Latest Maharashtra News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Latest Marathi Live Updates 12 October 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updatesesakal
Updated on

Mumbai Live : उद्धव ठाकरे, महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही - बावनकुळे

"आमचं सरकार आलं की महायुती सरकारचे निर्णय रद्द करू" अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावरून केली आहे. त्यामुळं माझ्या लाडक्या बहिणींनो सावध व्हा. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर लाडकी बहिण योजना बंद पाडली जाईल. याआधी काँग्रेसनं लाडकी बहिण योजनेला विरोध केला. आता उद्धव ठाकरेही तीच भाषा बोलत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर लाडकी बहिण योजना, अर्ध्या तिकीटात प्रवास, मोफत वीजबिल, एक रुपयात पीक विमा, शेतकऱ्यांना मिळणारा किसान सन्मान निधी बंद केला जाईल. त्यामुळं सावध व्हा ! उद्धव ठाकरे, तुम्ही केवळ भाजपा आणि महायुती सरकारच्या द्वेषापोटी आमच्या भगिणींच्या पोटावर पाय देऊ पाहत आहेत. सामान्य जनतेला उपाशी ठेऊ पाहत आहेत, ही जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असं ट्विट बावनकुळे यांनी केलं आहे.

Mumbai Live : सरकार आल्यास महायुतीनं घेतलेले चुकीचे निर्णय रद्द करणार - ठाकरे

मित्र, उद्योगांचे अकृषक कर रद्द केले. थोडे दिवस थांबा ‌दोन महिन्यांत आमचं सरकार येतंय. आम्ही जे जे चुकीचे निर्णय घेतलेत ते रद्द केल्याशिवाय राहणार नाही. अधिकाऱ्यांनो तुम्ही यांच्या पापात‌ सहभागी होऊ नका. माझे‌ पालिका आयुक्तांना आवाहन आहे तीन लाख कोटी उधळून टाकले, कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी ‌करतात.

Dharashiv Live : देवीच्या दर्शनाला निघालेल्या रिक्षाच्या अपघातात जखमी झालेल्या महिलेचाही मृत्यू

जेवळी (ता. लोहारा, जि. धाराशिव) येथील महिला चिवरी येथे देवी दर्शनाला जात असताना झालेल्या टमटम रिक्षा व कारच्या अपघातात जखमी झालेल्या आणखीन एक महिलेचा शनिवारी (ता.१२) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू झाल्याचे आकडा आता दोन झाली आहे.

Gujarat Wall Collapse Live : गुजरात दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना पीएम मोदींकडून मदतीचा हात

गुजरातमध्ये भिंत कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दोन लाखांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे.

Panvel News Live : पनवेलकरांच्या मालमत्ता करावरील शास्ती माफ

पनवेल, ता. १२ (बातमीदार) : खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या पाठपुराव्यामुळे पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कराची शास्ती माफ करण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या चाचणीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शास्ती माफ करण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे पनवेलकरांच्या मालमत्ता करावरील बोजा काहीअंशी कमी होणार आहे.

Suraj Chavan Live : 'बिग बॉस मराठी'चा विजेता सूरज चव्हाण अजितदादांच्या भेटीला

बिग बॉस मराठीच्या पाचव्या हंगामाचा विजेता सूरज चव्हाण हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाला आहे, यावेळी सूरज आणि अजित पवार यांच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सूरजचा सत्कार देखील केला.

Dasara Live : किरकोळ बाजारात झेंडू दोनशे पार! फूल विक्रेत्यांकडून भाविकांची चांगलीच लूट

तुर्भे, ता. १२ (बातमीदार) : अवकाळी पावसाचा झेंडूच्या फुलांच्या मळ्यांनाही फटका बसला आहे. परिणामी दसऱ्यानिमित्त बाजारात विक्रीस असलेल्या झेंडूच्या फुलांनी शंभरी पार केली असून किरकोळ बाजारात दोनशे रुपयांनी विक्री होत आहे. खंडेनवमी आणि दसरोत्सवाचा फायदा घेत व्यापारी आणि किरकोळ फूल विक्रेत्यांकडून भाविकांची चांगलीच लूट करण्यात आली.

