भारत विरुद्ध पाकिस्तान या संघांमध्ये विश्वचषकाचा सामना अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. यासाठी योग्य बंदोबस्त केला असल्याची माहिती अहमदाबाद पोलिसांनी दिली आहे.
अविनाश जाधव आणि मनसैनिकांना मुलुंड टोलनाक्यावर आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पक्ष आणि पक्ष चिन्हासाठी सुरु असेलल्या सुनावणीत शरद पवार गटाला कागदपत्र सादर करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.
अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील पक्षासाठी आणि पक्षाच्या चिन्हासाठी निवडणुक आयोगासमोरील सुनावणी संपली आहे. पुढची सुनावणी ९ नोव्हेंबरला घेतली जाईल. शरद पवार गटाला कागदपत्र सादर करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
निवडणुक आयोगासमोर अजित पवार गटाने शिवसेनेच्या निर्णयाचा हवाला दिला. यावर बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, आपलं योग्य कसं आहे हे दाखवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड घटनाबाह्य असल्याचा युक्तीवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला.
पक्षांतर्गत निवडीवेळी कोणीही आक्षेप घेतला नाही, असा पवार गटाकडून युक्तीवाद सादर केला आहे.
शरद पवार गटाकडून मनू सिंघवी यांचा युक्तीवाद सुरु. अजित पवार यांच्याकडे असणाऱ्या आमदारांचा आकडा अस्पष्ट आहे, असा युक्तीवाद त्यांच्याकडून करण्यात आला.
शरद पवार गटाच्या युक्तीवादाला सुरुवात झाली आहे. यावेळी त्यांनी पाठिंबा असणाऱ्या आमदारांची संख्या सांगण्याऐवजी नावं सांगा, अशी मागणी शरद पवार गटाने केली.
निवडणूक आयोगा ने शरद पवार गटाला चार वेळा संधी दिली पण ते वेळ मागत आहेत. पण त्यांना परवानगी दिली जाऊ शकत नाही. - मनिंदर सिंग, अजित पवारांचे वकील
अजित पवार गटाकडून युक्तीवाद करण्यात आला की, काही मुद्दे यापूर्वीही मांडले गेले आहेत. शिवसेना पक्ष सुनावणीचा दाखला दिला. एक व्यक्ती बेकायदेशीरपणे पक्ष चालवतायेत, असे वक्तव्य अजित पवार गटाकडून करण्यात आले. आमच्या कागदपत्रांमध्ये चूक नाही. योग्य पद्धतीनं प्रतिज्ञापत्रं सादर केली आहेत.
प्रतिज्ञापत्राचा मुद्दा अजित पवार गटाचे वकील नीरज कौल यांनी उपस्थित केला. मृत व्यक्ती प्रतिज्ञापत्र करायला वकीलासमोर कसा जाईल, असं कौल यावेळी म्हणाले.
अजित पवार गटाने शरद पवारांवर आरोप केले आहेत. पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले, असा युक्तीवाद या ठिकाणी करण्यात आला.
अजित पवार गटाने युक्तीवादात म्हटलय की पक्ष घरासारखा चालवला जात होता. पक्षात नियमांचं पालन केलं जात नव्हत.
अजित पवार गटाचे वकील नीरज कौल म्हणाले की, एकच व्यक्ती वर्चस्व दाखवू शकत नाही. कोणताही एक व्यक्ती पक्षावर दावा करू शकत नाही सध्या पक्षामध्ये हीच स्थिती आहे. पक्षात अंतर्गत लोकशाही नाही, असा युक्तीवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला.
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणुक आयोगात सुनावणीला सुरुवात झाली आहे.
निवडणुक आयोगाच्या सुनावणीला १५ मिनीटं उशीर होणार आहे. शरद पवार गटाचे वकील न पोहोचल्याने हा उशीर होत आहे. सुनावणी ४ वाजून १५ मिनीटांनी सुरु होईल.
शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे वकील निवडणुक आयोगात दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच चिन्ह कोणाला मिळणार यासाठी शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांसमोर आहेत. यासाठी निवडणुक आयोगासमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे लोकसभेत त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं.
2014 मध्ये लातूर येथील काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणात निकाल जाहीर करण्यात आला आहे. या प्रकरणात महेंद्र सिंग चौहान, समीर किल्लारीकर यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. तर अन्य चार आरोपींना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपींचे वकील या शिक्षेला उच्च न्यायालयात अव्हाण देणार आहेत.
आज येवला येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहिर सभा पार पडणार आहे. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये आरक्षणाच्या मुद्यावर मतभेद आहेत. दरम्यान शांतता आणि खबरदारीचा उपाय म्हणून भुजबळ यांच्या कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यासंदर्भात ते काही वक्तव्य करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष असेल.
मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.
मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होईल. ३ डिसेंबरला निकाल लागेल. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला, दुसऱ्या टप्प्यातील १७ नोव्हेंबरला मतदान होईल. राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला, तेलंगणात ३० नोव्हेंबरला मतदान होईल. ३ डिसेंबरला निकाल लागेल. मध्य प्रदेशमध्ये मतदान १७ नोव्हेंबरला होणार आहे. सर्व राज्यांचे निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबरला लागतील.
टोलचा पैसा आणि रोड टॅक्सचा पैसा कुठे जातो? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केला आहे. चांगले रस्ते मिळत नाहीत, मग पैसे कुठे जातात असा प्रशाव त्यांनी यावेळी केला आहे.
क्षुल्लक कारणावरून चेंबूर परिसरात तरूणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवणाचे पार्सल पहिले कोण घेणार यावरून २२ वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली आहे. अनिल रणदिवे, २२ नावाच्या तरूणाचा मारहाणीत मृत्यू झाला आहे.
चेंबूर पोलिसांनी रितीक बजाज, २३ आणि हर्षद वलोड्रा, २७ यांना अटक केली आहे. चेंबूरच्या आर सी मार्गावर असलेल्या सन्निधी बारमध्ये हा वाद झाला होता. लाथा बुक्क्यांनी तसेच हातातील कड्याने तरूणाला मारहाण करण्यात आली होती.
शिंदे-ठाकरेंना दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. शिवसेना कुणाची? ठरवण्यासाठी योग्य पुरावे सादर करण्यासाठी विधीमंडळ सचिवांनी शिंदे-ठाकरेंना नोटीस पाठवली आहे. दोन्ही गटांना आपले वर्चस्व सिद्ध करण्याची संधी देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता विधीमंडळाच्या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे. गेल्या आठवड्यात मंगळवारी नोटीस बजावली होती. शिंदे-ठाकरेंना उत्तर देण्यासाठी ८ दिवसांची मुदत शिल्लक आहे.
आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते संभाजीनगरात जाऊन घाटी रुग्णालयाला भेट देणार आहेत. घाटी रुग्णालयात 3 ऑक्टोबर रोजी 24 तासात 14 रुग्ण दगावले होते.
मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेकडील जय भवानी इमारतीची आगीची दुर्घटना ताजी असतानाच आता अंधेरी पूर्वेकडील गुंदवली भागातील झोपडपट्टीत पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास एका घराला मोठी आग लागल्याची दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन अर्धा तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले.सध्या फायर कूलिंगचे काम सुरू आहे.सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नसून मात्र दोन ते तीन घर जळून खाक झाले आहे.आग कशामुळे लागली या संदर्भात अधिक तपास अग्निशमन दलाचे जवान आणि अंधेरी पोलीस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.