कानपुरमध्ये काही दिवसांपुर्वी निवृत्त मुख्याध्यापकांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात तपास करणाऱ्या NIAने दोघांना अटक केली.
तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या 'सनातन धर्माचा नायनाट झाला पाहिजे' या विधानावर प्रतिक्रिया देताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "मला तमिळनाडूच्या लोकांबद्दल खूप आदर आहे, पण माझी त्यांना नम्र विनंती आहे की, प्रत्येक धर्माच्या त्यांच्या वेगळ्या भावना आहेत. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, लोकशाही माननारा देश आहे आणि त्याच बरोबर विविधतेत एकता हेच आपले मूळ आहे.म्हणूनच सनातन धर्माचा मी आदर करते. आपण मंदिर,मशीद,चर्च सर्वत्र जातो.आपण यात सहभागी होता कामा नये. 'निंदा' म्हणण्याऐवजी माझी सर्वांना नम्र विनंती आहे की मोठ्या वर्गाला किंवा लहान वर्गाला दुखावणारी कोणतीही टिप्पणी करू नये. विविधतेतील एकता आपण लक्षात ठेवली पाहिजे.
इजिप्त आणि भारत या दोन देशांच्या लष्करांमध्ये एक्सरसाईज ब्राईट स्टार हा युद्धअभ्यास इजिप्तमध्ये पार पडत आहे. या अभ्यासात दोन्ही देश आपल्या युद्ध कौशल्याचे प्रदर्शन करणार आहेत.
तमिळनाडूचे मंत्री उदयनीधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यावर खासदार चिराग पासवान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त म्हणाले की, "हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे की, आपण २१व्या शतकात वावरत असताना असे विषय राजकीय चर्चांमध्ये येत आहेत. अशा गोष्टींमुळे समाजात तेढ निर्माण होते. कोण कोणता धर्म पाळतो किंवा मानत नाही, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपल्या देशात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही लोकांच्या भावना दुखावत आहात. विरोधकांची तिसरी बैठक झाल्यावर असं विधान समोर आल्याने मी आश्चर्यचकित झालोय."
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "काँग्रेस आणि इंडिया आघाडीने हिंदू धर्माचा अपमान केला, त्यांनी माफी मागावी."
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधला आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. यासाठी पोलिसांना जबाबदार धरण्यात आले होते. यावर राज ठाकरेंनी मराठा आंदोलकांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, "लाठीचार्जसाठी पोलिसांना दोष देऊ नका, ज्यांनी आदेश दिला होता त्यांना दोषी धरा."
मराठा आरक्षणासाठी आंदोलन समन्वयक मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की सरकारने जुनाचं पाढा वाचून दाखवला आहे.
जालन्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी या जमावावर लाठीचार्ज करण्यात आला. यावर विरोधकांनी आरोप लावला होता की हा आदेश गृहमंत्री आणि मुख्यमंत्रीचं देऊ शकतात. या आरोपला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,"असा आदेश आम्ही देऊ शकतो का? मराठा समाजाच्या आंदोलन करत आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज करा अस आम्ही करू शकतो का?"
सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषदेत बोलत आहेत. यावेळी त्यांनी विरोधांना लक्ष्य करत वक्तव्य केलंय. ते म्हणाले की, "माजी मुख्यमंत्री तिकडे गेले. तुम्ही त्या पदावर होतात तेव्हा तुमचे हात कोणी बांधले होते निर्णय घ्यायला"
जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्जची कारवाई झाल्यानंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसीची जाळपोळ करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की बसेस जाळणं हे राज्याचं नुकसान आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जालन्यात झालेल्या घटनेबद्दल म्हणाले की जालन्यात जे झालं, ते व्हायला नको होतं.
मराठा आरक्षण आणि मराठा विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठीचे निर्णय महायुतीच्या काळात झाले, असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जालन्यात जे काही झाले ते दुर्दैवी आहे, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. मुख्यमंत्री असताना अनेक आंदोलन झाली पण बळाचा वापर झाला नाही. ज्यांना त्रास झाला त्यांची माफी मागतो. दोषींवर कारवाई होणार मात्र राजकारण योग्य नाही, काही पक्ष तस करत आहेत. लाठीचार्ज करण्यासाठी आदेश एस पी डीऐसपी यांच्या स्तरावर होतो असे फडणवीस म्हणाले.
मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून जरांगेंशी चर्चा केली आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी जाणार आहेत.
