Marathi News : राज्यात राजकीय गोंधळ, दिवसभरात घडलेल्या प्रत्येक बातमीचे अपडेट, एका क्लिकवर वाचा

Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

उपमुख्यमंत्री अजित पवार देवगिरी मधून निघाले...

उपमुख्यमंत्री अजित पवार देवगिरी मधून निघाले आहेत. अजित पवार वर्षा बंगला येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहेत.

वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या बैठकीला सुरूवात...

मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी शिवसेनेचे मंत्री, नेते, खासदार आणि आमदारांची बैठक सुरू होत आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष संघटना राज्यातील गाव, वाडी वस्ती पातळींवर मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच शिवसेना पक्ष कार्यकारणीने राज्यातील जिल्हा निहाय संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना एक शिवसेना मंत्री जोडून जनतेच्या विकासांची कामं वेगाने पूर्ण करण्यासांठी सहकार्य करणार आहेत. येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी शिवसेना संघटना बळकट करण्यासाठी आतापासूनच शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

अजित पवार गटाची मागील १ तासापासून ताजमध्ये बैठक सुरू

ताज हॉटेल येथे अजित पवार गटाची मागील १ तासापासून बैठक सुरूच


MET येथील कार्यक्रमानंतर सर्व आमदारांना जेवणासाठी हॅाटेलमध्ये आणण्यात आले

कोविड केअर सेंटर कथित घोटाळ्या प्रकरणी ईडीचे छापेसत्र सुरूच

कोविड केअर सेंटर कथित घोटाळ्या प्रकरणी ईडीचे छापेसत्र सुरूच

ईडी मुंबईतील 10 विविध ठिकाणी सर्च ऑपरेशन करत आहे

शिंदे गटाची महत्वाची बैठक, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

पक्ष व संघटनात्मक बांधणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी त्यांच्या पक्षातील सर्व मंत्री आमदार व खासदार महत्त्वाचे नेते यांची आज बैठक बोलावली आहे. थोड्याच वेळात शिवसेनेचे सर्व आमदार मंत्री व खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत

सोलापुरातील भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश

सोलापुरातील भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश, भाजपने अजित पवार यांना सत्तेत घेतल्या अने कार्यकर्ते नाराज आहेत.

अजित पवार यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून निवड, निवडणूक आयोगातील याचिकेत काय?

अजित पवार यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून निवड

अजित पवार यांच्या गटाची निवडणूक आयोगाला माहिती

40 आमदारांच्या प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाला सादर

30 जूनला आमदारांनी अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्ष केल्याचा पत्रात उल्लेख

निवडणूक आयोगाची माहिती

राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून अजित पवार यांची आधीच निवड, गोंधळ काय?

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याची दोन दिवस आधीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या याचिकेत ४० जणांच्या सह्या आहेत. याची माहिती कुणालाही दिली नाही.

जे गेले जाऊ द्या, आपण…; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास

याआधी जे सोडून गेले ते पडले. पक्षात नवीन चेहरे, तरुण आले. जे गेले जाऊ द्या. सुखाने राहू द्या. आपण एकत्र आहोत तोपर्यंत नवीन कर्तुत्व सहकारी टीम तयार करू असा विश्वास शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना वाय बी चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या सभेत दिला आहे.

अजित पवार गटाच्या आमदांना ताज हॉटेलमध्ये हलवलं! अजित पवारही सोबत

अजित पवारांच्या मुंबईतील सभेनंतर मोठी अपडेट समोर येत आहे. या सभेनंतर लगेच अजित पवार गट आमदारांना वांद्रे येथील ताज लँड एन्ड या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. या आमदारांच्या सोबत स्वतः अजित पवार देखील यावेळी उपस्थित आहेत.

कोण आला रे कोण आला...मोदी शहांचा बाप आला....

शरद पवारांच्या भाषणाआगोदर यशवंतराव चव्हाण सेंटर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोण आला रे कोण आला...मोदी शहांचा बाप आला.... अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडलं

तुमचे नशीब तुम्हाला लख लाभो, सुप्रिया सुळेंनी अजितदादाला फटकारले

सगळे हताश झाले होते काय होणार

बापाला घरी बसा म्हणणाऱ्या पोरापेक्षा आम्ही मुली बऱ्या: सुप्रिया सुळे यांचं अजित पवारांना उत्तर, रतन टाटा या वयातही काम करतात, अमिताभ बच्चन 80 उलटल्यानंतरही जाहिरातीत दिसतात याचाही दाखला सुप्रिताताईंनी भाषणात दिला आहे.

