नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. गेल्या वेळी केवळ एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने यंदा 13 जागा जिंकल्या आहेत. तर गेल्यावेळी 28 जागा जिंकणारी भाजप 9 जागांवर घसरली आहे.
अत्यंत प्रतिष्ठेच्या बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे यांनी 6585 मतांनी पराभव केला.
मुबईतील अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत अखेर रवींद्र वायकर यांनी विजय मिळवला आहे. त्यांचा 48 मतांनी विजय झाला. यानंतर दोन्हीकडील शिवसैनिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बीड लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी 32 फेऱ्यांनंतर पूर्ण झाली असून, हा निकाल राखूण ठेवण्यात आला आहे.
उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिवसेना UBT चे अमोल किर्तिकर अवघ्या एक मतांनी पुढे आहेत. त्यांच्यासमोर शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर आहेत.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे. यानंतर मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर ठाकरे कुटुंबियांसोबत शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केला आहे.
बीड लोकसभा निवडणुक 2024
फेरी क्रमांक -29
पंकजा मुंडे-662391
बजरंग सोनवणे-663608
आघाडी -1217 (बजरंग सोनवणे)
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात मोठा फेरबदल
रवींद्र वायकर ७५ मतांनी आघाडीवर
मतमोजणीवर अमोल किर्तीकर यांचा आक्षेप घेत पडताळणीची केली मागणी
उत्तर पश्चिमची फेरमतमोजणी सुरु आहे. अमोल कीर्तिकर विजयी मात्र रवींद्र वायकर यांच्या मागणीनुसार रेकॉऊंटिंग सध्या सुरु आहे. पोस्टलचं मतमोजणी आणि शेवटच्या टप्प्यातील मतांची मोजणी सध्या सुरु असल्याची माहिती आहे.
सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी विजयी गुलाल उधळलाय. प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केला.
तेवीसाव्या फेरी अखेर उदयनराजे भोसले 32274 मतांनी विजयी
शशिकांत शिंदें यांचा पराभव
उदयनराजे - 5,68,749
शशिकांत शिंदे -5,36,475
धुळे : अधिकृत... १९ व्या फेरी अखेर
डॉ. बच्छाव ...582149
डॉ. भामरे.... 576994
या मध्ये पोस्टल मत नाही
2 EVM मतमोजणी अद्याप बाकी
डॉ. शोभाताई बच्छाव ५१५५ मतांनी आघाडीवर
बजरंग सोनावणे काउंटिंग हॉलमध्ये
एक 21 फेरी रिकॉउंटिंगची मागणी
आत मध्ये वाद झाला आहे
धनंजय मुंडे काउंटिंग हॉलमध्ये दाखल
हातकणंगलेतून 24 व्या फेरीनंतर धैर्यशील माने 14723 मतांनी विजय मिळवला आहे. या मतदारसंघात सत्यजीत पाटील-सरुडकर यांचा पराभव झाला आहे.
कऱ्हाड : देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात स्पष्ट कौल दिलेला आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये मोदींना स्वतःच्या भाजपच्या पक्षाच्या ताकदीवर बहुमत मिळाले होते. यावेळी त्यांना त्या जागा मिळालेल्या नाहीत. नरेंद्र मोदींचा तो वैयक्तीक पराभव आहे. भाजप सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, संघ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदींनाच पुन्हा नेता निवडतील का? हा माझ्या मनातील प्रश्न असून ते दुसरा नेता निवडून पर्यायी व्यवस्था होताना दिसत आहे का अशी शंका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली.
छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या विजयाची घोषणा होताच, बीड बायपास रोडवर शिवसैनिकांनी व आमदार रमेश बोरनारे, विलास भुमरे यांनी विजयी मिरवणूक काढत जल्लोष केला.
बीडमध्ये पंकजा मुंडे ह्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यांना तब्बल ७५ हजार मतांचं लीड मिळालं आहे.
बीड लोकसभा निवडणूक 2024
फेरी क्रमांक - 24
पंकजा मुंडे -597793
बजरंग सोनवणे-567322
अनुप धोत्रे - 453866
डॉ. अभय पाटील - 413854
प्रकाश आंबेडकर - 274823
भाजपाचे अनुप धोत्रे 40012 मतांनी विजयी इथे क्लिक करा
अटीतटीच्या लढतीत वर्षा गायकवाड यांचा विजय झाला आहे.
जालन्यात काँग्रेसचे डॉ.कल्याण काळे 49,898 मतांनी आघाडीवर आहेत.
जालना: लोकसभा 16 वी फेरी
काँग्रेस - डॉ.कल्याण काळे - 4,10,580
भाजपचे रावसाहेब दानवे -3,56,220
अपक्ष - मंगेश साबळे 1,14,939
काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे- 54,360 मतांनी आघाडीवर
धुळ्यात १८ व्या फेरीत काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
धुळे : १८ फेरी
काँग्रेस -: ५ लाख ७९ हजार ४९६ मते
भाजप-: ५ लाख ७१ हजार २६७ मते
काँग्रेस आघाडी -: ८२२९ मते.
