Latest Marathi News Live: आम आदमी पार्टीची आसाम राज्य कार्यकारिणी विसर्जित

Marathi News Live Update : सिल्लोड तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी कोरड्या जमिनीत पिकांची पेरणी केली होती.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal
Updated on

आम आदमी पार्टीने आसाम राज्यातील विद्यमान कार्यकारिणी विसर्जित केली आहे. जोपर्यंत नवीन संघटनात्मक रचना जाहीर होत नाही तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष, प्रदेश चिटणीस आणि प्रदेश कोषाध्यक्ष ही पदे कायम राहणार आहेत.

Rajshahi-Kolkata train Live: राजशाही-कोलकाता क्रॉस-बॉर्डर ट्रेन सेवा 77 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार आहे

राजशाही, बांगलादेश आणि भारतातील कोलकाता दरम्यान क्रॉस-बॉर्डर ट्रेन सेवा 77 वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू होणार आहे.

Neet Paper Leak Live: नीट यूजी पेपर लीक प्रकरणाचा ताबा सीबीआयकडे

कथित NEET (UG) पेपर लीक प्रकरणाच्या केसचा ताबा सीबीआयने बिहार गुजरात आणि राजस्थानमधील पोलिसांकडून घेतल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

South Korea Blast Live: दक्षिण कोरियात बॅटरी उत्पादन कारखान्याला आग लागल्याने वीस लोकांचा मृत्यू

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलच्या दक्षिणेकडील ह्वासेओंग येथील लिथियम बॅटरी उत्पादन कारखान्याला आग लागल्याने वीस लोकांचा मृत्यू झाला असून 23 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

NEET-UG Scam LIVE : नीट-यूजीसी घोटाळ्यातील आरोपी जलील पठाणला 7 दिवसांची पोलीस कोठडी

लातूर : नीट आणि यूजीसी घोटाळ्यातील आरोपी जलील पठाणला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांना गुण वाढवून देण्याचा आरोप जलील पठाण आणि त्याच्या सहकाऱ्यांवर करण्यात आला आहे. दरम्यान, आज आरोपी जलीलला कोर्टात हजर करण्यात आले होते.

Pune Hotel Drugs Case LIVE : पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणी 8 आरोपींना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणी मोठी माहिती समोर येत आहे. 8 आरोपींना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून आरोपींना 5 दिवसांची कोठडी ठोठावण्यात आलीये. इथे क्लिक करा

Srinagar Fire LIVE : श्रीनगरमध्ये मस्जिद शरीफसह इमारतीला भीषण आग

श्रीनगर : श्रीनगरमधील बोहरी कादल येथे असलेल्या मस्जिद शरीफ आणि इमारतीला भीषण आग लागली. आग एवढी भीषण होती की, त्याच्या उंच ज्वाला आकाशाला भिडत होत्या. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यात व्यस्त आहेत. मात्र, अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले नाही.

Parliament Session LIVE : भाजपकडून जेपी नड्डा यांना राज्यसभेतील सभागृह नेते बनवण्याचा निर्णय; पीयूष गोयलांची घेणार जागा

भाजपने जेपी नड्डा यांना राज्यसभेतील सभागृह नेते बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री पियुष गोयल सभागृहात ही जबाबदारी सांभाळत होते, मात्र उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता ही जबाबदारी जेपी नड्डा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी सर्व नवनिर्वाचित खासदारांनी सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.

Parliament Session LIVE : भाजप जनतेला खूश करण्यासाठी पेपर लीक करतं; अखिलेश यादवांचं जोरदार टीकास्त्र

NEET पेपर लीक प्रकरणी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, ही काही नवीन गोष्ट नाही. ही भाजपची जुनी पद्धत आहे. इतिहास पाहिला तर भाजप जनतेला खूश करण्यासाठी पेपर लीक करते. यूपीमध्ये हा मोठा मुद्दा होता आणि आता तो दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.

Parliament Session LIVE : केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांची विरोधकांवर सडकून टीका

विरोधकांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी हल्लाबोल केलाय. संविधान कसे धोक्यात आहे हे सांगता येत नसल्याने ते निराधार युक्तिवाद करत असल्याचे मांझी म्हणाले. आपल्याकडे बहुमत आहे आणि बहुमताचे सरकार चालू आहे.

Actress Kangana Ranaut Live : अभिनेत्री कंगना राणावत यांनी घेतली लोकसभा सदस्यपदाची शपथ

18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले आहे. अभिनेत्री कंगना राणावत यांनी आज लोकसभा सदस्यपदाची शपथ घेतली.

Chhatrapati Sambhajinagar Live : छत्रपती संभाजीनगरात डॉक्टर रमेश तारख यांच्या तोंडाला फासले काळे

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा संघटना आक्रमक झाली असून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या अंतरवालीतील उपोषणाला विरोध केल्यामुळे डॉक्टर रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले आहे.