Gujarat News Live : गुजरातमध्ये खासगी कंपनीची भिंत कोसळली; बचावकार्य सुरू

Gujrat Live : गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील कडी तालुक्यातील जसलपूर गावाजवळ एका खासगी कंपनीची भिंत कोसळल्यानंतर बचावकार्य सुरू आहे.

Raj Thackeray Live : मनसेच्या आरोग्य शिबिराला राज ठाकरे यांनी दिली भेट

घाटकोपर मध्ये मनसे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या वतीने आयोजित आरोग्याची महायात्रा या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. या आरोग्य शिबिरात आत पर्यंत २० हजार पेक्षा जास्त नागरिकांनी हजेरी लावून आपली तपासणी करुन घेतली. मुंबई मधील नामांकित तज्ञ या शिबिरात सेवा देत आहेत.

राज ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. मोठी झोपडपट्टी असलेल्या या विभागात आरोग्य सुविधांची वाणवा असल्याने या शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला आहे. याआधी आम्ही ईशान्य मुंबईत तीन जागा जिंकलो होतो, आता ही राज ठाकरे यांनी उमेदवारी दिल्यास घाटकोपरची जागा जिंकून दाखवू अशी प्रतिक्रिया या वेळी या शिबिराचे आयोजक गणेश चुक्कल यांनी दिली.

Parbhani Live Update: परभणी श्री शिवप्रतिष्ठान आणि विश्व दहा हिंदूच्यावतीनंदांच्या निमित्तान महादौड उत्तर

Manoj Jarange  Live Update: 'माझा समाज माझासाठी झिजला..'- मनोज जरांगे

Haryana government formation Live Update: १७ ऑक्टोबर रोजी पार पडणार हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा

१७ ऑक्टोबर रोजी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.

VijayaDashami Live Update: राजनाथ सिंह यांनी दसऱ्यानिमित्त दार्जिलिंगमधील सुकना कँट येथे केली शस्त्रपूजा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दसऱ्यानिमित्त पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमधील सुकना कँट येथे शस्त्रपूजा केली आणि लष्कराच्या जवानांसोबत सण साजरा केला.

पुण्यात पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं भव्य पथसंचलन

Raj Thackeray live: राज ठाकरेंचा उद्या मेळावा, आज केली घोषणा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज उद्या मेळावा घेणार असल्याचे घोषणा केली आहे.

गोरक्षपीठाधीश्वर योगी आदित्यनाथ गोरखपूरच्या विजयरथावर स्वार होणार, भव्य शोभायात्रेचं करणार नेतृत्व

गोरखपूर : विजयादशमीचा सण आज गोरखनाथ मंदिरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. गोरखपीठाधिश्वर योगी आदित्यनाथ सकाळी गुरु श्री गोरक्षनाथ यांची विशेष पूजा करतील आणि संध्याकाळी विजयरथावर स्वार होऊन पारंपारिक मिरवणुकीचे नेतृत्व करतील.

Raj Thackeray LIVE : सत्ताधाऱ्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला, आता वचपा काढण्याची वेळ आलीये - राज ठाकरे

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सकाळी पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला, तुमची प्रतारणा केली. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, आता वचपा काढण्याची वेळ आली आहे. इथे क्लिक करा

Sanjivraje Naik Nimbalkar LIVE : आम्ही निर्णय घेतलाय, तुतारी हाती घ्यायची - संजीवराजे

फलटण : संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, ‘‘आम्ही निर्णय घेतलाय. आमदार दीपकराव चव्हाण व मी स्वत: शरद पवारांकडे १४ तारखेला वेळ मागणार आहोत. त्यांनी १४ तारखेला वेळ द्यावीत. त्यांच्या उपस्थितीत आम्ही सर्व कार्यकर्त्यांसमवेत आपल्याच घरी चाललो आहोत. दुसरीकडे कुठे नाही. या निर्णयात कोणताही बदल होणार नाही. सर्वांनी ताकदीने उपस्थित राहावे.’’