ग्रामीण मधील एकूण १५ मतपेटी मोजणी बाकी आहे आणि ग्रामीण व शिंदखेडा यातील ४ मत पेटी ज्यात एक फागणे आहे त्यांची मत मोजणी VV पॅट द्वारे होते आहे.
आणि पोस्टल मतमोजणी बाकी आहे
धाराशिव : सतरावी फेरी
ओम राजे - ५,००८५१
अर्चना पाटील - २,८३,५०२
ठाण्यातून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा विजय झाला असून राजन विचारे यांचा पराभव झाला आहे.
संभाजीनगर :
संदिपान भुमरे (शिवसेना) - 299376
इम्तियाज जलील (MIM) - 243568
चंद्रकांत खैरे (शिवसेना UBT) - 188123
संदिपान भुमरे हे 55808 मतांनी आघाडीवर
लातूरमधून मविआचे उमेदवार शिवाजी काळगे विजयी झाले आहेत.
नगरमध्ये निलेश लंके १६ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. तर सुजय विखे सध्या पिछाडीवर आहेत.
सांगलीत विशाल पाटील १ लाख १ हजार १९४ मतांनी विजय मिळवला आहे.
बीड लोकसभा निवडणूक 2024
बीड लोकसभा
फेरी क्रमांक -20
पंकजा मुंडे-490148
बजरंग सोनवणे-473666
आघाडी - 16482 (पंकजा मुंडे)
उत्तर मध्य मुंबईत भाजपा उमेदवार उज्वल निकम पिछाडीवर गेले आहेत. तर वर्षा गायकवाड 176 मतांनी आघाडी घेतली आहे.
बारामतीत सुप्रिया सुळेंचा 1 लाख मतांनी विजय झाला असून सुनेत्रा पवारांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे.
अमरावतीत नवनीत राणांचा दारुण पराभव झाला आहे. मविआच्या बळवंत वानखेडेंचा इथं मोठा विजय झाला. इथे क्लिक करा
उत्तर पश्चिममध्ये अमोल किर्तीकरांचा विजय झाला आहे.
पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचा मोठा विजय झाला आहे तर मविआच्या धगेंकरांचा पराभव झाला आहे.
दक्षिण मुंबईत आणि ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी बाजी मारली आहे. त्यांच्याकडे 54 हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी होती. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला.
तेराव्या फेरीअखेर सुप्रिया सुळे 84 हजार मतांनी आघाडीवर असून सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत. बारामतीत सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणुकीची तयारी सुरू केलीये.
बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे सुळे यांची विजयी आघाडी असून शरद पवारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, बारामतीत यापेक्षा निकाल वेगळा लागेल,असं मला वाटलं नव्हतं. बारामतीमधील सर्वसामान्य लोकांची मानसिकता मला माहिती आहे, आम्ही तिथे जाऊ किंवा नाही पण ते आमच्यासोबत आहेत.
इंडिया आघाडीला मिळालेल्या यशानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. लवकरच दिल्लीमध्ये बैठक बोलावून सामूहिक निर्णय घेणार आहोत, असं पवारांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकांचे कल हाती आलेले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला २८ ते ३० जागा मिळतील, असे अंदाज आहेत. त्यातच शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया पुढे आलीय. महाराष्ट्र परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असं शरद पवार म्हणालेत. इथे क्लिक करा
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई यांचा विजय झाला आहे. अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांचा पराभव केला आहे.
बीड लोकसभा निवडणूक 2024
बीड लोकसभा
लोकाशा न्युज अपडेट
फेरी क्रमांक -15
पंकजा मुंडे-357799
बजरंग सोनवणे-354706
आघाडी -3093 (पंकजा मुंडे)
रावेर मतदारसंघ (१३ व्या फेरीअखेर)
रक्षा खडसे (भाजप) : ३५३९३७
श्रीराम पाटील (शरद पवार गट) : २१८०७५
(रक्षा खडसेंना १३५६८३ मतांची आघाडी)
----
जळगाव मतदारसंघ (१६ व्या फेरीअखेर)
स्मिता वाघ (भाजप) : ४५७४८१
करण पवार (उबाठा) : २७६९०१
(स्मिता वाघ यांना १८०५८० मतांची आघाडी)
नंदुरबार काँगेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यंदा हा गड काँग्रेसने राखला असून काँग्रेस के. सी. पाडवी यांचे पुत्र अॅड. गोवाल पाडवी यांचा विजय झाला आहे.
चंद्रपुरात काँग्रेसची जोरदार मुसंडी पहायला मिळत आहे. दहाव्या फेरीअखेर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर 1लाख 6112 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत.
