Latest Maharashtra News Updates : Mumbai School Holiday: बीएमसी आयुक्त भूषण गगराणी नियंत्रण कक्षातून शहरातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला

Breaking Marathi News Updates 25 September 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updatesesakal
Updated on

बीएमसी आयुक्त भूषण गगराणी नियंत्रण कक्षातून शहरातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला

बीएमसी आयुक्त भूषण गगराणी नियंत्रण कक्षातून शहरातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर!

मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवा ३० ते ४५ मिनिटे उशीराने

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवा ३० ते ४५ मिनिटे उशीराने धावत आहे. तर हार्बर मार्गावरील लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहे.

Rain Update: मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील अनेक भागात पाणी साचले

मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे.

एअर मार्शल एसपी धारकर हे आयएएफचे पुढील उपप्रमुख असतील

Rain Update: येत्या 3-4 तासांत मुंबई, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

येत्या 3-4 तासांत मुंबई, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 40-50 किमी वेगाने वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.

पोहरादेवीला पंतप्रधान जाणार, ५ ऑक्टोबरला दौरा

शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या वाशिम जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असणार आहे. बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे पाच ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नगारा भवनाचे लोकार्पण होणार आहे.

Laxman Hake Live:  सातव्या दिवशी लक्ष्मण हाकेंनी उपोषण सोडलं

ओबीसी आरक्षण लढ्याचे नेते लक्ष्मण हाके यांनी सातव्या दिवशी त्यांचं उपोषण सोडलं आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर हाकेंनीही आपण उपोषण मागे घेतलं.

मेट्रो स्थानकाबाहेर अंडी विकणाऱ्या महिलेने पादचाऱ्यावर उगारला चाकू

अनेकदा मुंबईतील फेरीवाले आणि लोकांमधील वादाचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. सध्या मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्थानकाबाहेरील खाऊ गल्लीतील एका फेरीवाल्या महिलेचा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात ती अनधिकृत फेरीवाली महिला पदपथावर चालणाऱ्या व्यक्तीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत चक्क चाकूने मारायला धावते. सध्या हा व्हिडिओ सोशल माध्यमात प्रचंड व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून नागरिकांकडून महापालिकेच्या के पूर्व प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Manoj Jaragne Live : जरांगे उपचारांसाठी संभाजीनरगच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार आहेत. ॲम्बुलन्समधून जरांगे संभाजीनगरकडं रवाना झाले आहेत.

Pune : उद्या पंतप्रधानांचा 'असा' असेल पुणे दौरा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यानुसार उद्या संध्याकाळी 5.35 वाजता पुणे विमानतळावर त्यांचं आगमन होईल. त्यानंतर संध्याकाळी 5.50 वाजता त्यांचं शिवाजीनगर येथील मेट्रो स्टेशनवर आगमन. शिवाजीनगर ते स्वारगेट पर्यंतच्या भुयारी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार. मेट्रोने प्रवास करत स्वारगेटला पोहचतील. त्यानंतर स्वारगेट येथे स्वारगेट ते कात्रज या नव्या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन होईल. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता एसपी कॉलेज ग्राऊंडवर मोदींची सभा पार पडेल.

Teachers Protest Live : शिक्षकांच्या संपामुळे मोखाड्यातील शाळांना टाळे, दहा हजार विद्यार्थी बसले घरी 

मोखाडा. ता. ( बातमीदार ) -  राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत राज्यव्यापी एकदिवसीय संप पुकारला आहे. त्याचा मोठा परिणाम ग्रामीण भागात जाणवला आहे. पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील सर्व  154  शाळांना टाळे लागले असुन सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना अघोषीत सुट्टी घेऊन घरी बसावे लागले आहे. 

Mumbai Rain Live : मुंबईत जोरदार पावसाची हजेरी! नागरिकांची तारांबळ

मुलुंड नाहूर, कांजुर येथे मुसळधार पाऊस सुरू असून यामधिये नागरिकांची चांगलीच तारांबळ झाल्ये पाहायला मिळाले. पुणे शहरातील मध्यवर्ती भागात देखील मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. तर नाशिक शहरात पावसामुळे द्वारका चौकात पाणी साचले आहे.