बाकी काहीही ऐकून घेऊ.. बापाचा नाद करायचा नाही - सुप्रिया सुळे.

दासू वैद्य यांची कविता आहे. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी लढणाऱ्या लेकीसाठी माझं बाप माझी बुलंद कहानी…हा माझा बाप तुमचा जास्त आहे. बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही. बाकी काहीही ऐकून घेऊ..

महिला आहे, छोटसं बोललं तरी टचकन डोळ्यात पाणी येते. जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खेचून तीच अहिल्या होते, तिच जिजाऊ होते असे सुप्रिया सुळे म्हणल्या

जेलमध्ये जाईल पण पक्षाशी गद्दार करणार नाही - अनिल देशमुख

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सुरू असलेल्या शरद पवार गटाच्या सभेत अनिल देशमुख यांनी शरद पवारांना पाठिंबाजाहीर केला आहे. जेलमध्ये जाईल पण पक्षाशी गद्दार करणार नाही असं अनिल देशमुखांनी स्पष्ट केलं आहे. मी तुरुंगात होतो पवार साहेब आणि कुटुंबाने आम्हाला आधार दिला. कुटुंबाला आधार दिला. आपल्याला बरोबर उभे राहावे लागेल, असेही अनिल देशमुख म्हणाले.

 आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? अजित पवार स्पष्टच बोलले!

शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यांनी आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? असा थेट सवाल विचारत अप्रत्यक्षरित्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.

लोकांसमोर मला का व्हिलन केलं जातं आहे ते कळत नाही. आजही माझं ते दैवत आहे. नोकरील लागल्यावर ५८ व्या वर्षी रिटायर होतात. राजकीय जिवानात तर भाजपमध्ये ७४ वर्षांनंतर रिटायर केलं जातं. आता नवीन पीढी समोर येतेय. चुकलं तर अजित तुझं चुकलं असं सांगा, चुक मान्य करून दुरुस्त करून पुढं जाऊ. पण कोणासाठी चाललंय हे? असं चित्र का निर्माण केलं जात आहे. असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

... तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवार कडाडले!

भाजपसोबत जाण्यासाठी चर्चा करावी यासाठी आम्हाला पाठवलं होतं असे अजित पवार यावेळी म्हणाले. जर त्यांच्या भाजप सोबत जायचं नव्हतं तर आम्हांला का पाठवल? २०१७ ला सुद्धा वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. वरिष्ठांशी चर्चा झाली. समोर सुधीर मुनगंटीवार, फडणवीस , चंद्रकांत पाटील होते. मी कधीही महाराष्ट्राशी खोटं बोलणार नाही, खोटं बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही असे अजित पवार म्हणाले.

सकाळी पहाटे कामाला सुरवात करतो हे कशाकरिता…; अजित पवार कडाडले!

प्रशासनावर माझी पकड आहे की नाही हे महाराष्ट्र जाणतो. सकाळी पहटे कामाला सुरवात करतो हे कशाकरिता... की महाराष्ट्र पुढे जायला. हे माझ स्वप्न आहे असेही अजित पवार शपथविधीनंतर आयोजित पहिल्या सभेत म्हणाले.

साहेब आमचे श्रद्धस्थान आहेत..; अजित पवारांचं भाषण सुरू

एमईटी येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहेत. यावेळी त्यांनी ही वेळ आपल्यावर का आली. मी काम करत असताना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो घडलो . साहेब आमचे श्रद्धस्थान आहेत. आपण एखादा पक्ष का स्थापण करतो, लोकांना न्याय देण्यासाठी असेही अजित पवार म्हणाले.

मला २००४ साली एवढं मोठ महत्तवाच स्थान नव्हत. आम्ही कुणी कामात कमी आहोत का? कोणाचा आदर करायला कमी आहोत का? जनतेची हीच अपेक्षा असते की आमच्या लोकप्रतिनिधींनी काम करावं आणि मी तसचं काम करणार आहे, असेही अजित पवार म्हणाले.

