ISSF विश्वचषक फायनल २०२४ च्या पहिल्या दिवशी सोनम उत्तम मस्करने रौप्यपदक जिंकले आणि चीनने तीन सुवर्ण जिंकले आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट 3 महिन्यांपूर्वीच रचला होता, आरोपी बाबा सिद्दिकीच्या घरी अनेकवेळा शस्त्राशिवाय गेले होते. मुंबई क्राईम ब्रँचकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे संपूर्ण नियोजन पुण्यात करण्यात आले होते. मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत 15 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत, ज्यात घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अनेक प्रत्यक्षदर्शींचा समावेश आहे.
झारखंड निवडणूक 2024 च्या CEC बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात पोहोचले आहेत.
आदित्य ठाकरे म्हणाले की, "दोन वर्षांच्या लुटीची जागा मोठमोठ्या निर्णयांनी घेता येणार नाही, मोठ्या निर्णयांनी लोकांना फसवणार नाही. जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे, भाजप आणि शिंदे यांना विचारा, कोण एकमेकांची खुर्ची खेचत आहे."
निवडणूक आयोगाने वायनाड लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे आता प्रियांका गांधी निवडणूकीत पदार्पण करण्याची शक्यता आहे.
"विरोधक जिंकले की ईव्हीएम चांगली असते, निवडणूक आयोग चांगला असतो आणि न्यायालय चांगले असते. पण जेव्हा निकाल त्यांच्या बाजूने जात नाही, तेव्हा ईव्हीएम खराब होतात... लोक ईव्हीएम खराब आहे, निवडणूक आयोग खराब आहे, अशी दुटप्पी भूमिका महाराष्ट्राला माहीत आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काल अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच त्यांना आराम करण्याचा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला आहे.
विरार ता.(बातमीदार) : विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजणार असल्याने लक्षात घेऊन आज बहुजन विकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक विरार येथे पार पडली. या बैठकीत पालघर जिल्ह्यातील सहा जगाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील सहाच्या सहा जागा लढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्याचसोबत या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी वसई मधून निवडणूक लढवावी असा आग्रह कोअर कमिटीतील पदाधिकारी यांनी हितेंद्र ठाकूर याना केला.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. महाविकास आघाडीनं १७ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावेळी मविआच्या जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्याचा स्वाभिमान आणि धर्म बुडवणार हे सरकार आहे. जनता यांना नक्की बुडवणार. लोकसभेच्या निवडणुकीनंतर वातावरण महविकास आघाडीसाठी अनुकूल असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. प्रचंड पैसा यांच्याकडं आहे, ३० टक्के कमिशनवालं हे सरकार आहे. पैशाचा अमाप वापर या निवडणुकीत होणार आहे. गुजरातला सगळं अर्पण करणाऱ्या या सरकारला जनता माफ करणार नाही, जनता कोणत्याही अमिषाला बळी पडणार नाही. जागावाटप चर्चा अंतिम टप्प्यात आलं आहे. २२२ जागांवर एकमत झालं आहे. उर्वरित जागांवर परवा बैठक होणार आहे.
मालाड पश्चिमेकडील महापालिकेच्या जुलूस वाडी येथील आपला दवाखान्याला आग लागल्याचे समजत आहे. सुदैवाने आगीत कोणतेही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
काँग्रेसकडून हिरामण खोसकर यांचे सहा वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. हिरामण खोसकर यांनी काल अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
धान आणि भरडधान्य खरेदीत शेतकर्यांवर अन्याय होऊ म्हणून राज्यस्तरावर डिस्ट्रेस सेल होणार आहे.
आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमतीत कुणी खरेदी करीत असेल तर हा सेल काम करणार.
धान तसेच ज्वारी, बाजरी, मका, रागी याची खरेदी
फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया नोडल एजन्सी
बिगर आदिवासी क्षेत्रात पणन महासंघ मुख्य अभिकर्ता
आदिवासी क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळावर जबाबदारी
मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश, जिल्हाधिकार्यांवर जबाबदारी, शासन आदेश जारी
ISSF वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या सोनम उत्तम मस्कर हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकले.
''जे बोलेल ते करून दाखवणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. लोकसभेची उमेदवारी मिळाली होती पण मी ती बहाल केली आणि माझी पत्नी देखील लोकसभा निवडणूक लढली. शिंदे यांनी हळद संशोधन महामंडळचे अध्यक्ष पदही मला दिलेलं आहे. शिवाय आज विधान परिषदेचे सदस्यत्व देखील दिले. आमचं पुनर्वसन एकनाथ शिंदे यांनी केलं.'' अशा शब्दात हेमंत पाटील यांनी शिंदेंचे आभार मानले.
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज होणारी महायुतीची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच पुढील पत्रकार परिषदेचा दिनांक आणि स्थळ कळवण्यात येणार आहे.
राजकारणाची पातळी किती खाली जाते याचे उदाहरण म्हणजे 7 आमदारांचा शपथविधी, आम्ही दिलेली 12 नावे कुठल्या निकषात बसतात त्यासाठी यादी प्रलंबित ठेवली नंतर ती यादी गायब झाली. उच्च न्यायालयाने सर्व गोष्टींची पुष्टी केली पाहिजे असे म्हटले होते,अशा शब्दात सचिन अहीर यांनी सरकारवर टीका केली.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी सध्या न्यायप्रविष्ठ असताना राज्यपालांनी 7 आमदारांची यादी निश्चित केली आहे. आज या 7 आमदारांचा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडतोय. याला कोल्हापुरातील उबाठा शिवसेनेचे नेते सुनील मोदी यांनी आक्षेप नोंदवला आहे.
