Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
esakal Breaking News
esakal Breaking News
Updated on

बीएमसी कर्मचाऱ्यांना २६ हजार बोनस

बीएमसी कर्मचाऱ्यांना २६ हजार दिवाळी बोनस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे बीएमसी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मार्गावर ओव्हर हेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचं सांगितलं जातंय. वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडला जाणार

दिल्लीतील वायू प्रदूषण अतिघातक स्थितीत पोहोचलं आहे. यापार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारने दिल्लीत २० तारखेच्या सुमारास कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी केली आहे. आयआयटी कानपूप संस्थेवर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

मुंबईत विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबईसह परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहे.

छगन भुजबळांवर शाईफेक होण्याची शक्यता

मंत्री छगन भुजबळांवर शाईफेक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. भुजबळांनी मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे.

श्रीमंतीचे शायनिंग मराठ्यांना दाखवू नका; जरांगे पाटलांची सावंतांवर टीका

मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्या मी पंचाग घेऊन बसलोय का? या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना काय वादळ दिसलंय हे माहिती नाही. गरीब मराठ्यांचं वाटोळं होत आहे. गौरगरिबांच्या अडचणी, वेदना काय असतात तुम्हाला कळणार नाही. श्रीमंतीचे बोळे घेतलेल्या तुम्हाला काय माहिती असं म्हणत त्यांनी टीका केली.

मुंबईतील काही भागात पावसाला सुरुवात, चेंबुरमध्ये मुसळधार

राज्यातील काही भागात पाऊस पडणार असण्याची सूचना हवामान विभागाने दिली होती. मुंबईतील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. चेंबुरमध्ये जोराचा पाऊस कोसळत आहे.

मराठा आरक्षणावर कायदेशीर सल्ला देण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना, सरकारने जीआर काढला

मराठा आरक्षणावर कायदेशीर सल्ला देण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. सरकारने यासंदर्भात जीआर काढला आहे.

एक्स्प्रेस वे वर घाटाजवळ जोरदार पाऊस

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे घाटाजवळ जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील काही तासांत राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

धनगर समाजासाठी शक्तीप्रदत्त समितीची स्थापना

धनगर समाजासाठी शक्तीप्रदत्त समितीची स्थापना करण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे. धनगर समाजाच्या विकासासाठी ही समिती काम करणार आहे.

ठाकरे गटाची गुरुवारी मातोश्रीवर बैठक

ठाकरे गटाची बैठक गुरुवारी मातोश्रीवर बोलावण्यात आली आहे. या बैठकीला सर्व नेत्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे. बैठकीत काय चर्चा होईल हे गुलदस्त्यात आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरूवात

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत छगन भुजबळ विरुद्ध शिंदे गटातील मंत्री असा पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटनसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखल

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटनसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखल झाले आहेत.

सातारा जिल्ह्यात अनेक भागात पावसाला सुरूवात

मायणी, कलेढोण, गारुडी, विखळे, पडळ, तरसवाडी, कान्हारवाडी, धोंडेवाडी, दातेवाडी, चितळी, मोराळे या भागात पावसाला सुरूवात झाली आहे.

कोर्टाच्या माध्यमातून OBC आरक्षण संपवण्याचा प्रयत्न- छगन भुजबळ

कोर्टाच्या माध्यमातून OBC आरक्षण संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओबीसीमध्ये जे आहेत त्यांना बाहेर ढकलण्याचं काम सुरू आहे, असं छगन भुजबळ यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ, कडेगावसह इतर भागात पाऊस सुरू

सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ, कडेगावसह इतर भागात पाऊस सुरू आहे. तर काही भागांमध्ये पहाटे पावसाला सुरूवात झाली. कवठेमहांकाळ तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस बरसला. तर सलगरे, बेळंकी, कामेरी परीसरात पावसाने हजेरी लावली आहे.

किशोरी पेडणेकर यांची आज ईडीकडून चौकशी

किशोरी पेडणेकर यांची आज ईडी चौकशी होणार आहे. कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना समन्स पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची आज चौकशी होणार आहे.

सांगली जिल्ह्यात बिळाशीसह आटपाडी, ढालगांव परिसरात पाऊस

सांगली जिल्ह्यात बिळाशीसह परिसरात पहाटे पाचला सुरू झालेला पाऊस जवळपास अर्धा तास बरसला. परिसरात अजूनही ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. आटपाडी तालुक्यात देखील तासभर रिमझिम पाऊस झाला. तर ढालगांव परिसरात आर्धा तासापासून जोरदार पाऊस सुरू आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्रात पुन्हा सुरु होणार संकल्प यात्रा


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्रात संकल्प यात्रा पुन्हा सुरू होणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात ५ तारखेपासून सुरु होणार संकल्प यात्रा

सगळ्या ४८ मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांची यात्रा जाणार

देवेंद्र फडणवीस महाजनदेश सारखी यात्रा काढणार

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रा २ची तयारी सुरू

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रा २ची तयारी सुरू करण्यात आली आहे. गुजरात ते अरुणाचल प्रदेश दरम्यान ही यात्रा असणार आहे. ही यात्रा पूर्ण पदयात्रा नसणार आहे. काही ठिकाणी वाहनातून प्रवास केला जाणार आहे. गुजरात मधील पोरबंदर पासून यात्रेला सुरुवात होणार तर अरुणाचल प्रदेशातील परशुराम कुंड इथं यात्रेचा समारोप होण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला ही यात्रा होण्याची शक्यता आहे.

पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या परिसरात जमावबंदी

पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या परिसरात जमावबंदी करण्यात आली आहे. हाणामारी, मोर्चांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आदेश दिले आहेत. ७ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत जमावबंदी लागू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसापासून विद्यापीठात हाणामारीचे प्रकार वाढल्याने पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आदेश काढले आहेत.

मंत्रिमंडळाची आज दुपारी १ वाजता बैठक, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आज एका तास बंद, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडी चौकशी, सरकारचे शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांची भेट, देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.