Latest Marathi News Updates : यूपीच्या बरेलीमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट

Breaking Marathi News Updates 2 October 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updates esakal
Updated on

यूपीच्या बरेलीमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट

यूपीच्या बरेलीमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला आहे. यात तिघे जण ठार झाले आहेत.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा रांची, झारखंड येथून निघाले

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा रांची, झारखंड येथून निघाले. ते दिल्लीत पोहोचणार असून उद्या हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार आहेत.

खुनी आणि बलात्कार करणाऱ्याला किती वेळा पॅरोलवर सोडता येईल? - संजय राऊत

गुरमीत राम रहीमची आठ वेळा पॅरोलवर सुटका झाली आहे. हे बेकायदेशीर आहे. भाजपकडून काही नवीन कायदे केले जात आहेत. खुनी आणि बलात्कार करणाऱ्याला किती वेळा पॅरोलवर सोडता येईल? तेही निवडणुकीच्या वेळी. ते नंतर येतील. महिलांवरील गुन्ह्यांबद्दल बोला. हे सर्व बोगस आहे, अशा लोकांच्या पाठिंब्यावर त्यांचा पक्ष उभा आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत.

kaushalya vikas Live : कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ

कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ उद्या केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. विशेष उपस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांची राहणार आहे.

Pune Live: भाजप ने हडपसर, वडगाव शेरी मतदारसंघ सोडल्याची चर्चा? शिवसेनेनं केला या २ जागांवर दावा

भाजपकडून हडपसर, वडगाव शेरी हे दोन्ही मतदारसंघ भाजप ने महायुती मधील मित्रपक्षाला सोडल्याच्या चर्चा रंगत असतानाच आता या दोन्ही मतदारसंघावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं केला आहे. हडपसर, वडगाव शेरी आणि खडकवासला हे मतदारसंघ शिवसेनेला मिळायला पाहिजे अशी मागणी पक्षाच्या वतीने पक्षश्रेष्ठी यांच्याकडे करण्यात आली आहे. वरिष्ठ पातळीवर जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल पण हे तिन्ही मतदारसंघ आम्हला मिळावे असा आमचा आग्रह शेवटपर्यंत राहणार आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिली आहे...

IAS Pooja Khedkar Live: वादग्रस्त प्रोबेशनारी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी केली राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार

वादग्रस्त प्रोबेशनारी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. तक्रारीत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर आरोप केले आहेत. दिवसे यांनी उच्च समितीकडे पाठवलेला अहवाल खोटा असल्याची तक्रार पूजा खेडकर यांनी केली आहे. पूजा खेडकरने मुख्य सचिवांना केलेल्या मेलमध्ये सुहास दिवसे यांनी छळ केल्याच उल्लेख आहे.

Sharad Pawar Live: शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून नवरात्रीचे ९ दिवस केले जाणार धरणे आंदोलन

शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून नवरात्रीचे ९ दिवस धरणे आंदोलन केले जाणार आहे. दुपारी १२-३ यावेळेत महिलांच्या मुद्द्यांवर निषेध नोंदविला जाणार आहे. नवरात्रीच्या निमित्ताने ९ दिवस महाराष्ट्रातील महिलांच्या निगडित प्रश्नावर सरकारला प्रश्न विचारले जाणार आहेत. या धरणे आंदोलनाला महिला जागर असे नाव दिले जाणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात जागर केला जाणार आहे.

Govinda Live : बंदुकीची गोळी लागल्यानंतर अभिनेता गोविंदाची प्रकृती कशी? मुलीनं स्वतःचं दिली माहिती 

Thane Live : ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी 

ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. वागळे इस्टेट इथं ही दुर्घटना घडली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Mumbai Live : नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून ठाकरे ॲक्शन मोडमध्ये 

नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट सज्ज झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या चॅम्पियनला घटस्थापनेपासून सुरुवात होणार आहे. विधानसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचं थीमसाँगही तयार झालं आहे. दहा दिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा आढावा घेतल्याबद्दल उद्धव ठाकरे यांची उद्या दुपारी 1 वाजता शिवसेना भवन इथं पत्रकार परिषद पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे.

