नागपूरचं नाव बदनाम करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका 3 वर्षे झालेल्या नाहीत. दर पाच वर्षांनी निवडणुका होणं बंधनकारक असताना, महापालिकेच्या लोकांनी व्यवस्था रेशीमबाग पध्दतीनं संपवली. मी सत्तेवर आलो तर 24 तासांत निवडणून लावतो म्हणणारे आता अडीच वर्षे सत्तेत राहून निवडणुका लावल्या नाहीत. नागपूरचा सत्यानाश करणारी व्यवस्था लावली आहे. मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री होऊन काहीच काम केलेलं नाही. आता हे चालणार नाही, माझाकडं असलेल्या रिपोर्टप्रमाणं देवेंद्र फडणवीस हे पराभूत होणार आहेत.