NEET Live : एनटीएची विश्वासार्हता संपली - अरविंद सावंत

NEET च्या मुद्द्यावर शिवसेनेचे (UBT) खासदार अरविंद सावंत म्हणतात, "ही एक अतिशय गंभीर समस्या आहे... पेपर लीक प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले पाहिजे. त्यांनी फारशी कारवाई केली नाही. पण आधी मंत्री ते नाकारत होते आणि म्हणत होते की काहीही नाही..."

एनटीएने परीक्षा रद्द केल्याबद्दल ते म्हणतात, "त्याची विश्वासार्हता संपली आहे. विश्वासार्हता नसताना तुम्ही परीक्षा का घेणार?..."

Loksabha Session Live: भर्त्रीहरी महताब यांना राष्ट्रपतींनी दिली हंगामी अध्यक्षपदाची शपथ

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजप खासदार भर्त्रीहरी महताब यांना राष्ट्रपती भवनात 18व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली.

MP Praniti Shinde Live: संसदेच्या पायऱ्या चढताना खूप भावनिक क्षण होता - प्रणिती शिंदे

काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, "जेव्हा मी संसदेच्या पायऱ्या चढत होते तेव्हा तो खूप भावनिक क्षण होता, पण ते जुन्या संसद भवनात असते तर मला अधिक चांगले वाटले असते. कारण मला वाटते की जुन्या संसदेत अधिक इतिहास आहे. तो प्रतिष्ठित होता. तरीही, तो माझा पहिला होता. लोकशाहीच्या या मंदिरात पाऊल टाकले आणि मला देशाची सेवा करताना अभिमान वाटला... खूप आव्हाने आहेत - महागाई, बेरोजगारी, NEET, लोकशाही. धोका आणि आम्ही हे सर्व मुद्दे संसदेत मांडू..."

Mahadev Jankar LIVE: महादेव जानकर विधानसभा स्वबळावर लढवणार?

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जाणकर यांनी विधानसभा स्वबळावर लढवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यांची १०४ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Nana Patole- Ajit Pawar Live: नाना पटोले यांनी घेतली अजित पवारांची भेट, सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची चर्चा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. साकोली ‌मतदारसंघातल्या कामांसदर्भात ही भेट घेतल्याची माहिती आहे.

BJP MP Arun Govil says Live: भाजपने नेहमीच संविधानाचा आदर केला आहे- खासदार अरूण गोविल

भाजपने नेहमीच संविधानाचा आदर केला आहे. त्यांनी आणीबाणी लादली होती, असं भाजपचे नवनिर्वाचित खासदार अरूण गोविल म्हणाले आहेत.

Parliament Session Live: लोकसभेच कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब

नव्या सरकारच्या अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. आज काही खासदारांनी संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. तूर्तास लोकसभेच कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

संसद शपथविधी मधील 3-4 महत्वाच्या घडामोडी -

विरोधी पक्षाच्या टी आर बालू, के सुरेश आणि संदीप बंदोपाध्याय यांनी नाव पुकारून देखील प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ घेतली नाही

नरेंद्र मोदी शपथ घ्यायला जात असताना राहुल गांधी यांनी हात उंचावून संविधान दाखवलं

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान शपथ घ्यायला जात असताना विरोधकांनी NEET परीक्षा गोंधळावरून घोषणा दिल्या

महाराष्ट्रातील 5 मंत्र्यांनी खासदारकीची शपथ घेतली... त्यात 2 खासदारांनी हिंदीत तर 3 खासदारांनी मराठीत शपथ घेतली

Pune Drug Case Live: पुण्यातील एल थ्री बारची तोडफोड; पतित पावन संघटना आक्रमक

पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात पतित पावन संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेने पुण्यातील एल-थ्री बारची तोडफोड केली आहे. फर्ग्युसन रोड जवळील बारमध्ये काहींनी ड्रग्जचा वापर केल्याचा आरोप आहे.

Mangesh Chavan- kisanrao Jorgewar Live: किसनराव जोर्गेकर यांच्या वक्तव्यामुळे भाजपचे ठिय्या आंदोलन

पवार गटाचे नेते किसनराव जोर्गेकर यांच्या वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. त्यांनी चाळीसगावमध्ये ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जोर्गेकर यांनी भाजपच्या मंगेश चव्हाण यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.

Raksha Khadse Live: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतली खासदारकीची शपथ

आजपासून नव्या सरकारचे पहिले अधिवेसन सुरु झाले आहे. पहिल्या दिवशी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी खासदारकीची शपथ घेतली. त्यांनी मराठीमधून शपथ घेतली.