काँग्रेसकडून सुमारे 5 आमदार राष्ट्रवादीत येण्याची शक्यता

अजित पवारांकडे आता ४२ आमदार आहेत. तसंच काँग्रेसकडून जवळपास ५ आमदार राष्ट्रवादीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं आम्हाला किमान ६० जागा द्याव्यात, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अधिक १० जागांसाठी आग्रही आहे. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची यावर चर्चा झाली.

Pune Rain Live: पुण्यात पावसाला सुरुवात, विश्रांतवाडीसह अनेक भागांमध्ये हजेरी

पुण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली असून विश्रांतवाडी परिसर तसेच खराडी, वाघोलीसह नगर रस्त्यावर पावसाने हजेरी लावली आहे.

MVA Meeting: महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात

महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात झाली असून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत, नाना पटोले यांच्या उपस्थितीत बैठक सुरू झाली आहे.

Narayan Rane Live: कुडाळ-मालवण मतदारसंघाबाबत राणेंची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नारायण राणेंची कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. माजी खासदार निलेश राणे हे या मतदार संघातून इच्छुक असल्याचं बोललं जातंय.

Satara Live: साताऱ्यात सर्विसिंग रॅमचां कॉम्प्रेसर फुटून एक जण जागीच ठार

साताऱ्यात सर्विसिंग रॅमचां कॉम्प्रेसर फुटून एक जण जागीच ठार झाल्याचे आणि दोन गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. साताऱ्यातील माची पेठ येथील घटना आहे. स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला असून आजूबाजूच्या घरांना तडे गेले आहेत.

Amit Shah live Updates:  काल रात्री उशिरा सह्याद्री अतिथी गृहामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली

  • या बैठकीत राज्यात महायुतीचंच सरकार आणू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना दिल्याचं समजतंय...

  • लोकसभा निवडणुकीप्रमाणे जागावाटप करायला आणि उमेदवारांची नावे घोषित करायला उशीर करू नका अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना केली

  • जागावाटप लवकरच जाहीर करायला हवं अशी एकनाथ शिंदे यांनी केली मागणी

  • एकनाथ शिंदे यांनी त्यांना अपेक्षित असलेल्या जागा आणि त्या जागा का हवे आहेत याबाबत सविस्तर माहिती अमित शहा यांना दिली

Nashik live Updates:   नाशिक मधील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकावरील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

- महात्मा फुले यांच्या अखंडातील ओळ वगळल्याने घेण्यात आला होता आक्षेप

- वादा नंतर काल महात्मा फुलेंच्या अखंडातील ओळी काढून टाकण्यात आल्या होत्या

- आता तात्पुरत्या स्वरूपात बॅनरवर लावण्यात आला महात्मा फुलेंचा संपूर्ण अखंड

- मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने भव्य स्मारक उभारले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या स्मारकाचे दिमागदार उद्घाटनही केले.

CM Eknath Shinde live Updates:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला मंत्री नारायण राणे वर्षा बंगल्यावर; भेटीचं कारण गुलदस्त्यात

  • कुडाळ मतदारसंघाबाबत चर्चा करण्यासाठी राणे वर्षावर

  • कुडाळ मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ

  • मात्र निलेश राणे या मतदारसंघात जोरदार तयारी करत आहे

  • यासाठी निलेश राणे यांना शिवसेनेने मदत करावी यासाठी नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी

PM Narendra Modi live Updates: स्वच्छ भारत हा जगातील सर्वात मोठा आणि लोकांच्या नेतृत्वाखालील लोकांचा संकल्प आहे - पंतप्रधान

आजपासून 1000 वर्षांनंतर जेव्हा 21 व्या शतकातील भारताविषयी अभ्यास केला जाईल, तेव्हा स्वच्छ भारत अभियानाची आठवण होईल. या शतकात, स्वच्छ भारत हा जगातील सर्वात मोठा आणि लोकांच्या नेतृत्वाखालील लोकांचा संकल्प आहे - पंतप्रधान.

