मोहन मते यांना नागपूर दक्षिणमधून उमेदवारी देण्याचे तिकीट मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष केला..महाराष्ट्रात महायुती जिंकणार, 14 कोटी नागरिकांच्या विकासासाठी काम करणार, असं बावनकुळे म्हणाले आहेत. .दिल्लीतील जहांगीरपुरी भागात गोळीबार झाला आहे. यात एक जण जखमी झाला आहे. .नेमबाजांना शस्त्र पुरवल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज नवी मुंबईतून एका भंगार व्यापाऱ्याला अटक केली. या प्रकरणातील ही दहावी अटक आहे..दिल्लीतील नांगलोई येथील चपला बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली आहे. .गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र त्यांचे पुत्र संदीप नाईक यांना बेलापूर मधून भाजपाने उमेदवारी नाकारली आहे. संदीप नाईक यांना उमेदवारी नाही मिळाली, तरीही ते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत..हवामान विभागाने मुंबईसह लगतच्या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी केला होता. सोबतच येथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. यादरम्यान नवी मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. . नवी दिल्ली : विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या अफवांमध्ये मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हवाई वाहतूक महासंचालनालयाचे महासंचालक विक्रम देवदत्त यांची कोळसा मंत्रालयात सचिव म्हणून बदली केली आहे. दत्त हे १९९३ च्या एजीएमयूटी तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत..इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सुरू असून तब्बल तासभर झालेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन,भात पिकासह बागायती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासोबतच नाशिक जिल्ह्यातील ठेंगोडा परीसरात देखील पावसाने झोडपले असून शिवारात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यादरम्यान या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाईची देण्याची मागणी केली जात आहे. .नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात तसेच परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आजही नाशिकच्या त्र्यंबकेश्वर भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये आरजे शंकरा नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते..महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण पश्चिम नागपूरमधून उमेदवारी दिली आहे..मुंबई कस्टमकडून बँकॉकहून येणाऱ्या एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून साधारण 8 कोटी रुपयांचा संशयित गांजा (मारिजुआना)केला जप्त केला असल्याचे समजत आहे. या प्रवाशाच्या सामनात जी खेळणी आणि अन्नपदार्थ ठेवलेले बॉक्स होते, त्याच प्रतिबंधित पदार्थ लपवून ठेवलेला होता..मनोज जरांगे यांनी निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले असून सर्व इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितले आहे. त्यांनी जाहीर केलं की जिथे निवडून येतील तिथे उमेदवार उभे करावे. Sc st च्या जागी उमेदवार देऊ नये. जिथं उमेदवार उभे करणार नाही तिथे आपल्याला जो ५०० रुपयांच्या बाँडवर लिहून देईल त्याला मतदान देऊ. समीकरण कसे जुळणार, त्यानुसार निर्णय घेऊ. जो लिहून देईल तो कुणाच्याही पक्षाचा असला तरी त्याला पाठिंबा देऊ. समीकरणे जुळले नाही तर सगळेच पाडू..माजी केंद्रीय मंत्री स्व. माणिकराव गावित यांचा मुलगा भरत गावित यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेल्या भरत गावित यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला..माजी आमदार सुभाष साबणे यांनी काल भाजपा सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आज परिवर्तन महाशक्तीमध्ये केला. त्यांच्या परिवर्तन महाशक्तीमधील प्रवेशावेळी छत्रपती संभाजीराजे देखील उपस्थित होते..निलेश राणे वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती नुकतीच मिळाली आहे..वाय बी. सेंटरमध्ये आदित्य ठाकरे शरद पवारांच्या भेटासाठी दाखल झाले आहे. .आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील असे बोलताना संजय राऊतानी सुचक विधान केले आहे. .जागावाटपावरुन महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. अशात आता शरद पवार यांना भेटण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे रवाना झाले आहेत..केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. दरम्यान या भेटीमागे काय कारण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. .दिल्लीतील रोहिणी येथील प्रशांत विहार परिसरात आज सकाळी भीषण स्फोट झाला. सीआरपीएफ शाळेजवळ झालेल्या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. स्फोटाचा आवाज ऐकल्यानंतर आकाशात धुराचे लोट दिसताच लोकांमध्ये घबराट पसरली. ही घटना सकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. स्फोटाची माहिती मिळताच रोहिणी पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र हा स्फोट कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पथक, बॉम्ब निकामी पथक, अग्निशमन दल आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. रोहिणीचे डीएसपी अमित गोयल यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे..सातारा - पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात सहाव्या वळणावर एक मालक ट्रक बंद पडल्याने आज सकाळी साडेआठ पासून वाहतूक पूर्णपणे जाम झाली आहे. सध्या वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहने बोगद्या मार्गे वळवली आहेत. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. बंद पडलेला फरशी घेऊन निघालेला ट्रक बाजूला करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आज सकाळी साडेआठ वाजेपासून ही वाहतूक विस्कळीत झाली असून, दुपारी वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे..मुंबई सत्र न्यायालयाने काँग्रेसचे राज्यसभा सदस्य चंद्रकांत हांडोरे यांचा मुलगा गणेश हांडोरे याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. गणेश हांडोरेवर हिट अँड रन प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात जखमी व्यक्तीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे, आणि गुन्ह्याचा गांभीर्य पाहता न्यायालयाने जामीन नाकारला. अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याच्या कारणाने गणेश हांडोरेला अटक करण्यात आली होती..अजितदादा गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदे शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर दाखल.पुणे शहरातून ५ हजाराहून अधिक राजकीय बॅनर हटवले विधानसभा निवडणुकीच्यासा आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेची कारवाई .रामटेक तुमसर महामार्गावरील राखी तलाव चौकात कारच्या धडकेत एकाचा मुत्यु झाला असून चार जण गंभीर जख्मी झाल्याची शनिवारी घटना घडली आहे. .Mumbai Crime Live: जे जे शूट आऊट प्रकरणी ३२ वर्षांनंतर आरोपीला अटक.जे जे शूट आऊट प्रकरणी ३२ वर्षांनंतर आरोपीला अटकमिर्झापूर येथील कारागृहातून घेण्यात आला त्रिभुवन रामपती सिंहचा मुंबई गुन्हे शाखेने घेतला ताबा.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.