Baramati Lok Sabha Elections Results Updates : बारामतीत दहाव्या फेरीपर्यंत सुप्रिया सुळे 48 हजार 365 मतांनी आघाडीवर आहेत.
साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना विजयी आघाडी घेतली आहे. मविआचे उमेदवार शशिकांत शिंदे पिछाडीवर आहेत.
सोळाव्या फेरी अखेर उदयनराजे भोसले 12,781 मतांनी आघाडीवर
उदयनराजे - 5,17,211
शशिकांत शिंदे -5,04,430
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दुपारी 2 पर्यंतच्या आकडेवारीनुसार सत्यजित पाटील सरूडकर हे आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
अमरावतीत नवनीत राणा पिछाडीवर आहे, तर वानखेडे १६ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघ - पंधरावी फेरी
भारती पवार यांना 3 लाख 9 हजार 799 (भाजप )महायुती
भास्कर भगरे यांना 3 लाख 67 हजार 264 महविकास आघाडी (राष्ट्रवादी शरद पवार गट)
पंधरावी फेरी अखेर 57 हजार 498 मतांनी महाविकास आघाडीचे भास्कर भगरे आघाडीवर
अकोल्यात प्रकाश आंबेडकर 89 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. तर, महाविकास आघाडीचे अभय पाटील आघाडीवर आहेत.
नगरमधून निलेश लंके १५ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
बीड लोकसभा निवडणुक 2024
बीड लोकसभा
फेरी क्रमांक - 10
पंकजा मुंडे- 239828
बजरंग सोनवणे- 227873
आघाडी - 11955 पंकजा मुंडे इथे क्लिक करा
उत्तर पश्चिम
सातव्या फेरीत पुन्हा वायकर आघाडीवर
मिळालेली मते
किर्तीकर : 20,966(आत्तापर्यंत मिळालेली मते 1,48,294)
वायकर : 22,441( आता पर्यंत मिळालेली मते 1,52,640)
अकोल्यात काँग्रेस आणि भाजपात काट्याची टक्कर. काँग्रेसचे डॉ. अभय पाटलांनी ओलांडला पावणेदोन लाख मतांचा टप्पा. काँग्रेसचे डॉ. अभय पाटील दहाव्या फेरी अखेर 12894 मतांनी आघाडीवर. भाजपचे अनुप धोत्रे दुसर्या क्रमांकावर. वंचितच्या प्रकाश आंबेडकर मोठ्या पिछाडीसह तिसर्या क्रमांकावर. आंबेडकर काँग्रेसपेक्षा 63 हजारांनी पिछाडीवर
पाटील : 179675
धोत्रे : 166781
आंबेडकर : 116622
बाराव्या फेरी अखेर शशिकांत शिंदे 795 मतांनी आघाडीवर
शशिकांत शिंदेंच्या आघाडीत मोठी घट...
शशिकांत शिंदे -351702
उदयनराजे भोसले -350907
संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात पाचव्या फेरीत संदिपान भुमरे (शिवसेना - शिंदे गट) यांना 1949 मतांची आघाडी.
संदिपान भुमरे यांना - 86586 मते
इम्तियाज जलील - 84637 मते
चंद्रकांत खैरे - 58270 मते
संदिपान भुमरे (शिवसेना) - 111874
इम्तियाज जलील (MIM) - 101128
चंद्रकांत खैरे (शिवसेना UBT) - 73615
संदिपान भुमरे हे 10746 मतांनी आघाडीवर
चंद्रकांत खैरे तब्बल 38259 मतांनी पिछाडीवर
भिवंडी लोकसभा
चौथी फेरी
कपिल पाटील - 67708
सुरेश म्हात्रे - 89995
निलेश सांबरे - 44651
-सुरेश म्हात्रे 22287 मतांनी आघाडीवर
रायगड - अकरावी फेरी अखेर महायुतीचे सुनील तटकरे ३८ हजार ७२९ मतांनी आघाडीवर आहेत.
मुंबई उत्तर मधून वंचितला १४29 मतं, मुंबई उत्तर मध्य मधून 3600 मतं, मुंबई उत्तर पूर्व मधून 2665, उत्तर पश्चिम मधून 5962 मतं, मुंबई दक्षिण मधून केवळ 994 मतं, दक्षिण मध्य मुंबईतून 7342 मतं वंचितच्या उमेदवारांना मिळाली आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीत वंचितला मुंबईसह महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला होता.