Mumbai Traffic Update LIVE : ठाकरे-शिंदे यांच्या मेळाव्यानिमित्त मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल

मुंबईत आज शिवसेनेच्या दोन्ही गटाचे (ठाकरे आणि शिंदे) दसरा मेळावे होणार आहे. ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादरमधील शिवाजी पार्क तर, शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सज्ज झाले असून शहरात तब्बल १५ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय, वाहतुकीत देखील अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. काही रस्ते दिवसभर बंद राहणार आहेत.

बीएसएफने सीमेपलीकडून हेरॉईन, पिस्तूल घेऊन जाणाऱ्या ड्रोनला केलं लक्ष

पंजाब : फिरोजपूर येथे बीएसएफने सीमेपलीकडून हेरॉईन आणि पिस्तूल घेऊन जाणारे ड्रोन पाडले. कारवाईत पोलिसांनी 500 ग्रॅम हेरॉईन, एक पिस्तूल जप्त केले आहे.

Sangli Collector LIVE : रेल्वे पूल कामासाठी वसगडे मार्गात बदल

सांगली : मध्य रेल्वेच्या भिलवडी-नांद्रे स्थानकादरम्यान किर्लोस्करवाडी रेल्वे फाटक येथील वसगडे गाव ते नागाव, निमणी गावादरम्यान राज्य मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. १३ ते १७ ऑक्टोबरदरम्यान हा बदल करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले.

Central Government LIVE : केंद्र सरकारकडून कर्नाटकाला ६,४९८ कोटी मंजूर

बंगळूर : वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने विविध राज्यांना एकूण एक लाख ७८ हजार १७३ कोटींचा कराचा हप्ता मंजूर केला आहे. त्यापैकी कर्नाटकला ६,४९८ कोटी मिळाले आहेत. उत्तर प्रदेशला ३१ हजार कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे. सर्वाधिक कर मिळालेले राज्य ठरले आहे. सणासुदीच्या हंगामामुळे आणि राज्य सरकारांना विकास प्रकल्पांवर खर्च करण्यासाठी मदत करण्यासाठी केंद्र सरकारने आगाऊ अतिरिक्त हप्ता दिला आहे.

Weather Update LIVE : मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भातील 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; आज जोरदार पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर तसेच रायगड जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही तुफान पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे जालना, बीड विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागात तुफान पावसाची शक्यता आहे. नंदूरबार, धुळे, सातारा, कोल्हापूरमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे.

Udhayanidhi Stalin LIVE : तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतली रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची भेट

तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. जखमींवर चेन्नईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mysore Darbhanga Express Accident LIVE : म्हैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेस-मालगाडी यांच्यात जोराची धडक, दुर्घटने 19 प्रवासी जखमी

म्हैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेसचे 12 ते 13 डबे तामिळनाडूतील कवरापेट्टईजवळ रुळावरून घसरले. एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात धडक झाली. या घटनेत 19 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना रात्री 20.30 च्या सुमारास घडली. इथे क्लिक करा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची आज सलामी; ठाकरे, शिंदेंचे मुंबईत तर बीडमध्ये मुंडे, जरांगेंचा मेळावा

Latest Marathi Live Updates 12 October 2024 : कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात आज सायंकाळी शाही दसरा सोहळा होणार आहे. तसेच जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा महोत्सवातील सर्वांत आकर्षक अशी ‘जंबो सवारी’ होणार आहे. नागपूरमधील दीक्षाभूमीवर आज ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन काशाय वस्त्रधारी भंतेच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. विधानसभा निवडणुकीची #ElectionWithSakal तारीख येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात आज राजकीय दसरा मेळाव्याच्या निमित्ताने प्रचाराचे नारळ फुटणार आहेत. ‘टाटा ट्रस्ट’च्या अध्यक्षपदी दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील दोन दिवस हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.