सुधीर साळवी यांना तिकीट नाकारल्याने शिवडी विधानसभेतील पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. लालबाग शाखेबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा झाले असून सुधीर साळवी यांना उमेदवारी मिळावी, अशी शिवसैनिकांची मागणी आहे. सुधीर साळवी यांच्याकडून लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु असून पक्षाने निर्णय घेतलाय मला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिला.