मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरू आहे. ६ वाजेपर्यंत मतदान केंद्रवर आलेल्या मतदारांना मतदान करता येणार आहे.
धुळे 48.81%
दिंडोरी 57.06%
नाशिक 51.16%
पालघर 54.32%
भिवंडी 49.43%
कल्याण 41.70%
ठाणे 46.77%
मुंबई उत्तर 46.91%
मुंबई उत्तर - पश्चिम 49.79%
मुंबई उत्तर - पूर्व 48.67%
मुंबई उत्तर - मध्य 47.46%
मुंबई दक्षिण - मध्य 48.26%
मुंबई दक्षिण 44.63%
नाशिकच्या भालेकर विद्यालयात मतदान प्रक्रिया सुरूच आहे. मतदारांच्या लांबच लांब रांगा सध्या दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी संथ गतीने मतदान प्रक्रिया सुरू होती त्यामुळे मतदारसंघावर मतदारांची मोठी गर्दी जमली आहे.
आरे मतदार केंद्रात ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे. निवडणूक अधिकारी दोन्ही पक्षांना समजून बाहेर काढत आहेत. रवींद्र वायकर यांची पत्नी आणि मुलगी निवडणूक अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत. गोरेगाव आरे कॉलनी मतदार केंद्रात स्लो वोटिंग चालू आहे, दुपारपासून मोठी गर्दी या मतदार केंद्रात पाहायला मिळत आहे.
बरोबर ६ वाजता मुंबईतील विले पार्ले येथील शहाजी राजे मनपा शाळा असलेले मतदान केंद्र बंद करण्यात आले आहे. अखेरच्या मिनिटापर्यंत येणाऱ्या प्रत्येक मतदाराला आतमध्ये घेण्यात आले, मात्र बरोबर सहा वाजता आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी गेट बंद केल्याचे पाहायला मिळालं
सहा वाजता मतदान केंद्राच्या आवारात असणाऱ्यांना निवडणुक आयोगाकडून टोकण देण्यात येणार असून सर्वांचे मतदान करून घेतले जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 07.00 वाजेपासून सुरुवात झाली. सकाळी 5 वाजेपर्यन्त महाराष्ट्रात 48.66% इतके मतदान झाले.
भिवंडी- 48.89%
धुळे-48.81%
दिंडोरी- 57.06%
कल्याण- 41.70%
उत्तर मुंबई- 46.91%
उत्तर मध्य मुंबई-47.32%
उत्तर पूर्व मुंबई- 48.67%
उत्तर पश्चिम मुंबई- 49.79%
दक्षिण मुंबई- 44.22%
दक्षिण मध्य मुंबई-48.26%
नशिक- 51.16%
पालघर-54.32%
ठाणे-45.38%
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी देशभरात मतदान सुरू असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५६. ६८ टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रात ४८ .६६ टक्के मतदान झाले आहे.
बिहार – 52.35%
जम्मू काश्मीर- 54.21%
झारखंड- 61.90%
लडाख- 67.15%
महाराष्ट्र- 48.66 %
ओडिशा- 60.55%
उत्तरप्रदेश- 55.80%
पश्चिम बंगाल- 73%
कल्याण लोकसभा निवडणूक रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होणार असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण डोंबिवली दाखल झाले असून त्यांच्याकडून मतदानाचा आढावा घेतला जात आहे।
ज्येष्ठ अभिनेते अभिताभ बच्चन यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी जुहू येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदारसंघात आज दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. सकाळी ३ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ३८.७७ % इतके मतदान झाले.
भिवंडी- 37.06%
धुळे-39.97%
दिंडोरी- 45.95%
कल्याण- 32.43%
उत्तर मुंबई- 39.33%
उत्तर मध्य मुंबई-37.66%
उत्तर पूर्व मुंबई- 39.15%
उत्तर पश्चिम मुंबई- 39.91%
दक्षिण मुंबई- 36.64%
दक्षिण मध्य मुंबई-38.77%
नशिक- 39.41%
पालघर-42.48%
ठाणे-36.07%
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी देशभरातील ४९ मतदारसंघात मतदान सुरू असून दुपारी तीन वाजेपर्यंत संपूर्ण देशात ४७.५३ टक्के मतदान पार पडले आहे.