Chandrapur live : आज चंद्रपुरात ओबीसी महाएल्गार मेळावा

ओबीसी सेवा संघाच्या वतीने आज चंद्रपुरात सायंकाळी पाच वाजता ओबीसी महाएल्गार मेळावा होत आहे. या मेळाव्याला प्रा. लक्ष्मण हाके, विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, नवनाथ वाघमारे यांची उपस्थिती राहणार आहे.

MNS Live:  मनसेतर्फे महिलांना साडी वाटप

मनसेतर्फे महिलांना साडी वाटप करण्यात आला. शिवतीर्थ येथे घाटकोपर पूर्व येथील महिलांना साडी वाटप करण्यात आला

PM Modi Live: 1000 वर्षांनंतरही स्वच्छ भारत अभियानाची आठवण होईल: पीएम मोदी

आजपासून 1000 वर्षांनंतर जेव्हा 21 व्या शतकातील भारताविषयी अभ्यास केला जाईल, तेव्हा स्वच्छ भारत अभियानाची आठवण होईल. या शतकात, स्वच्छ भारत हा जगातील सर्वात मोठा आणि लोकांच्या नेतृत्वाखालील लोकांचा संकल्प आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

Cabinet meeting live: 10 तारखेनंतर आचारसंहितेची शक्यता, गुरूवारी मंत्रिमंडळाची बैठक

गुरूवारी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. 10 तारखेनंतर आचारसंहितेची शक्यता असल्याने, मंत्रिमंडळाने येत्या निवडणुकांच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. या बैठकीत विकास योजना, सामाजिक कल्याण योजना आणि इतर महत्त्वाचे विषय चर्चेत येणार आहेत. मंत्रिमंडळाच्या या निर्णयांमुळे राज्याच्या आगामी धोरणांवर महत्त्वाचा प्रभाव पडू शकतो.

Khambataki Ghat Traffic Live : अर्धा तासापासून खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी

मागील अर्धा तासापासून खंबाटकी घाटात वाहतुक कोंडी झाली आहे. त्यामुळे बोगद्यामार्ग वाहतुक वळवण्यात आली आहे. यामुळे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

Vidhansabha Election Live : राहुल नार्वेकर राज ठाकरे यांच्या भेटीला; काय होणार चर्चा?

भाजपचे नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. शिवतीर्थ येथे राज ठाकरे आणि राहुल धारवेकर यांची बैठक सुरू असून बैठकीच कारण गुलदस्त्यात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे, काल रात्री अमित शहा आणि भाजपच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीनंतर महायुती संदर्भात चर्चा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

Pune Helicopter Crash : हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू ही दुःखद आणि दुर्दैवी घटना - सुप्रिया सुळे

पुण्यातील बावधन बुद्रुक येथे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन जण मृत्युमुखी पडले. ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. या घटनेत मरण पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Mumbai Live: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १,३५६ ग्रॅम गांजा जप्त

मुंबई सीमाशुल्क विभागाने बँकॉकवरून आलेल्या एका प्रवाशाकडून १,३५६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. हा गांजा खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न केला जात होता. जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे १ कोटी ३४ लाख रुपये आहे. प्रवाशाने बँकॉकहून मुंबईत येत असताना हा गांजा तस्करीचा प्रयत्न केला होता, मात्र सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सावधानतेने त्याचा पर्दाफाश केला.

Anant Ambani Live: अनंत अंबानी मातोश्रीवर, तेजस ठाकरेंची घेतली सदिच्छा भेट

अनंत अंबानी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान, उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांचीही त्यांनी भेट घेतली. या भेटीमागील उद्दिष्ट आणि चर्चा याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही, परंतु राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा आहे.