२३ वर्षीय हवाई सुंदरीची (एअर हॉस्टेस) हत्येच्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. हत्येप्रकरणी इमारतीत सफाईच काम करणाऱ्या इसमाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. मरोळ येथील राहत्या घरी मृतदेह सापडला होता. गळा चिरून रूपल ओगरेची हत्या करण्यात आली होती.
जळगावच्या सभेनंतर शरद पवारांनी एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. दहा तारखेला मुंबईत होणाऱ्या या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी आमदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मतदारसंघनिहाय पुन्हा चाचपणी होणार आहे. सप्टेंबर संपेपर्यंत महाविकास आघाडी राज्यातील महत्त्वाच्या जागांवर चर्चा पूर्ण करणार आहे. तर ऑक्टोबर च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सर्व अहवाल 'इंडिया'च्या कोअर कमिटीकडे जाणार आहे.
मराठा समाज आंदोलन चांगलंच पेटलं असून कोल्हापुरात देखील एसटी वाहतूक बंद पडली आहे. कोल्हापुरातून सातारा-पुणे-मुंबई साठी जाणाऱ्या एसटी बंद करण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यात आंदोलन असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. मराठा समाजाच्या उद्रेकानंतर ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची महत्वाची बैठक होणार असून या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील रवाना झाले आहेत. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फुलंब्री: येथे अंतरवाली सराटी येथील घटनेचा निषेध म्हणून मराठा समाज बांधवांनी तिरडीवर टरबूज ठेवून सरकारचा जाहीर निषेध करित अंत्ययात्रा काढली.
उदयनिधी स्टॅलिन यांना महाराष्ट्रात येण्यापासून बंदी घालावी अशी मागणी मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. स्टॅलिन यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर लोढा यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्रातील वातावरण बिघडू देणार नाही. तसेच सनातन धर्म संपवण्याचे वक्तव्य हिंदूचा अपमान करणारे असून स्टॅलिन विधान मागे घेत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रात येऊ देणार नाही असा थेट इशारा लोढा यांनी उदयनिधी स्टॅलिन यांना दिला आहे.
कोव्हिड काळाील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी पालिका अधिकारी आणि इतर आरोपींना २ कोटी रुपये मिळाल्याचा दावा आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. बेकायदेशीर पणे खिचडी बनवण्याचे कंत्राट मिळवून त्याचे अनधिकृत सब कॅट्रॅक्टिंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच वाटप करण्यात आलेली खिचडीची पाकिटे वजनाने कमी असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यासह बाळा कदम, राजू साळुंखे यांच्यासह फोर्सवन मल्टिसर्वीसेस भागिदारी आणि स्नेहल कॅटरर्स तसेच माजी सहाय्यक पालिका आयुक्त आणि पालिकेचे इतर कर्मचारी आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींच्या बॅंक खात्यांची छाननी केल्यानंतर त्यांना चौकशीला बोलवलं जाणार आहे. कंत्राट मिळवून देण्यासाठी पाटकरांना सल्लागार सेवेच्या नावाखाली ४५ लाख रूपये मिळाल्याचा दावा देखील आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे.
पुण्यातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
मराठा आंदोलकांनी दोन वेळा राज ठाकरेंचा ताफा अडवला आहे. मी आंदोलकांशी संवाद साधल्यानंतर बोलेन असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आंदोलकांची भेट घेण्यासाठी जालन्याला रवाना झाले होते. दरम्यान त्यांची भेट घेण्यासाठी मराठा आंदोलकांनी संभाजीनगर जालना मार्गावर अडवल्याचा प्रकार समोर आला. राज ठाकरे यांनी देखील गाडीतून खाली उतरून आंदोलकांची भेट घेतली.
"नगर जिल्ह्यातल्या राजकारणातील आणखी एक पॉवर फुल पुतण्या आज शिवसेनेत! साजन पाचपुते आज वाजत गाजत शिवसेनत प्रवेश करणार! मातोश्री 5 वाजता." असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर मराठा समाजाच आंदोलन चिघळल्याचे पाहयला मिळाले. या घटनेवरून आता राजकीय वातावरण देखील तापले आहे.
यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे जालन्यासाठी रवाना झाले आहेत. सकाळी १० च्या सुमारास ते जालन्यात पोहचतील. या दरम्यान राज ठाकरे मराठा समाज बांधवांची भेट घेणार आहेत, काल देखील त्यांनी फोनवरुन आंदोलन कर्त्यांशी संवाद साधला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.