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीचे डॉ. अभय पाटील हे आघाडीवर असल्याचे दिसून येते. सातव्या फेरी अखेर डॉक्टर अभय पाटील यांना एक लाख 27,493 मते मिळाली असून भाजपचे अनुप धोत्रे यांना 1,13,292 एवढी मते मिळाली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांना 81,188 एवढी मते मिळाली असून आतापर्यंत सहाव्या फेरी अखेर 46,305 मतांनी आंबेडकर पिछाडीवर आहेत. इथे क्लिक करा
पालघर लोकसभेत भाजपचे हेमंत सावरा 40780 मताने आघाडीवर तर ठाकरे गटाच्या भारती कामडी पिछाडीवर
भारती कामडी 105927
हेमंत सावरा 146707
राजेश पाटील 69800
रायगडच्या 10 वया फेरी अखेर सुनील तटकरे 39 हजार 511 मतांनी आघाडीवर, तर मावळ 9 व्या फेरी अखेर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे 34 हजारांनी आघाडीवर आहे.
बीड लोकसभा निवडणूक 2024
बीड लोकसभा
फेरी क्रमांक - 7
पंकजा मुंडे- 165006
बजरंग सोनवणे- 165209
आघाडी - 203 ( बजरंग सोनवणे)
दिंडोरी लोकसभा
सातव्या फेरी अखेर
भास्कर भगरे यांना १ लाख ६८ हजार ९२९ मते. भारती पवार यांना १ लाख ५० हजार ४३७ मते. महाविकास आघाडीचे भास्कर भगरे १८ हजार ४९२ मतांनी आघाडीवर.
राजाभाऊ वाजे 251734
हेमंत गोडसे 170309
नवव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे 81425 मतांनी आघाडीवर
संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात चौथ्या फेरीत संदिपान भुमरे (शिवसेना - शिंदे गट) यांना 6021 मतांची आघाडी.
संदिपान भुमरे यांना - 70455 मते
इम्तियाज जलील - 64434 मते
चंद्रकांत खैरे - 48297 मते इथे क्लिक करा
कवी मनाचे नेते बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पाचव्या फेरी अखेर 556 मत मिळाली..
अभिजीत बिचुकले यांना पाचव्या फेरीमध्ये 556 मते..
सांगली अपक्ष बंडखोर उमेदवार विशाल पाटील 75 ते 80 हजार मतांनी विजयी होतील असा अंदाज आहे. सध्या ते 30000 मताधिक्याने पुढे आहेत. तर १२ व्या फेरी अखेर ८६,००० मतांनी शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत.
कोल्हापुरात शाहू महाराज २५ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरीत संदिपान भुमरे (शिवसेना - शिंदे गट) यांना २२८ मतांची आघाडी.
संदिपान भुमरे यांना - 50946 मते
इम्तियाज जलील - 50718 मते
चंद्रकांत खैरे - 35506 मते
दिंडोरी लोकसभा मतदारसंघ पाचव्या फेरी अंती
भारती पवार 107462(भाजप )महायुती
भास्कर भागरे 120572 महविकास आघाडी (राष्ट्रवादी शरद पवार गट)
चौथी फेरी अखेर 13110 मतांनी महाविकास आघाडीचे भास्कर भगरे पुढे
शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे 5000 मतांनी आघाडीवर, तर बीडमध्ये बजरंग सोनवणे आघाडीवर आहेत.
लोकसभा निवडणूक अपडेट
शिर्डी लोकसभा मतदार संघ
अधिकृत तिसरी फेरी
सदाशिव लोखंडे (महायुती)
- 61132
भाऊसाहेब वाकचौरे (महविकास आघाडी)
- 66866
उत्कर्षा रुपवते (वंचित)
- 15638
कुणाला किती मतांची आघाडी
-भाऊसाहेब वाकचौरे हे तिस-या फेरी अखेर 5734 मतांनी आघाडीवर
दुसरी फेरी
कपिल पाटील - 34214
सुरेश म्हात्रे - 39762
निलेश सांबरे - 26634
-सुरेश म्हात्रे 5548 मतांनी आघाडीवर
बीड लोकसभा निवडणुक 2024
फेरी क्रमांक ६
पंकजा मुंडे -१४२९६०
बजरंग सोनवणे-१४४३४७
आघाडी -१३८७ (बजरंग सोनवणे)
वर्धेत भाजपचे रामदास तडस पिछाडीवर
- अमर काळे यांची पहिल्या फेरीपासुन आघाडी कायम
अमर काळे - 61329
रामदास तडस - 53095
8 हजार 234 मतांनी अमर काळे आघाडीवर
धुळे लोकसभा मतदारसंघ : चौथ्या फेरीत भाजपा उमेदवार डॉ. सुभाष भामरे ५६०० मतांनी आघाडीवर
साताऱ्यात महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे 20 हजार मतांनी आघाडीवर, महायुतीचे उदयनराजे भोसले पिछाडीवर आहे. तर, सांगलीत विशाल पाटील पाचव्या फेरी अखेर 23 हजार मतांनी आघाडीवर आहेत. इथे क्लिक करा
जालना : लोकसभा पाहिली फेरी
भाजपचे रावसाहेब दानवे -21,952
काँग्रेस - डॉ.कल्याण काळे - 19,364
भाजपचे रावसाहेब दानवे -2588 मतांनी आघाडीवर
उत्तर मुंबई
पियुष गोयल भाजप
५३,९६९ आघाडी २७,८६७
भूषण पाटील काँग्रेस २६,१०२
उत्तर मध्य मुंबई
7 वी फेरी
उज्वल निकम - 59352, 11929 आघाडी
वर्षा गायकवाड - 47423
नोटा - 1324
मावळ लोकसभा मतदार संघ : बारणे यांना १६ हजार मतांची आघाडी...पाचव्या फेरीला सुरुवात पण काही विधानसभा मतदारसंघांची मोजणी धिम्या गतीने सुरू असल्याने एकूण आकडेवारीला उशीर.