बिहार – 45.33
जम्मू काश्मीर- 44.90
झारखंड- 53.90
लडाख- 61.26
महाराष्ट्र- 38.77
ओडिशा- 48.95
उत्तरप्रदेश- 47.55
पश्चिम बंगाल-62.72
लोकसभा निवडणूक मतदानादरम्यान नाशिकमधील घोटीत २२४ बूथ हा दीड तास बंद झाला होता आता सुरळीत सुरु आहे.
दिंडोरी मतदार संघातील खालप ता.देवळा येथे दुपारी 3.20 वाजेपर्यंत 53.00% मतदान पार पडले. येथील 2969 मतदारांपैकी 1571मतदारांनी हक्क बजावला.
धुळे शहरातील एल एम सरदार हायस्कूल येथील 36 नंबर बुथवर ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. जवळपास 20 ते 25 मिनिटं मशीन बंद असल्यामुळे मतदारांचा गोंधळ उडालाच
लोकप्रतिनिधिंतर्फे प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी तात्काळ बंद पडलेल्या मतदान केंद्रावर भेट देत तात्काळ ईव्हीएम मशीन बदलण्याची प्रक्रिया सुरू केली.
नाशिकमध्ये जेलरोड परिसरातील हनुमंता नगर येथे पैसे वाटताना एकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी नगरसेवक प्रशांत दिवे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
अभिनेता अमिर खान आणि दिग्दर्शिका किरण राव यांनी मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करत लोकशाहीच्या उत्सवात भाग घेतला.
गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्र शबाना आझमी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदान केले.
मुंबईतील मुलुंडमध्ये ईव्हीएम मशिन बंद पडल्याचा प्रकार घडला आहे. यावर मतदार संताप व्यक्त करत आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदारसंघात आज दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रात 27.78% इतके मतदान झाले.
भिवंडी- 27.34 %
धुळे- 28.73 %
दिंडोरी- 33.25 %
कल्याण- 22.52 %
उत्तर मुंबई- 26.78 %
उत्तर मध्य मुंबई-28.05%
उत्तर पूर्व मुंबई- 28.82 %
उत्तर पश्चिम मुंबई- 28.41 %
दक्षिण मुंबई- 24.46 %
दक्षिण मध्य मुंबई- 27.21%
नशिक- 28.51 %
पालघर- 31.06 %
ठाणे- 25.05 %
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात देशातील 49 जागांवर मतदान होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात दुपारी 1 वाजेपर्यंत 36.73 टक्के मतदान झाले आहे.
मतदानाची राज्यनिहाय टक्केवारी
बिहार – 34.62
जम्मू काश्मीर- 34.79
झारखंड- 41.89
लडाख- 52.02
महाराष्ट्र- 27.78
ओडिशा- 35.31
उत्तरप्रदेश- 39.55
पश्चिम बंगाल- 48.41
पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रात मागील दोन तासांपासून मतदारांच्या लांबच लांब रांग लागल्या आहे. यावेळी या रांगेमध्ये सिनेअभिनेते आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर देखील उभे असल्याचे दिसत आहे.
नाशिकमध्ये भापच्या आमदार देवयानी फरांदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार वसंत गीते यांच्यात भद्रकाली हद्दीत बाचाबाची झाली. यावेळी दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील वर्सोवा विधानसभा क्षेत्रांतर्गत ओशिवरा येथील एका मतदान केंद्रावर शिवसेना (UBT) आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.
शिवसेना कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, भाजप आमदार भारती लव्हेकर आणि दिव्या ढोले यांच्याकडून मागील तासाभरापासून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार भारती कामडी यांनी सेलवाली या मतदान केंद्रावर कुटुंबसहित आपला मतदानाचा हक्क बजावला.
