Latest Maharashtra News Updates: दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Breaking Marathi News live Updates 14 October 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updatesesakal
Updated on

Delhi News : AICC ने लोकसभा निहाय नेमलेल्या निरीक्षकांची उद्या बैठक होणारेय

AICC ने लोकसभा निहाय नेमलेल्या निरीक्षकांची उद्या बैठक पार पडणार आहे. उद्या सकाळी ९ वाजता ही बैठक टिळक भवन या ठिकाणी पार पडणार आहे. नेमलेल्या निरीक्षकाने काँग्रेसच्या वाटेला येण्याची शक्यता असलेल्या मतदार संघात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे तर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. AICC चे निरीक्षक हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटीवार आणि वर्षा गायकवाड यांच्या उपस्थित ही बैठक पार पडेल.

Mumbai Live : विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्यांक समाजाला योग्य प्रतिनिधित्व द्या - नसीम खान

अल्पसंख्यांक मतदारांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्यांक समाजाला योग्य प्रतिनिधित्व द्यावे. अल्पसंख्यांक उमेदवार निवडून येण्याची क्षमता आहे, अशा मतदारसंघात अल्पसंख्यांक उमेदवारांना संधी द्यावी. काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाच्या बैठकीत माजी मंत्री नसीम खान यांनी ही मागणी केली आहे.

Mumbai Live : भाजपच्या पराभूत उमेदवारांना पुन्हा उमेदवारी नाही

भाजपच्या पहिल्या यादीमध्ये वर्तमान आमदारांना पुन्हा एकदा टिकीट देण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. तर काही आमदारांचा पत्ता कट केला जाणार आहे. खासदारकी लढलेल्या आणि पराभूत झालेल्या नेत्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. पहिल्या यादीमध्ये मंत्री आणि जेष्ठ आमदारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. काही वर्तमान आमदारांची तिकीट कापण्याची शक्यता असल्याची माहिती सामच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Mumbai Live : काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे विरोधात गुन्हा दाखल

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आरक्षणाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा खोटा व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे कार्यकर्ते रुपेश मालुसरे यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

Nagpur Live : रामटेकच्या घोटिटेक इथं 4 विद्यार्थी तलावात बुडाले

नागपूरमधील रामटेक इथं एका मोठ्या कालव्यात ४ विद्यार्थी तलावात बुडाले आहेत. सर्व विद्यार्थी सात ते अकरावीच्या वर्गात शिकत होते. इंदिरा गांधी वस्तीगृहातील हे विद्यार्थी असल्याची माहिती मिळते आहे.

FaltanLive : संजीव, अनिकेत निंबाळकर, दीपक चव्हाण यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

संजीव निंबाळकर, अनिकेत निंबाळकर तसंच दीपक चव्हाण यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश सोहळा पार पडला. पक्षाचे प्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत फलटणमध्ये जाहीर सभा घेत हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी मोठ्या प्रमाणावर फलटणकर उपस्थित होते.

Mumbai Live : उद्धव ठाकरेंना उद्या मिळणार डिस्चार्ज; आजचा दिवस रुग्णालयातच

उद्धव ठाकरे यांच्यावर आज खासगी रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यामुळं त्यांना आज वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं त्यांचा आजचा पूर्ण दिवस रुग्णालयातच जाणार आहे. उद्या त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे.

डोंबिवलीमध्ये विजेच्या गडगडाटासह पाऊस

डोंबिवलीमध्ये विजेच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला आहे.

तिसरा अटक आरोपी प्रवीण लोणकर याला मुंबई न्यायालयाने २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

तिसरा अटक आरोपी प्रवीण लोणकर याला मुंबई न्यायालयाने २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Mumbai News: ओव्हरटेक करण्यावरून झालेल्या भांडणातून व्यक्तीला बेदम मारहाण

मुंबईतील गोरेगाव परिसरात ओव्हरटेक करण्यावरून झालेल्या भांडणातून आकाश में नावाच्या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून 9 आरोपींना अटक केली. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

तिसरा आरोपी प्रवीण लोणकर याला वैद्यकीय तपासणीनंतर एस्प्लेनेड न्यायालयात हजर केले जाणार

तिसरा आरोपी प्रवीण लोणकर याला वैद्यकीय तपासणीनंतर एस्प्लेनेड न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दिल्लीतील भाजप मुख्यालयात महाराष्ट्र कोअर ग्रुपची बैठक सुरू

दिल्लीतील भाजप मुख्यालयात महाराष्ट्र कोअर ग्रुपची बैठक सुरू झाली आहे.

महाराष्ट्र कोअर ग्रुपच्या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजप मुख्यालयात दाखल

महाराष्ट्र कोअर ग्रुपच्या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजप मुख्यालयात दाखल झाले आहे.

15 ऑक्टोबर रोजी मुंबई-NY फ्लाइटचे वेळापत्रक बदलले

15 ऑक्टोबर रोजी मुंबई-NY फ्लाइटचे वेळापत्रक बदलले आहे.