काँग्रेस निरीक्षकांची थोड्याच वेळात बैठक बैठक होणार आहे. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, टिळक भवनात दाखल झाले आहेत.
अतुल परचुरेंच पार्थिव त्यांच्या दादर येथील निवासस्थानी आणण्यात आलं आहे. काही वेळ पार्थिव त्यांच्या निवासस्थानी ठेवलं अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल.
मुसळधार पावसाचा अंदाज पाहता तामिळनाडू सरकारने चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक सुरू आहे. राज्यात नागरिकांचं जीवनमान उंचावणारे अनेक प्रकल्प आणि विकासकामं सुरु आहेत, या विकासकामांना राजकीय पक्षांनी सहकार्य करावं असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
महायुतीकडून 7 जणांची राज्यपाल नियुक्त आमदार पदी वर्णी लागली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत राजपत्र जारी करण्यात आलं आहे. यामध्ये भाजपकडून 3 तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 2 जणांना संधी देण्यात आली आहे.
दुपारी १२ वाजता विधीमंडळतात उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे.
पंजाब ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतपेटीद्वारे सरपंच आणि पंचपदासाठी मतदान होत आहे.
आज दुपारी 3.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची घोषणा होण्याची शक्यता आहे.
सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (मंगळवार) सकाळी दहा वाजता आपल्या दरे (ता. महाबळेश्वर) गावी येत आहेत. सायंकाळी चार वाजता पुन्हा मुंबईला जाणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे सकाळी दहा वाजता ठाणे येथून हेलिकॉप्टरने साताऱ्याकडे निघतील. सकाळी पावणेदहा वाजता दरे हेलिपॅड येथे त्यांचे आगमन होईल. त्यानंतर मोटारीने ते निवासस्थानाकडे जातील. सकाळी अकरा ते दुपारी पावणेचार वाजेपर्यंत दरे येथे राखीव राहणार आहे. चार वाजता ते हेलिकॉप्टरने दरे हेलिपॅडवरून राजभवन हेलिपॅड, मुंबईकडे रवाना होतील. सायंकाळी पावणेपाच वाजता त्यांचे राजभवन हेलिपॅडवर आगमन होईल. तेथून ते मोटरीने वर्षा निवासस्थानाकडे जातील व तेथे राखीव राहील.
आज दुपारी १२ वाजता ७ आमदारांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. विधीमंडळात उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडणार आहे. महायुतीकडून 7 जणांची राज्यपाल नियुक्त आमदारपदी वर्णी लागली आहे. महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत राजपत्र जारी करण्यात आलं आहे.
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : मारेकऱ्यांना बाबा सिद्दिकींची ओळख पटवण्यासाठी बॅनरवरील फोटो दाखवण्यात आला होता. आरोपींच्या चौकशीत खुलासा झाल्याचा मुंबई पोलिसांचा दावा आहे. आतापर्यंत गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप आणि प्रवीण लोणकर यांना अटक करण्यात आली आहे. तर, अन्य अन्य तीन आरोपी अद्याप फरार आहेत.
नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी कर्जरोखे घोटाळ्याच्या वसुली सुनावणीला सुरुवात झालीये. सुनील केदार या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत. निवृत्त हायकोर्ट न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या मार्गदर्शनात ही सुनावणी सुरु आहे. चौकशी समिती 17 ऑक्टोबरपर्यंत नागपुरात सुनावणी करणार आहे.
नवी दिल्ली : आज आणि उद्या एस. जयशंकर पाकिस्तान दौऱ्यावर जात आहेत. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीसाठी जयशंकर पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीसाठी पाकने आमंत्रण दिलं होतं. मात्र, मोदी यांच्या ऐवजी एस जयशंकर बैठकीसाठी जाणार आहेत.
कोलंबो : अदानी कंपनीमार्फत श्रीलंकेमध्ये पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यास दिलेल्या परवानगीबाबत फेरविचार करणार असल्याचे येथील विद्यमान सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. पंतप्रधान अनुराकुमारा दिसनायके यांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतच हा निर्णय झाल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. या प्रकल्पामुळे देशाच्या ऊर्जा क्षेत्रातील स्वायत्ततेला धोका निर्माण होणार असून सत्ता मिळाल्यास प्रकल्प रद्द करू, असे आश्वासन दिसनायके यांनी निवडणूक प्रचारावेळी दिले होते.
पुणे : नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास काहीसा अडखळत होत आहे. सोमवारी पूर्वोत्तर राज्यातून मॉन्सूनने माघार घेतली. मॉन्सूनचा उर्वरित प्रवास वेगाने होणार असल्याने लवकरच मॉन्सून महाराष्ट्रासह देशाचा निरोप घेणार आहे. दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Latest Marathi Live Updates 15 October 2024 : अभिनेते अतुल परचुरे (वय ५७) यांचे कर्करोगाने रुग्णालयामध्ये निधन झाले. आज सकाळी ११ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांचे बहुचर्चित राजकारण आता एका टप्प्यावर पोहोचले असून, महायुतीने रिक्त जागांपैकी सात जागांवर उमेदवार नेमण्याचे निश्चित केल्याचे समजते. अदानी कंपनीमार्फत श्रीलंकेमध्ये पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यास दिलेल्या परवानगीबाबत फेरविचार करणार असल्याचे विद्यमान सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. तिवसामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यतिथी कार्यक्रमाला आजपासून सुरवात होत आहे. पश्चिम बंगालमधील आर.जी.कर रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील सामूहिक अत्याचार आणि खून प्रकरणानंतर विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करणाऱ्या निवासी डॉक्टरांचे आंदोलन अद्याप सुरूच आहे. त्याचबरोबर पुढील दोन-तीन दिवस हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.