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील जागांवर मतदान होत आहे. यामध्ये राज्यातील मतदारांमध्ये अनुत्साह दिसून येत आहे. देशात आतापर्यंत झालेल्या मतदानामध्ये महाराष्ट्राची टक्केवारी सर्वात कमी म्हणजेच 15.93 टक्के इतकी आहे. दरम्यान दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक 19.50 टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील 13 मतदारसंघांमध्ये आतापर्यंत झालेले मतदान
भिवंडी- 14.79%
धुळे-17.38%
दिंडोरी- 19.50%
कल्याण- 11.46%
उत्तर मुंबई- 14.71%
उत्तर मध्य मुंबई-15.73%
उत्तर पूर्व मुंबई- 17.01%
उत्तर पश्चिम मुंबई- 17.53%
दक्षिण मुंबई- 12.75%
दक्षिण मध्य मुंबई-16.69%
नशिक- 16.30%
पालघर-18.60%
ठाणे-14.86%
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात देशातील 49 जागांवर मतदान होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात अवघे 23.66 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजेत 15.93 टक्के मतदान झाले आहे.
बिहार – 21.11
जम्मू काश्मीर- 21.37
झारखंड- 26.18
लडाख- 27.87
महाराष्ट्र- 15.97
ओडिशा- 21.07
उत्तरप्रदेश- 27.76
पश्चिम बंगाल-32.70
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या मतदारसंघात येत असलेल्या नांदगावमध्ये हा प्रकार घडल्याची माहीती समोर आली आहे.
नाशिकच्या निफाडमध्ये शेतकरी गळ्यात कांदा आणि टोमॅटोची माळ घालून मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहचले आहे. सध्या याची राज्यभर चर्चा होत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे. दरम्यान मुंबई मध्ये अभिनेते धर्मेंद्र, गीतकार गुलजार यांच्यासह सुनील शेट्टी, हेमा मालिनी, ईशा दोओल यांनी मतदान केले.
लोकसभा निवडनुकीसाठी मुंबईमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार अदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी मतदान केले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माटुंगा येथिल मतदान केंद्रात आपल्या कुटुंबियांसोबत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात पालघर लोकसभा मतदारसंघात सकाळी 9.00 वाजेपर्यंत अंदाजे 7.95 टक्के मतदान झाले आहे.
पालघर मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहायल टक्केवारी
128 डहाणू – 8.16 टक्के
129 विक्रमगड – 9.70 टक्के
130 पालघर – 9.20 टक्के
131 बोईसर – 6.31 टक्के
132 नालासोपारा – 6.50 टक्के
133 वसई – 9.40 टक्के
लोकसभा निवडणूक २०२४ साठी, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी नुकतेच के. सी. कॉलेज या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात आज दि. २० मे रोजी सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात सकाळी ०९.०० वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ७.७९ टक्के मतदान झाले आहे.
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय सरासरी टक्केवारी
१७२-अणुशक्ती नगर - ०७.०० टक्के
१७३-चेंबूर - ०७.२४ टक्के
१७८-धारावी - ०५.३० टक्के
१८१-माहीम - ०८. ९८टक्के
१७९-माहीम कोळीवाडा - १२.०० टक्के
१८०- वडाळा - ०५.५७ टक्के
महाराष्ट्रात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्पात 13 जागांवर लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण मतदारसंघात आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
मुंबईत डमी ईव्हीएम मशिनवर मतदारांना मार्गदर्शन करणाऱ्या शिवसेनेच्या (UBT) कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत आक्रमक झाले आहेत. त्यांनी पोलिसांना याबाबत जाब विचारला आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ७ पासून सूरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
धुळे- ६.९२ टक्के
दिंडोरी- ६.४० टक्के
नाशिक - ६.४५ टक्के
पालघर- ७.९५ टक्के
भिवंडी- ४.८६ टक्के
कल्याण - ५.३९ टक्के
ठाणे - ५.६७ टक्के
मुंबई उत्तर - ६.१९ टक्के
मुंबई उत्तर - पश्चिम - ६.८७ टक्के
मुंबई उत्तर - पूर्व - ६.८३ टक्के
मुंबई उत्तर - मध्य - ६.०१ टक्के
मुंबई दक्षिण - मध्य- ७.७९ टक्के
मुंबई दक्षिण - ५.३४ टक्के
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात राज्यात मुंबई परिसरासह ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक आणि दिंडेरी मतदारसंघात मतदानाला सुरूवात झाली आहे. यामध्ये महराष्ट्रात आतापर्यंत फक्त 6 टक्के मतदान झाले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात देशातील 49 जागांवर मतदान होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात अवघे 10.28 टक्के मतदान झाले आहे.