Ravindra Dhangekar Live: पुणे पोलीस आयुक्तांनी स्वतः पदभार सोडावा - रविंद्र धंगेकर 

पुणे पोलीस आयुक्तांनी स्वतः पदभार सोडावा, ड्रग्स प्रकरणात त्यांनी स्वतः जबाबदारी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ड्रग्ज प्रकरणात योग्य ती कारवाई होणं अपेक्षित असताना ती होताना दिसत नाही. पुणे पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग गप्प का आहेत? असा सवाल करत अधिवेशनात पब मुक्त पुणे ड्रग्जमुक्त पुणे यासाठी आवाज उठवणार असल्याचे रविंद्र धंगेकर यांनी सांगितले आहे.

Dharmendra Pradhan Live: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान खासदारकीची शपथ घेत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांची घोषणाबाजी

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान खासदारकीची शपथ घेत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांची घोषणाबाजी करण्यात आली आहे. NEET परीक्षेतील गोंधळामुळे विरोधी पक्षांच्या घोषणा सुरू होत्या.

Nitin Gadkari Live: नव्या संसद भवनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली शपथ

नव्या संसद भवनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शपथ घेतली आहे.

Protest Live: संसद परिसरात विरोधकांचं आंदोलन, सोनिया गांधी, खर्गे आंदोलनात सहभागी

संसद परिसरात विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. सोनिया गांधी, खर्गे आंदोलनात सहभागी झाले आहेत. संविधानाच्या प्रत हातात घेत विरोधकांनी आंदोलन सुरू केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

PM Modi Live:  नव्या संसदेत पंतप्रधान मोदींनी घेतली शपथ

नव्या संसदेत पंतप्रधान मोदींनी शपथ घेतली. नव्या संसदेत आजपासून अधिवेशन होत आहे. आज शपथविधी पार पडणार आहेत.

Manoj Jarange Live: भुजबळांना दंगल घडवून आणायची आहे- मनोज जरांगे

चिथावणी देणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. भुजबळांना दंगल घडवून आणायची आहे. लोकांच्या कल्याणासाठी एकत्र या, असं आवाहन मराठा समूदायाचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

PM Modi Live: 18 वी लोकसभा हा एक शुभ संदेश- पंतप्रधान मोदी

१८ वी लोकसभा हा एक शुभ संदेश आहे. भारतीय पुराणात १८ अध्याय आहेत. १८ क्रमांकाला महत्व आहे. ९ हा क्रमांक कार्यसिद्धी दर्शवतो, असं पंतप्रधान मोदी संसद सुरु होण्याआधीच्या भाषणात म्हणाले.

PM Modi Parliament Speech Live: संसदीय लोकशाहीचा आज गौरव दिन; संसदेच्या पहिल्या अधिवेशनाआधी मोदींचे भाषण

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक शांततेत पार पडली. आज संसदीय लोकशाहीचा गौरव दिन आहे. नव्या खासदारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. संसदेच्या पहिल्या अधिवेशनाआधी त्यांनी भाषण केलं.

Bjp Maharashtra live : लोकसभेतील पराभवानंतर भाजप करणार मंथन

राज्यातील लोकसभेच्या दारुण पराभवानंतर भारतीय जनता पक्ष मंथन करणार आहे.यासाठी भाजपची पुढील आठवड्यात मंथन बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Sanjay Raut Live : आज मोदींना कळेल खरा विरोधीपक्ष काय असतो

१० वर्ष झाली विरोधीपक्षाला चिरडण्यात आले. मात्र आज मोदींना कळेल खरा विरोधी पक्ष काय आहे. असे संजय राऊत म्हणाले.

Cha Sambhaji Nagar Live: भायगाव गावात अडकले शेकडो नागरिक

संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील जोरदार पाऊस झाला. यावेळी भायगाव गावात असणाऱ्या पुलावरून हे पाणी वाहत असल्याने नागरिकांना गावात जाण्याचा रस्ता बंद झाला. यामुळे गावातील बाहेरगावी गेलेले शेकडो नागरिक या ठिकाणी अडकले.

Sambhaji nagar : सिल्लोड तालुक्यात जोरदार पाऊस

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड परिसरात काल सायंकाळी धुव्वाधार पाऊस झाल्याने परिसरातील पिकांना जीवदान मिळाले आहे. शिवाय आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता आहे. बळीराजा या पावसाने आनंदित झाला आहे. सिल्लोड तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी कोरड्या जमिनीत पिकांची पेरणी केली होती.

Lok sabha Session: आज संसदेत होणार खासदारांचा शपथविधी

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात पहिले दोन दिवस नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी होणार आहे.

Ulhasnagar Crime: गुटखा न दिल्याने वाद, तरुणावर जीवघेणा हल्ला

गुटखा न दिल्याने २१ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना उल्हास  घडली आहे. १० ते १५ जणांच्या टोळीने हातात चाकू, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केला.

Maharashtra Weather: राज्यातील ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान विभागाकडून अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.