अजित पवारांच्या साथीला पुत्र पार्थ अन् जय पवारांची उपस्थिती

मुंबईत होत असलेल्या अजित पवार गटाच्या सभेला अजित पवार यांची साथ देत त्यांची दोन्ही मुले देखील उपस्थित आहेत. पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही कार्यकर्त्यामध्ये उभे राहिल्याचे दिसून आले.

संख्या वाढतेय! आमदार दौलत दरोडा, राजू नवघरे शरद पवारांच्या पाठिशी

शरद पवार विरूद्ध अजित पवार सत्तासंघर्षात शरद पवारांना पाठिंबा वाढताना दिसत आहे. मुंबईत दोन्ही गटांच्या सभा सुरू असतानाच आमदार दौलत दरोडा, राजू नवघरे हे दोघे शरद पवारांच्या पाठिशी असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत १७ आमदारांनी शरद पवारांना पाठिंबा दर्शवला आहे.

शरद पवार आले! शिट्ट्यांनी दणाणून गेलं सभागृह

शरद पवार वायबी सेंटर येथील सभेच्या स्टेजवर दाखल होताच मोठा जल्लेष करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिट्यांनी सभागृह दणाणून सोडलं. दरम्यान शरद पवार या कार्यक्रमात नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार वाय बी प्रतिष्ठान येथे दाखल

शरद पवार वाय बी प्रतिष्ठान येथे दाखल झाले आहेत. शरद पवार कार्यक्रमस्थळी येताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत शरद पवार यांचे स्वागत करण्यात येत आहे.

छगन भुजबळ घामेघुम.. राष्ट्रवादीचा गमछा काढला...

एमईटी येथील सभेत नेते छगन भुजबळ यांचं भाषण सुरू असून भाषणादरम्यान बुजबळ घामेघुम झाल्याचे पाहायला मिळाले, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा गमछा काढून टाकला .

नव्या दमाने मजबुतीने आता पुढे वाटचाल करणार आहोत. कालच काही नियुक्त्या झाल्या अजून होणार आहेत येत्या काही दिवसात अजून होतील. अजित पवार बोलले होते पदाधिकारी नेमणूक झाली नाही काम कस करायचं ? कार्यकर्ते नसतील तर पक्ष काम करु शकत नाही. सांगून सुद्धा नेमणूक नाहीय जर होत नसेल तर मी जबाबदारी घेतो पक्षाची जबाबदारी घेतो असे भुजबळ म्हणाले.

"चला बाहेर व्हा.. " भाषण सुरू करण्यापूर्वी छगन भुजबळ भडकले

अजीत पवार यांच्या एमईटी येथील मेळाव्याला आतापर्यंत २९ आमदार पोहचले असून कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. यावेळी व्यसपीठावर शपथ घेतलेले नेते देखील उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. यादरम्यान छगन भुजबळ व्यासपीठावर गर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्याचे पाहायला मिळाले.

भुजबळ काय म्हणाले...

दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी सर्व आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. सगळ्यांना धक्का बसला. पण सगळी भाषणं होतील तसं सगळा उलगडा होईल. ४० पेक्षा जास्त आमदार आहेत, काही ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत, काही बाहेर आहेत. सगळ्या आमदारांच्या प्रतिज्ञापत्र यावर सह्या आहेत.

धनंजय मुंडेंसह काही आमदार ट्रॅफिकमध्ये अडकले

अजित पवार यांच्या बैठकीसाठी २८ आमदार दाखल झालेले आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या बैठकीला ९ आमदार दाखल झालेले आहेत. मात्र अद्याप धनंजय मुंडे आलेले नाहीत. ते ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं सांगितलं जात आहे.

शरद पवारांच्या बैठकीला आतापर्यंत पोहचले ९ आमदार, २ खासदार 

शरद पवारांच्या बैठकीसाठी वाय बी चव्हाण सेंटरवर पोहचलेले नेते -

आमदार

  1. अनिल देशमुख

  2. रोहित पवार

  3. राजेंद्र शिंगणे

  4. अशोक पवार

  5. किरण लहमाटे

  6. देवेंद्र भुयार

  7. बाळासाहेब पाटील

  8. अनिल देशमुख

  9. सुमन पाटील (रोहित पाटील आला म्हणजे त्या आल्या)

खासदार

  1. श्रीनिवास पाटील

  2. सुप्रिया सुळे

अजित पवार काय बोलणार? राज्याच्या नजरा 'एमईटी'कडे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी एमईटी येथे पोहचलेल्या अजित पवार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. व्यासपीठावर अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांचं आगमन झालं आहे. आज अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इतिहासात पहिल्यांना एकाचं पक्षाच्या पदाधिकारी, आमदार खासदारांच्या दोन बैठकी होत आहेत.