मुंबई उत्तर मध्यच्या काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी डाव्या हातावर संविधानरक्षक असा संदेश लावला होता
अभिनेता शाहिद कपूर यांनी बजावला मतदानाचा अधिकार
राज्याचे मुख्य सचिव नितिन करीर यांनी रॉकी हिल टॉवर, नारायण दाभोळकर मार्ग, मलबार हिल येथील मतदान केंद्रात आपला मतदानाचा हक्क बजावला.
आमदार गणेश नाईक यांच्या सह त्यांच्या कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क
लोकसभा निवडणूकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सेंट ॲनिज हायस्कूल, मादाम कामा रोड, मुंबई येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.
अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी सकाळी लवकर मतदानाचा हक्क बजावला.
पालघर लोकसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी भाताणे मतदान केंद्रावर मतदान केले
डोंबिवलीतील मंजुनाथ विद्यालय येथील मतदान केंद्रावरील एक ईव्हीएम मशीन बंद पडल्या त्यामुळे अर्धा पाऊण तासापासून नागरिक रांगेत उभे आहेत.
धुळे शहरातील एल एम सरदार शाळेतील मतदान केंद्रावर जवळपास अर्धा तास ईव्हीएम मशीन बिघाड झाल्याने बंद आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ उडाला आहे.
आमदार गणेश नाईक यांच्या सह त्यांच्या कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क
अमोल किर्तीकर हे गोरेगाव मधील पहाडी हायस्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झाले आहेत. किर्तीकर हे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघडीचे उमेदवार असून ते पत्नीसह मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणतात, "मी मतदारांना आवाहन करतो की, दर पाच वर्षांनी येणाऱ्या लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे. ECI ने चांगली व्यवस्था केली आहे आणि लोकांनी ECI च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे... मी लोकांमध्ये भाजपबद्दल उत्साह पाहिला आहे. विशेषत: पीएम मोदींच्या रोड शोममुळे महायुती (मुंबईतील) सर्व सहा जागा जिंकेल..."
ठाण्यात नौपाडामधील ईव्हीएम मशीन बंद पडले आहेत. मतदार मोठ्या प्रमाणात जमले आहेत. सध्या मशीन बदलन्याचे काम सुरु आहे.
“माझे मत सुशासनासाठी आहे, सर्व लोकांची काळजी घेणारे सरकार. कृपया बाहेर पडा आणि मतदान करा, ”अभिनेता फरहान अख्तर म्हणाला जो आपले मत देण्यासाठी मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील मतदान केंद्रावर पोहोचला होता.
९० वर्षांचे भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी गोरेगावमधील पहाडी हायस्कूल मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
मतदान सुरू होताच मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ४९ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
2024 लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात आज 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांसाठी मतदान होत आहे, ज्या जागांसाठी आज मतदान होत आहे त्यासाठी सर्वांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषत: महिला मतदारांना आणि तरुण मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे मी आवाहन करतो.
भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक गोरेगावमधील पहाडी हायस्कूल मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. उत्तर पश्चिम मतदारसंघात राम नाईक यांचे मतदान असून, ९० व्यां वर्षी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते मतदान केंद्रावर सकाळीच दाखल झाले आहेत.
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील जागांवर आज मतदान होणार आहे. दरम्यान, मतदान सुरू होण्यापूर्वीच आडगाव परिसरात दोन EVM मशीन बंद असल्याचे समोर आले आहे. EVM मशीन दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी मतदान केंद्रावर पोहचले. त्यानंतर त्यानंतर बंद झालेले EVM मशीन सुरू करण्यात आले. आज नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात देशातील 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील ४९ मतदारसंघात आज मतदान होणार आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील वांद्रे पश्चिम येथील मतदान केंद्रावर मॉक पोल सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.