उद्धव ठाकरेंवर रिलायन्स रूग्णालयात यशस्वी अँजिओप्लास्टी

उद्धव ठाकरेंवर रिलायन्स रूग्णालयात यशस्वी अँजिओप्लास्टी झाली आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा जर्मनीत दाखल

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा जर्मनीत दाखल झाले आहेत. रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिटसाठी गुंतवणूकदारांना आमंत्रित करण्यासाठी ते येथे आले आहेत. जर्मनीत राहणाऱ्या राजस्थानी लोकांचीही त्यांनी भेट घेतली

CM Pushkar Singh Dhami Live Update: देवभूमी उत्तराखंडचे मूळ स्वरूप अबाधित राहिले पाहिजे-  पुष्कर सिंह धामी

उत्तराखंडमध्ये लँड, थूक जिहादला परवानगी दिली जाणार नाही" या त्यांच्या विधानावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणतात, "देवभूमी उत्तराखंडचे मूळ स्वरूप अबाधित राहिले पाहिजे. आम्ही लँड जिहाद, लव्ह जिहाद आणि थूक (थुक) यांच्यावर कारवाई करू. जिहाद

Swapnil Kusale Live: ऑलिम्पिकपटू स्वप्नील कुसाळेला सरकारकडून 2 कोटी रुपयांचा धनादेश

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात स्वप्नील कुसाळेानं कांस्य पदक जिंकलं. यानिमित्तानं राज्य सरकारनं 2 कोटी रुपयांचा धनादेश देऊन केलं सन्मानित.

 BJp भाजपच्या CEC ची बैठक होण्याची शक्यता

उद्या भाजपच्या CEC ची बैठक होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या भाजपच्या कोअर कमिटी बैठकीनंतर उद्या महत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे.

Pune live : बोपदेव घाटात पोलिसांकडून रात्रीच्या वेळेस गस्त

बोपदेव घाटात पोलिसांकडून रात्रीच्या वेळेस गस्त सुरु केली आहे. पुण्यातील बोपदेव घाट लैंगिक अत्याचारानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झैाले आहेत.

Nadi Jod Prakalpa Live: दोन नदी जोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी

दमण गंगा आणि गोदावरी नदी जोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

Uddhav Thackeray Live :  उद्धव ठाकरे एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल

उद्धव ठाकरे एच एन रिलायन्स रुग्णालयात रुटीन चेक अपसाठी सकाळी पोहोचले आहेत

Pune Live Updates: हर्षवर्धन पाटलांच्या अडचणी वाढल्या काँग्रेस कडून शरद पवारांना पत्र

हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये काँग्रेस भवनची इमारत व जागा ताब्यात ठेवली आहे. ती जोपर्यंत काँग्रेस पक्षाच्या ताब्यात देत नाहीत, तोपर्यंत त्यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्याबाबत विचार करू नये, याउलट ही बाब संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यात येईल, अशी भूमिका जिल्हा काँग्रेसने घेतली आहे.

Mumbai Live Updates: मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी

राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी. आज रात्री बारा वाजल्यापासून होणार अंमलबजावणी.

Jitendra Singh Live Updates: जैव प्लास्टिक उत्पादनाच्या जेजुरी इथल्या पथदर्शी प्रकल्पाचं केंद्रीय अणु ऊर्जा राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्याच्यादृष्टीनं जैव प्लास्टिक उत्पादनाच्या जेजुरी इथल्या पथदर्शी प्रकल्पाचं केंद्रीय अणु ऊर्जा राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. जैव प्लास्टिक उत्पादनांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याचा हा प्रयत्न आहे.

Navi Mumbai Live Updates: एमआरआय कॉम्प्लेक्सच्या 47 क्रमांकाच्या इमारतीच्या 17 व्या मजल्यावरील टेरेसवर भीषण आग

नवी मुंबई: नवी मुंबईतील एमआरआय कॉम्प्लेक्सच्या 47 क्रमांकाच्या इमारतीच्या 17 व्या मजल्यावरील टेरेसवर भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत.

Kolhapur Live Updates: संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या इमारतीच्या पुनर्बांधणी कामाचं भूमिपूजन

कोल्हापूरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या इमारतीच्या पुनर्बांधणी कामाचं भूमिपूजन.

Air India Flight Live: बॉम्बच्या धमकीनंतर एअर इंडियाचे विमान दिल्लीकडे वळवले

14 ऑक्टोबर रोजी मुंबई ते JFK कडे जाणाऱ्या फ्लाइट AI119 ला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर सरकारच्या सुरक्षा नियामक समितीच्या सूचनेनुसार ती दिल्लीकडे वळवण्यात आली.

