कुलाबा येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला शिवसेना (उबाठा) पक्षाचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी अभिवादन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सकाळी ९ वाजता अभिवादनाचा वेळ दिला गेला होता, त्यानुसार सर्व तयारीही पूर्ण झाली होती. मात्र मुख्यमंत्र्यांना पोहोचण्यास विलंब होत असल्याने, शिवसेना (उबाठा) पक्षाकडून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.