२० आमदार सोबत घेऊन अजित पवार एमईटी येथे दाखल 

अजित पवार यांच एम ई टी येथे आगमन झाले आहे. अजित पवार यांच्यासोबत जवळपास २० आमदार देवगिरी बंगल्यावरून निघाले होते. तर यापूर्वी एमईटी येथे आता जवळपास १२ आमदार आलेले आहेत, एमईटी कार्यक्रमाच्या ठिकाणी आधी झेंडावंदन होईल आणि त्यानंतर मेळाव्याला सुरूवात होणार आहे.

शरद पवारांच्या बैठकीला पोहचले 'हे' आमदार

शरद पवारांच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे आमदार वाय बी सेंटरला पोहचत आहेत. आतापर्यंत पोहचलेले आमदार

  • किरण लहमते

  • अशोक पवार

  • रोहीत पवार

  • देवेंद्र भुयार

  • राजेंद्र शिंगणे

  • अनिल देशमुख

  • प्राजक्त तनपुरे

चेंबूरमध्ये रस्ता खचला! ४० ते ५० गाड्या खड्यात कोसळल्या

मुंबईतील चेंबूर येथे मोठ्या प्रमाणात रस्ता खचल्याचे पाहायला मिळाले. हा खड्ड इतका मोठा आहे की यामध्ये ४० ते ५० दुचाकी अन् कार कोसळल्या आहेत. या घटनेनंतर आसपासच्या बिल्डींग रिकाम्या करण्यात आल्या आहेत. प्रियदर्शनी येथील वसंत दादा पाटील इंजिनियर कॉलेज समोरील राहूल नगर दोन इथे हा प्रकार घडला आहे.

 अजित पवारांच्या घरा बाहेरील बॅनरवरून 'शरद पवार' गायब

शरद पवारांनी फोटो वापरण्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरा बाहेर लावण्यात आलेल्या बॅनरवरून शरद पवार यांचा फोटो गायब झाला आहे. पक्षाची आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका न मानणाऱ्यांनी त्यांचे फोटो वापरण्यावर शरद पवार यांनी आक्षेप घेतला होता.

त्यानंतर आता यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी हा बॅनर लावला आहे

अजित पवारांच्या बंडनंतर शरद पवार यांच मोठं पाऊल; निवडणूक आयोगात...

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगात अर्ज करण्यात आला असून कोणत्याही गटाने पक्षावर दावा केला तर आमचं म्हणणं ऐकून घ्यावं असा अर्ज करण्यात आला आहे, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान अजित पवार यांच्या बंडनंतर शरद पवार यांच मोठं पाऊल मानलं जात आहे.

मुंबईतील बैठकीपुर्वीच सरोज अहिरे नाशिकला परतल्या

नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे नाशिकला परतल्या आहेत. आज शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांकडून मुंबईत बैठक बोलवण्यात आली असून त्यासाठी सर्व आमदार-खासदारांना मुंबईत येण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान अहिरे संध्याकाळी त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

दरम्यान अजित पवार गटाचे आमदार दिलीप वळसे पाटील आणि अमोल मीटकरी हे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत.

मुंबईत आज दोन्ही पवारांची बैठक! पदाधिकारी-कार्यकर्ते 'सिल्वर ओक'वर दाखल

सध्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे सिल्वर ओक वरती यायला सुरवात झाली आहे. सासवड, अकोल्यातुन पदाधिकारी व कार्यकर्ते हे सिल्वर ओक वरती दाखल होतं आहेत.

आज अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांकडून मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे. आज राष्ट्रवादीसाठी महत्वाचा दिवस आहे असून नेमके कुणाकडे किती आमदार हे आज स्पष्ट होणार आहे. मात्र त्याआगोदर कार्यकर्ते आणि पदाधिकारी सिल्वर ओक वर दाखल व्हायला सुरवात झाली आहे.

Ajit Pawar
Maharashtra Politics Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज? तडकाफडकी रद्द केला नागपूर दौरा, रात्रीतून परतले मुंबईला...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स देशासह

राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.