धुळे: तिसऱ्या फेरी अखेर काँग्रेसला 99,994 मतं तर भाजपाला एक लाख 5272 मतं...
डॅा. सुभाष भामरे 5288 मतांनी पुढे...
बीड लोकसभा
फेरी क्रमांक - 4
पंकजा मुंडे-92325
बजरंग सोनवणे-101281
आघाडी -8956 (बजरंग सोनवणे)
बारामतीमधून सुप्रिया सुळे ३४३ मतांनी आघाडीवर आहे.
नाशिक : पाचव्या फेरी अखेर राजाभाऊ वाजे यांना 48 हजार मतांची आघाडी मिळाली आहे.
उत्तर मध्य मुंबई
4 थी फेरी
उज्वल निकम - 36358, 4867 आघाडी
वर्षा गायकवाड - 27891
नोटा - 833
संजय दिना पाटील
मिळालेली मते . 29108 आघाडी 10429
मिबिर कोटेचा
मिळालेली मते - 18679
आघाडी10429
उत्तर मध्य मुंबई
5 वी फेरी
उज्वल निकम - 47792, 9855 आघाडी
वर्षा गायकवाड - 37937
नोटा - 1078
47792 (+ 9855)
उत्तर मध्य मुंबई
6 वी फेरी
उज्वल निकम - 52810, 11288 आघाडी
वर्षा गायकवाड - 41522
नोटा - 1177
संजय दिना पाटील
मिळालेली मते .46767 आघाडी 15912
मिबिर कोटेचा
मिळालेली मते - 30855
आघाडी1592
उदयनराजे भोसले (भाजप) मिळालेली मते - 15983
शशिकांत शिंदे (S P गट राष्ट्रवादी) मिळालेली मते - 23185
आत्तापर्यंत शशिकांत शिंदे 7202 मतांनी आघाडीवर..
नाशिक लोकसभा -
- चौथ्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे यांना 1,15,709 मतं
- तर महायुतीचे हेमंत गोडसे यांना 79,369 मतं
- राजाभाऊ वाजे 36, 340 मतांनी आघाडीवर
बीड लोकसभा निवडणुक 2024
बीड लोकसभा
फेरी क्रमांक 3 अखेर
भाजप- पंकजा मुंडे - 71842
महाविकास -आघडी बजरंग सोनवणे-74021
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे उमेदवर - 2197 (बजरंग सोनवणे) आघाडीवर
Sambhajinagar Lok Sabha Election Result Updates : छ. संभाजीनगरमधून जलील 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
1) शशिकांत शिंदे मा विकास आघाडी- 12629
2) उदयनराजे भोसले – 9983
आघाडीवर - शशिकांत शिंदे 2643 मतांनी आघाडीवर
मतमोजणीची तिसरी फेरी संपली...
महायुतीचे प्रतापराव जाधव 3258 मतांनी आघाडीवर...
प्रतापराव जाधव (महायुती) - 13347
नरेंद्र खेडेकर (महाविकास आघाडी) - 10089
रविकांत तुपकर (अपक्ष) - 7467
वसंत मगर (वंचित) - 2834
यवतमाळ -वाशीम तिसरी फेरी
देशमुख ६८१९३
पाटील ४८९५३
१९९४० ने देशमुख आघाडीवर
भिवंडी लोकसभा
कपिल पाटील 20752
3627 आघाडी
कल्याण लोकसभा
श्रीकांत शिंदे 431 79
16613 मतांनी आघाडी
ठाणे लोकसभा
नरेश मस्के 44 हजार 743
6730 मतांनी आघाडीवर
राजन विचारे 38 हजार तेरा
सांगली लोलोकसभा मतदारसंघ
अपक्ष उमेदवार - विशाल पाटील
सांगलीच्या सहापैकी सहा विधानसभा मतदारसंघात आघाडीवर...
8 फेरी विशाल दादा 61,000 मतांनी पुढे
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
पहिल्या फेरी अंती मिळालेली मते
भाजपा उमेदवार – डॉ. हिना गावित – 16301
कॉग्रेस उमेदवार – अॅड गोवाल पाडवी – 35697
भाजपाच्या डॉ. हिना गावित १९३९६ मतांनी पिछाडीवर…
छ. संभाजीनगरमधून जलील ३ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार 6000 मतांनी पिछाडीवर आहेत.