Airport in Delhi LIVE : बॉम्बच्या धमकीनंतर दिल्लीत विमानतळावर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

नवी दिल्ली : दिल्लीत विमानतळावर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानाचं दिल्लीत इमार्जन्सी लँडिंग झालं. विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीनंतर विमानाचं इमार्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

Maharashtra Assembly Elections LIVE : कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता, मंत्रिमंडळाची आज बैठक

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. आज रविवारच्या सुटीच्या दिवशीही सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय प्रसिद्ध केले असून उद्या सकाळीच मंत्रिमंडळ बैठकही आयोजित केली आहे. ही आचारसंहिता लागू होण्याचीच चाहूल असल्याचे मानले जात आहे. राज्यातील काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, सोमवारी राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

Muthyalamma Temple LIVE : हैदराबादमध्ये मुथ्यालम्मा मंदिरातील मूर्तीची तोडफोड, नागरिकांत संताप

हैदराबाद, तेलंगणा : हैदराबादमधील पासपोर्ट कार्यालयाजवळील कुरमागुडा येथील मुथ्यालम्मा मंदिरातील मूर्तीची तोडफोड करण्यात आली. यानंतर स्थानिकांनी एका व्यक्तीला पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस सध्या घटनास्थळी आहेत.

Weather Update LIVE : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज जोरदार पावसाची शक्यता

दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. काल रविवारी काही भागात पावसाचा जोर ओसरला होता. आज पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज (ता. १४) कोकणातील पालघर, ठाणे, उत्तर महाराष्ट्र धुळे, नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे.

Baba Siddique Murder LIVE : अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर कडक सुरक्षा तैनात

मुंबई : अभिनेता सलमान खानचे निवासस्थान असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर ही सुरक्षा वाढवली गेलीये.

Hezbollah Drone Strikes Israel LIVE : इस्रायलवर हिजबुल्लाहचा सर्वात प्राणघातक ड्रोन हल्ला, लष्करी तळाला लक्ष्य; 4 जवान शहीद, 70 जखमी

हिजबुल्लाह आणि इस्रायलमधील युद्ध प्राणघातक होत आहे. हिजबुल्लाने दोन दिवसांत इस्रायलवर दोन ड्रोन हल्ले केले आहेत. रविवारी हिजबुल्लाहच्या ड्रोन हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये विध्वंस झाला. हिजबुल्लाने आपल्या ड्रोनने इस्रायलमधील लष्करी तळाला लक्ष्य केले. या हल्ल्यात सुमारे 70 जवान जखमी झाल्याची माहिती आहे. इस्रायलवरील हिजबुल्लाहचा हा सर्वात प्राणघातक हल्ला आहे.

Sharad Pawar NCP LIVE : आमदार चव्हाण, संजीवराजेंचा समर्थकांसह पवारांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश

आसू/ जाधववाडी : कोळकी (फलटण) येथे आज (सोमवार) शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण विधानसभेचे आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, अनिकेतराजे नाईक- निंबाळकर, विश्वजितराजे नाईक- निंबाळकर आणि फलटण विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. दुपारी तीन वाजता कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात हा पक्षप्रवेश होईल.

Andhra Pradesh News LIVE  : आंध्र प्रदेशात कागद कारखान्यात सामूहिक बलात्कार

श्री सत्यसाई : आंध्र प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या कागद कारखान्यात चार जणांनी दोन महिलांवर बलात्कार केला. या कारखान्यातील खोलीत ज्येष्ठ जोडपे मुलगा व सुनेसह राहत होते. चौघांनी खोलीत प्रवेश करत वडील व मुलाला मारहाण केली. त्यानंतर वृद्ध महिलेसह तिच्या सुनेवर बलात्कार केला. चार आरोपींपैकी दोन जण कारखान्यात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात.

Assembly Election BJP LIVE : कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा! जागा वाटपाबाबत भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होणार, हे आता स्पष्ट झाल्याने महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपची उद्या (ता. १४) निवडणुकीच्या रणनीतीबाबत आणि उमेदवार निश्‍चितीबाबत दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी राज्यातील भाजपचे प्रमुख नेते जाणार आहेत.

Baba Siddique Murder LIVE : राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शहरात तर्कवितर्कांना उधाण

Latest Marathi Live Updates 14 October 2024 : राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शहरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. कुख्यात लॉरेन्स बिश्‍नोई याची संघटित टोळी या हत्येमागे असावी, असा एक कयास आहे. तसेच अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. सूर्य ग्रहणाच्यावेळी चंद्र सूर्याला आपल्यामागे झाकतो. त्याचप्रमाणे आज चंद्र शनी ग्रहाला आपल्या मागे झाकणार आहे. संपूर्ण भारतातून शनीचे हे पिधान सोमवारी रात्री दिसू शकणार आहे. ज्येष्ठ नाट्य लेखक, दिग्दर्शक, निर्माता तसेच कवी आनंद म्हसवेकर (वय ६९) यांचे निधन झाले. आंध्र प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या कागद कारखान्यात चार जणांनी दोन महिलांवर बलात्कार केला. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होणार, हे आता स्पष्ट झाल्याने महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपची आज निवडणुकीच्या रणनीतीबाबत आणि उमेदवार निश्‍चितीबाबत दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. त्याचबरोबर पुढील दोन दिवस हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.