Marathi News Update:महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Murder
Murderesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगरमध्ये भररस्त्यात गोळीबार, एक जण जागीचं ठार

छत्रपती संभाजीनगरमध्ये भररस्त्यात गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत एक जण जागीचं ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे. ही घटना पैशांच्या वादातून झाल्याचं सांगितल्या जातंय. फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

हरी नरकेंच्या अंत्यदर्शनावेळी सुषमा अंधारेंना अश्रू अनावर

प्रा. हरी नरकेंच्या अंत्यदर्शनाच्यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी हरी नरकेंच्या आठवणींना उजाळा दिला.

मुंबई विद्यापीठाची सेनेट निवडणुक जाहीर, दहा जागांसाठी होणार निवडणूक

मुंबई विद्यापीठाच्या सेनेट निवडणूकीची तारीख जाहीर करण्यात आलीये. ही निवडणूक १० सप्टेंबरला घेतली जाईल व १३ सप्टेंबरला निकाल घोषित केला जाईल.

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची कारवाई फास्ट ट्रॅकवर

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची कारवाई फास्ट ट्रॅकवर करण्यात आली आहे. लवकरच यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून निर्णय घेतला जाऊ शकतो.

जर्मन वायुसेनेच्या प्रमुख्यांनी घेतली भारतीय वायुसेनेच्या प्रमुखांची भेट

जर्मनीच्या वायुसेना प्रमुखांनी भारतीय वायुसेनेचे प्रमुख व्हीआर चौधरी यांची भेट घेतली आहे. पसस्पर संबंध मजबूत व्हावेत आणि दोन्ही वायुसेनांना फायदा व्हावा यासाठी ही भेट घेण्यात आली होती.

विश्वचषक २०२३मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, 'या'दिवशी खेळवला जाणार सामना

एकदिवसीय विश्वचषक २०२३ यंदा भारतात खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याची आतुरता सर्वांना लागून आहे. मात्र, बऱ्याच वेळा सामन्याची तारीख बदलल्यानंतर आता हा सामना १४ ऑक्टोबर या दिवशी अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे.

प्रा. हरी नरके यांचे पार्थिव घेऊन छगन भुजबळ पुण्याकडे रवाना

प्रा. हरी नरके यांचे पार्थिव घेऊन छगन भुजबळ पुण्याकडे रवाना झाले आहेत. पुण्यातल्या वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

जर्मन दूतावासाकडून भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिजाची प्रक्रिया जलद

जर्ममीच्या दूसावासाकडून भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिजाची प्रक्रिया जलद करण्यात आली आहे.

नागपूरातील फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन

नागपूरातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येत आहे.

राहुल गांधींच्या अडचणीत वाढणार? भाजपच्या २२ महिला खासदारांचं अध्यक्षांना पत्र

राहुल गांधींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजपच्या २२ महिला खासदारांनी अध्यक्षांना पत्र लिहलं आहे.

रायगड पोलिसांनी बोटीतून ४६ हजार लिटर अवैध डिझेल केले जप्त

रायगड पोलिसांनी दोन बोटीतून ४६ हजार लिटर अवैध डिझेल जप्त केले असून मांडवा किनारी पोलिसांच्या हद्दीत नऊ जणांना अटक केली आहे. जप्तीची एकूण किंमत 1.03 कोटी रुपये आहे

नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा ठेवावी - नाना पटोले

मोदींनी मणिपूर वर चर्चा केली पाहिजे. जे पाप केलं त्यावर चर्चा केली पाहिजे. गरीबी आणि महागाई बद्दल बोललं पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा ठेवावी, असे नाना पटोले म्हणाले.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसची मोठी खेळी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी पुन्हा एकदा देश पिंजून काढणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर काँग्रेसने राहुल गांधी यांच्या दुसऱ्या भारत जोडो यात्रेची घोषणा केली आहे. ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गुजरातपासून निघणार आहे. गुजरात ते मेघालय अशी ही यात्रा निघणार आहे.

मरीन लाइन्स येथील मेट्रो सिनेमा स्पोर्ट शोरूमजवळ भीषण आग

मरीन लाइन्स येथील मेट्रो सिनेमा स्पोर्ट शोरूमजवळ भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा रद्द! कारण...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा रद्द करण्यात आला आहे. खराब हवामानाच्या कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

विर्भातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवला

विर्भातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

शरद पवार यांची प्रा.हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली

अभ्यासक, विचारवंत, समता परिषदेचे उपाध्यक्ष हरी नरके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हरी नरके यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

'मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर प्रो. हरी रामचंद्र नरके यांचे दुःखद निधन झाले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावले.'

'हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू या प्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले.'

'हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय ज्वलंत उदाहरणे आहेत. जसे, ओबीसींमध्ये पेरली दुहीची बीजे, फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन, मराठा आरक्षण, महात्मा फुले, समाजशोध इत्यादी. त्याप्रमाणेच त्यांची पुस्तके, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा असे अनेक पुस्तके प्रकाशित झाली.'

किरीट सोमय्यांचा सुजित पाटकर यांचे पार्टनर राजीव साळूंखे यांच्यावर गंभीर आरोप

किरीट सोमय्यांचा सुजित पाटकर यांचे पार्टनर राजीव साळूंखे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लाँकडाउन काळात गरीब मजुरांना वाटण्यात आलेल्या खिचडीत घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सुजित पाटकर यांचे पार्टनर राजीव साळूंखे यांनी घोटाळा केल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे. १०० कोटींचा कोविड लॉकडाउन काळात खिचडी घोटाळा असुन या घोटाळ्यात मुंबई महापालिकेचे अधिकारी सामील असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांची प्रा.हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली

अभ्यासक, विचारवंत, समता परिषदेचे उपाध्यक्ष हरी नरके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी हरी नरके यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार दररोज ऐकवणार

मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार दररोज ऐकवण्यात येणार आहेत. दररोज २ते३ मिनिटे शिवाजी महाराजांचे विचार ऐकवले जाणार आहेत.

बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात अमरावतीत मोर्चा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात अमरावतीत मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. तर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नागपुरात सेट टॉप बॉक्स ओढणाऱ्या चिमुकल्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू

टीव्हीचा सेट टॉप बॉक्स ओढणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे.

'प्रत्येक गावातील मूठभर माती एकत्र करून मोदींना पाठवणार', अजित पवारांची घोषणा

जात धर्म पंथ भाषा विसरून आपण सगळ्यांनी सोबत आलं पाहिजे. देशात एकता महत्वाची आहे. त्यानुसार आपण सगळ्यांनी याच मार्गावर राहीलं पाहिजे. प्रत्येक गावातील मूठभर माती एकत्र करून मोदींना पाठवायची आहे. जातीय सलोखा राहिला पाहिजे. सर्वांनी गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे. गांधीच हेच स्वप्न होतं, आपण ते पुढे नेलं पाहिजे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत.

धक्कादायक! प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या, मारहाण करुन विहिरीत फेकून दिलं

आपल्या मुलीसोबत प्रेम प्रकरण असल्याच्या संशयावरुन तरुणीच्या घरच्या मंडळींनी गावातील एका तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर जखमी झाल्यावर जिवंत असतानाच त्याला विहिरीत फेकून दिल्याची घटना औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील घडली आहे. जखमी तरुणाला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.