Assembly live: वांद्रे पूर्व विधानसभेत झिशान सिद्दिकी आणि वरूण सरदेसाई एकाच मंचावर

वांद्रे पूर्व मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला आमदार झिशान सिद्दीकी आणि शिवसेना UBT सचिव वरुण सरदेसाई दोघांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली

आगामी विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून दोघेही संभाव्य उमेदवार आहेत

वांद्रे पूर्व येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले

याच कार्यक्रमाला रामदास आठवले यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब देखील उपस्थित होते

आपल्याला मतदारसंघात कामात अडथळे आणण्याचा आणि काम न करू देत असल्याचा शिवसेना ठाकरे गटावर आरोप करणारे वांद्रे पूर्वचे स्थानिक आमदार झिशान सिद्दिकी थेट शिवसेना ठाकरे गटांच्या नेत्यांसमोर या कार्यक्रमात पाहायला मिळाले

एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची शक्यता असणारे आणि तशी तयारी करणारे दोन संभाव्य उमेदवार एकाच कार्यक्रमात एकाच मंचावर या निमित्ताने पाहायला मिळाले

Bavdhan Helicopter Crashed LIVE : बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, तिघांचा दुर्घटनेत मृत्यू

बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले असून यात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बावधनमधील केके बिल्डरच्या डोंगरावरील ही घटना आहे. पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत फोन आला आहे. सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Weather Update LIVE : महाराष्ट्रासह 9 राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान  विभागाचा अंदाज

महाराष्ट्रासह ९ राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. राज्यातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याशिवाय पुणे, नगर, रायगड, धुळे, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. इथे क्लिक करा

Mahatma Gandhi Jayanti LIVE : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी राजघाटावर महात्मा गांधींना वाहिली आदरांजली

दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी राजघाट येथे महात्मा गांधींना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

Mukesh Ambani LIVE : उद्योगपती मुकेश अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर

उद्योगपती मुकेश अंबानी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत. या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नुकतेच ते भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचल्याची माहिती आहे.

Devendra Fadnavis LIVE : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, मंत्रालयातील सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी पोलिसाचं निलंबन

दादरमध्ये राहणाऱ्या महिलेने मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर गुरुवारी तोडफोड केली होती. प्राथमिक चौकशीत सचिव प्रवेशद्वारावर तिला अडवण्यात आले नाही अथवा तिची चौकशी करण्यात आली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रवेशद्वारावर तैनात पोलीस हवालदार अनिल धनंजय आवळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Actor Rajinikanth LIVE : दाक्षिणात्य सिनेअभिनेते रजनीकांत यांची प्रकृती स्थिर

चेन्नई : दाक्षिणात्य सिनेअभिनेते रजनीकांत यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना दैनंदिन तपासणीसाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती तमिळनाडूचे आरोग्यमंत्री मा सुब्रह्मण्यम यांनी दिली. वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर रजनीकांत हे घरी परततील असेही त्यांनी सांगितले. रजनीकांत यांना सोमवारी रात्रीच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.

Rahul Gandhi LIVE : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर

Latest Marathi Live Updates 2 October 2024 : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवार (ता. ४) आणि शनिवारी (ता. ५) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. तर, आज सकाळी ११.३० वाजता नवी मुंबई मनसेतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्रालयात सकाळी 11 वाजता मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. तसेच मातोश्रीवर दुपारी १२ वाजता शिरूर, बारामती, पुणे आणि मावळ या पुण्यातील चार महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. दाक्षिणात्य सिनेअभिनेते रजनीकांत यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेली ‘स्वराज्य संघटना’ भारतीय निवडणूक आयोगाकडे ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ नावाने राजकीय पक्ष म्हणून नोंदणीकृत झाला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.