माढ्यातून धैर्यशिल मोहिते पाटील आघाडीवर आहेत.
तिसरी फेरी
राहुल शेवाळे: 19518
अनिल देसाई: 12637
राहुल शेवाळे 6881 मतांनी राहुल शेवाळे आघाडीवर आहेत
यवतमाळ- दुसरी फेरी
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात
मविआ उमेदवार संजय देशमुख
12 हजार 358 मतांनी आघाडीवर
वर्धा - दुसरी फेरी
अमर काळे 16900
रामदास तडस 16700
ठाणे लोकसभा
पहिली फेरी
नरेश म्हस्के 1448 मतांनी आघाडी
नरेश म्हस्के मिळालेली मते - 16 261
राजन विचारे 160 68
उत्तर मध्य मुंबई
पहिली फेरी
उज्वल निकम - 8093, 2697 आघाडी
वर्षा गायकवाड - 5396
राहुल शेवाळे: 19518
अनिल देसाई: 12637
राहुल शेवाळे 6881 मतांनी राहुल शेवाळे आघाडीवर आहेत.
बीड : दोन मतदार संघात पंकजा मुंडे, चार मतदार संघात बजरंग सोनवणेंना आघाडीवर
पंकजा मुंडे -20396
बजरंग सोनवणे-21755
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत भारती पवार यांना 22,183 मते तर महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांना 23 हजार 343 मते मिळाली आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये तिसऱ्या फेरीची मतमोजणी सुरु, आत्तापर्यंत अपक्ष उमेदवार विशाल पाटील 22570 मतांनी आघाडीवर
दक्षिण मुंबईत अरविंद सावंत पोस्टल मतदानात 146 मतांनी आघाडीवर
दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव 739 मताने आघाडीवर आहेत.
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे सहा मतदारसंघात आघाडीवर आहेत.
बीडमध्ये बजरंग सोनावणे पहिल्या फेरीत बाराशे मतांनी आघाडीवर आहेत.
उत्तर मध्य मुंबईतून उज्वल निकम यांनी घेतली आघाडी. वर्षा गायकवाड पिछाडीवर आहेत.
शिरुरमधून अमोल कोल्हे ९ हजार तर विशाल पाटील ७ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. पुण्यातून रविंद्र धनगेकर आघाडीवर आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के आघाडीवर आहेत.
रायगडमधून सुनील तटकरे आघाडीवर आहेत. साताऱ्यातून शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पहिल्या फेरी अखेर भारती पवार 500 मतांनी आघाडीवर घेतली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघ : सिन्नर, इगतपुरी, देवळाली, नाशिक मध्य या तीन विधानसभा मतदारसंघात राजाभाऊ वाजे यांची आघाडी तर नाशिक पश्चिम नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात ५०-५० परिस्थिती आहे.
नागपूरमधून महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आघाडीवर आहेत.
शाहू महाराज यांनी पहिल्या फेरीत कोल्हापूरमधून १०३६ मतांची आघाडी घेतली आहे.
बीडमधून ८४६ मतांनी पंकजा मुंडे यांनी आघाडी घेतील असून सांगलीत अपक्ष विशाल पाटील यांनी आघाडी घेतली आहे.
धुळ्यातून भाजपचे सुभाष भामरे यांनी आघाडी घेतली आहे.
सांगलीतून पोस्टल मतदानात भाजप उमेदवार संजय काका पाटील आघाडीवर
मिहिर कोटेच्या ईशान्य मुंबई मधून आघाडीवर
जळगाव लोकसभा पोस्टल मत करण पवार 277 मतांनी पुढे पहिल्या फेरीत करण पवार आघाडीवर
टपाली मतमोजणीत रावेर लोकसभा मतदार संघात रक्षा खडसे यांची आघाडी
शिरुरमध्ये अमोल कोल्हे 6 हजार मतांनी आघाडीवर
अमरावतीत नवनीत राणा आघाडीवर
माढ्यात भाजपचे रणजित निंबाळकर आघाडीवर
सोलापुरातून प्रणिती शिंदे आघाडीवर
हातकणंगले लोकसभा मतदार संघ : सत्यजित आबा पाटील आघाडीवर, महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर
अमरावतीतून नवनीत राणा आघाडीवर तर सिंधुदुर्गमधून नारायण राणे यांनी आघाडी घेतली आहे.
शिरुरमधून अमोल कोल्हे सहा हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
सांगलीमधून महायुतीचे संजय पाटील यांची आघाडी कायम, तर सोलापुरातून प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत.
मतमोजणीला सुरुवात झाली असून बारामतीतून सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत, तर सुप्रिया पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.
