मुंबईतील बीकेसीतल्या सभेकडे मतदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. .शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे आज एक टिझर जारी करण्यात आला आहे. यात महायुतीये या शब्दावरून वाद होण्याची शक्यता आहे. .इंफाळ : मणिपूरमधील जिरिबममधील मैतेई समुदायातील तीन महिला आणि तीन बालके यांचे मृतदेह सापडल्याने शनिवारी संध्याकाळपासून मणिपूर येथे नव्याने हिंसाचार उसळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये मोठ्याप्रमाणात हिंसाचाराची घटना घडलेल्या पाच जिल्ह्यामध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचे पोलिसांनी सांगितले..बंगळूर : शिकारीपूर तालुक्यातील बळ्ळीगावी येथील श्री अल्लमप्रभू अनुभव पीठ विरक्तमठाचे आचार्य असलेले शिवलिंगेश्वर स्वामीजी यांचे आज सकाळी हुबळी शहरातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. स्वामीजींना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तत्काळ तत्त्वदर्शन रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात असताना त्यांनी रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले, मंतूर मठात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे भाविकांनी सांगितले. शिवलिंगेश्वर स्वामीजींच्या निधनाने त्यांचे असंख्य भक्त शोकसागरात बुडाले आहेत. अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल श्रध्दांजली वाहिली आहे..ब्राझीलमधील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रिओ दि जानेरो येथे संस्कृत मंत्रोच्चारात स्वागत केले..संगमेश्वर : देवरूख येथे संगमेश्वर तालुक्यात नव्याने जिल्हा परिषद शाळेत नियुक्त झालेल्या सुमारे २०० प्राथमिक शिक्षकांचे प्रशिक्षण झाले. हे प्रशिक्षणानंतर दोन मित्र गणपतीपुळे येथे फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांनी २० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यावर मतदान करा, असे वाळूशिल्प काढून जागृती केली..नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रविवारी होणाऱ्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या. अमित शहा यांच्या विदर्भात चार सभा होणार होत्या. या सभा रद्द करून शाह तातडीने नागपूरवरून दिल्लीकडे रवाना झाले. सभा रद्द होण्यामागे प्रशासकीय कारण असल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार वाढल्यानेच शहा दिल्लीला परतल्याचे सूत्रांनी सांगितले. अमित शहा यांच्याऐवजी माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यांच्या सर्वच सभा घेतल्या. .करवीरचे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. प्रचार सभा करून येताना मानवाडजवळ 6 ते 7 जणांनी त्यांच्यांवर हल्ला केला. संताजी घोरपडे यांची गाडी अडवून काठी आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. घोरपडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून कळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे..Latest Marathi Live Updates 18 November 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी महिनाभर जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यात धडाडणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा आज थंडावणार आहेत. या निमित्ताने उठलेला प्रचाराचा धुरळाही खाली बसणार आहे. या निवडणुकीतील जाहीर प्रचाराची सांगता आज सायंकाळी सहाला होणार असून, मतदान २० नोव्हेंबरला आहे. तसेच करवीरचे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. दिल्लीचे परिवहन मंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) वरिष्ठ नेते कैलाश गहलोत यांनी ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मणिपूरमधील जिरिबमयेथील मैतेई समुदायातील तीन महिला आणि तीन बालके यांचे मृतदेह सापडल्याने शनिवारी संध्याकाळपासून येथे नव्याने हिंसाचार उसळला. जिल्ह्यामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. त्याचबरोबर राज्यातील काही भागात आज ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.