाच्या तडाख्याने हादरले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या भूकंपामुळे नेपाळमध्ये आतापर्यंत 129 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सरकरचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल झालं आहे. संदीपान भुमरे, मंगेश चिवटे आणि सहकारी मनोज जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झालेत. राज्य सरकारने काढलेला जीआर मनोज जरांगे यांना दिला आहे. सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांच्या तब्येतीची करणार विचारपूस करण्यात आली आहे.
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.