Mumbai Lok Sabha Elections Results 2024 Updates : मुंबईचे पहिले कल हाती आले असून सहापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीने आघाडी घेतलीये.
अरविंद सावंत - द. मुंबई (आघाडीवर)
अमोल किर्तीकर - वायव्य मुंबई (आघाडीवर)
पियूष गोयल - उत्तर मुंबई (आघाडीवर)
राहुल शेवाळे - द.मध्य मुंबई (आघाडीवर)
वर्षा गायकवाड - उत्तर मध्य मुंबई (आघाडीवर)
संजय दिना पाटील - ईशान्य मुंबई (आघाडीवर)
उत्तर मध्य मुंबईतून उज्वल निकम यांनी घेतली आघाडी
हातकंणगलेमधून मविआच्या सत्यजीत पाटील यांनी घेतली आघाडी.
माढामधून महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांनी आघाडी घेतली आहे.
पालघरमधून मविआच्या भारती कामडी यांनी आघाडी घेतली आहे.
सोलापुरात मविआच्या उमेदवार प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत.
कोल्हापुरातून शाहू महाराज, तर सांगलीत संजय पाटील यांनी आघाडी घेतली आहे.
संभाजीनगर : पोस्टल मतांची मोजणी सुरू आहे. खैरे आणि भूमरे दोघांनाही मतांची आघाडी तर जलील पिछाडीवर असल्याचे दिसत आहेत.
मतमोजणीला सुरुवात झाली असून महाराष्ट्रात मविआ 10 तर महायुती 9 आघाडीवर आहेत.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना मतदान केंद्रात जाण्यापासून अडवल्याने छत्रपती संभाजी नगरमध्ये पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी वेळ संपल्याचं कारण देऊन काऊंटिंग एजंटलाही अडवले आहे.
मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. उमेदवारांच्या प्रतिनिधीने ईव्हीएम मशिनची माहिती आणि मतमोजणीसाठी काही कागदपत्रं आत सोबत नेण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ उडाला आहे.
राज्यासह देशभरातील सर्व जागांसाठीचे मतमोजणी ८ वाजता सुरू होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोण बाजी मारणार एक्झिट पोल कितपत खरे ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
निकालाआधी काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचं औक्षण करण्यात आलं. पुण्यात रविंद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे.
लोकसभा सार्वत्रिक निव़डणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 28 मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज असून, आज 4 जून रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी दिली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील 28- मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघाची मतमोजणी उदयांचल शाळा, गोदरेज वसाहत, विक्रोळी पूर्व येथे होणार आहे.
मतमोजणीसाठी एकुण सात सभागृह असून, ईव्हीएम मशीन मधील मतमोजणीसाठी सहा आणि टपाली मतमोजणीसाठी एक सभागृह आहे. सहा सभागृहात प्रत्येकी 14 टेबल असणार आहेत. प्रत्येकी एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहायक, एक सूक्ष्म निरीक्षक, एक मदतनीस असे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
टपाली मतमोजणी सभगृहात एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहायक, एक सूक्ष्म निरीक्षक, एक मदतनीस असे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. असे एकूण 99 टेबल असणार आहेत. तर मतमोजणीचे 22 राऊंड होणार आहेत. साधारण अधिकारी आणि कर्मचारी असे अंदाजे 800 मनुष्यबळ कार्यरत असून, पोलिसांचे मनुष्यबळ 500 ते 600 इतके असणार आहे.
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच मतमोजणी केंद्र आणि परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रात कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॅानिक डिव्हाईस गॅझेटस तसेच मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रात ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्रात येताना उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी यांनी त्यांना दिलेले ओळखपत्र सोबत बाळगावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी केले आहे.
आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्याआधी मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढलली आहे. पूर्व महामार्गावर कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय पेट्रोलिंग केली जात आहे.
निकालाच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर बॅनरबाजी. टीम राष्ट्रवादीचे कॅप्टनकूल अशी उपमा देत जयंत पाटलांचा वझीर म्हणून बॅनरवर उल्लेख. राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिणचे युवक जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी हे बॅनर लावले आहेत. तसंच ‘टप्यात आला की विनिंग शॉट’ 10 पैकी 7 जागा जिंकण्याचा बॅनरवर उल्लेख.
मतदान मोजणी केंद्र परिसरात होणारी गर्दी पाहता मुंबईत वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात काही बदल केले आहेत. 4 जून सकाळी ५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व वाहनांना तात्पुरत्या स्वरूपात बंदी करण्यात आली आहे. नेस्को सेंटर तीन मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. मतदारसंघाचे उमेदवार त्यांचे कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांची वाहने यांची गर्दी लक्षात घेता वाहतूक विभागानं हा बदल केला आहे. पोलिसांकडून एक प्रसिद्धी पत्रक काढून वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगितलं आहे.
उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पण आजच देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत.
पुण्यात भाजप आणि काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीच्या जल्लोषाची तयारी सुरु झाली आहे. त्यासाठी पेढे, लाडूची ऑर्डर देण्यात आली आहे. त्याचप्रमाणं ढोलीबाजा, डीजे लावला जाणार असून, मोठ्या प्रमाणात गुलालाची खरेदीही करण्यात आली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता. ४) होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. १ हजार १५८ इतक्या कर्मचाऱ्यांची त्यासाठी नियुक्ती केली असून, सकाळी ७ वा. स्ट्राँगरूमचा दरवाजा उघडला जाणार आहे. ८ वाजल्यापासून पोस्टलची मतमोजणी सुरू होईल. पहिला राउंड साडेदहा वाजेपर्यंत संपेल, तर मतदान प्रक्रिया पूर्ण व्हायला दुपारी अडीच वाजतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले. इथे क्लिक करा
पुणे : पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी (Pune Baramati Lok Sabha Counting) कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथील भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) गोदामामध्ये मंगळवारी (ता. ४) होणार आहे. यादिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोरेगाव पार्क परिसरात तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. तसेच, सरकारी आणि खासगी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. इथे क्लिक करा
लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर आहे. या निवडणूक निकालाची संपूर्ण तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निकालाचे प्रत्येक अपडेट ‘ई सकाळ’ आणि https://www.esakal.com या वेबसाईटवर पाहता येणार आहेत.
Maharashtra Lok Sabha Election Results Live Updates : लोकसभा निवडणूक 2024 ची मतदान प्रक्रिया सात टप्प्यात पूर्ण झाली. राज्यात एकूण पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. पहिल्या टप्प्यात 5 मतदारसंघात मतदान पार पडले. तर, शेवटच्या टप्प्यात एकूण 13 मतदारसंघात मतदान झाले. महाराष्ट्रात एकूण 48 जागांवर मतदान पार पडले.
त्यानंतर आता उद्या मंगळवारी ४ जून रोजी निवडणूक निकाल येणार आहेत. देशात सर्वच ठिकाणी निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रातील 48 मतदार संघातही मतमोजणी होणार आहे. 'एक्झिट पोल'मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी सरकार (Narendra Modi Government) बनणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेलाय, तर महाराष्ट्रात महायुतीलाही चांगल्या जागा मिळतील असा अंदाज आहे. महाराष्ट्रातील निवडणुकी मतमोजणीचे प्रत्येक अपडेट वाचा लाईव्ह ब्लॉगमध्ये...
अहमदनगर- ६६.६१ टक्के, अकोला- ६१.७९ टक्के, अमरावती- ६३.३७ टक्के, औरंगाबाद- ६३.०३ टक्के, भंडारा गोंदिया- ६७.०४ टक्के, बीड- ७०. ९२ टक्के, भिवंडी- ५९.८९ टक्के, बुलढाणा- ६२.०३ टक्के, चंद्रपूर- ६७.५५ टक्के, धुळे – ६०.२१ टक्के,गडचिरोली-चिमूर- ७१.८८ टक्के, हिंगोली – ६३.५४ टक्के, जळगाव- ५८.४७ टक्के, जालना- ६९.१८ टक्के, कल्याण- ५०.१२ टक्के, मुंबई उत्तर- ५७. ०२ टक्के, मुंबई उत्तर मध्य- ५१. ९८ टक्के, मुंबई ईशान्य- ५६.३७ टक्के. इथे क्लिक करा..
मुंबई उत्तर पश्चिम- ५४.८४ टक्के, मुंबई दक्षिण- ५०.०६ टक्के, मुंबई दक्षिण मध्य- ५३.६० टक्के, नागपूर- ५४.३२ टक्के, नांदेड- ६०. ९४ टक्के, नंदुरबार- ७०.६८ टक्के, नाशिक- ६०.७५ टक्के, पालघर- ६३.९१ टक्के, परभणी- ६२.२६ टक्के, पुणे- ५३.५४ टक्के, रामटेक- ६१.०१ टक्के, रावेर- ६४.२८ टक्के, सांगली- ५५.१२ टक्के, सातारा- ५७.३८ टक्के, शिर्डी- ६३.०३ टक्के, शिरूर- ५४.१६ टक्के.
सोलापूर- ५३.९१ टक्के, ठाणे- ५२.०९ टक्के, वर्धा- ६४.८५ टक्के, यवतमाळ- वाशीम-६२.८७ टक्के, बारामती- ५३.०८ टक्के, कोल्हापूर- ५६.१८ टक्के, लातूर- ६३.३२ टक्के, मळा- ५४.७२ टक्के, मावळ-५४.८७ टक्के, उस्मानाबाद- ६२.४५ टक्के, रायगड- ५६.७२ टक्के, रत्नागिरी- सिंधुदुर्ग- ५५.६८ टक्के आणि सांगली- ६२.८४ टक्के.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.