Maratha Reservation Live : बुलढाण्यात मराठा समाज आक्रमक! टायर पेटवून समृद्धी महामार्ग रोखला 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाचे कार्यकर्ते बुलढाणा येथे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर टायर पेटवल्याने येथे वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. येथे रस्त्यावर वाहानांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले

Devendra Fadnavis Live Updates: नवी मुंबईत आयोजित माथाडी कामगार मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

नवी मुंबईत आयोजित माथाडी कामगार मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन समाजात दुफळी निर्माण होऊ नये यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरु - फडणवीस.

PM Modi Pune Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात मनसे करणार आंदोलन

  • उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात मनसे करणार आंदोलन

  • हडपसर मेट्रोसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आंदोलन

  • ज्या ठिकाणी नरेंद्र मोदींची सभा आहे त्या ठिकाणी मनसे कडून आंदोलन करण्यात येणार

  • स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे भूमिपूजन होत असताना हडपसर मध्येही मेट्रो आणावी यासाठी मनसे आक्रमक

Manoj Jarange Patil Live Updates: मनोज जरांगे यांचं सहावं उपोषण नवव्या दिवशी उपोषण स्थगित

  • मनोज जरांगे यांचं सहावं उपोषण नवव्या दिवशी उपोषण स्थगित

  • मनोज जरांगे म्हणाले, सलाईन लावून उपोषण करण्यात काय अर्थ आहे

  • फडणवीसांना संधी दिली होती.

  • आचारसंहितानंतर सांगतो कोण काय बोलले.

अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी नाशिकमध्ये रस्त्यांवर तुंबले पाणी

- अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी नाशिकमध्ये रस्त्यांवर तुंबले पाणी

- अवघ्या काही तासांच्या पावसाने शहरात वाहतूक देखील विस्कळीत..

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो ट्रेन ने प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो ट्रेन ने प्रवास

सुरक्षेच्या कारणास्तव उद्या जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन बंद राहणार

काही कालावधी साठी नागरिकांसाठी मेट्रो सेवा बंद राहणार

प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था मेट्रो कडून करन्यात येणार

जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशनवर पाच तासांचा राहणार ब्लॉक

संध्याकाळी सात नंतर सिव्हिल कोर्ट स्टेशन प्रवाशांसाठी सुरू होणार

उद्या रात्री पुणेकरांना अनुभवता येणार शहरातील पहिला भूमिगत मेट्रोचा मार्ग

उद्या रात्री ८.३० नंतर पुणेकरांना अनुभवता येणार शहरातील पहिला भूमिगत मेट्रोचा मार्ग

उद्या रात्री साडेआठ नंतर जिल्हा न्यायालयाचे स्वारगेट या मार्गाचा प्रवास करता येणार

जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुणे शहरातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रमानंतर हा मार्ग खुला करण्यात येणार

जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हे 3.62 किलोमीटरचे अंतर

दुपारच्या वेळात मात्र जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन नागरिकांसाठी राहणार बंद

मेट्रो प्रशासनाकडून पर्यायी सोयीचा लाभ घेण्याचे आवाहन

Askahy Shinde Encounter: जखमी पोलीस अधिकाऱ्याच्या हाताच्या पंज्याचे नमूने आजच घ्या

जखमी पोलीस अधिकाऱ्याचे हाताच्या पंज्याचे नमूने आजच घ्या असे आदेश पोलिसांना दिले आहेत.

Ratnakar Gutte Live: गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई शरद पवार गटात प्रवेश करणार

गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात आज प्रवेश करणार आहेत. राजाभाऊ फड परळी मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक असून, त्यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना आव्हान देण्याची तयारी दर्शवली आहे. फड यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क असून, त्यांच्या प्रवेशामुळे शरद पवार गटाला या मतदारसंघात नवी ऊर्जा मिळण्याची शक्यता आहे.

NCP Live:  महायुती 100 चा आकडा पार करणार नाही - महेश तपासे

भारतीय जनता पार्टीच्या दिल्ली स्थित नेत्यांबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात चीड असून हे दिल्लीश्वर नेते जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातील महायुतीचे मतं घटतील असा घनाघात राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौरा बद्दल तपासे यांनी प्रतिक्रिया दिली. गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना नागपूर येथे संबोधित करत असताना १०% मत वाढवली की सरकार येईल अशा सूचना केल्या त्यावर तपासे यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीचे २०% मतदान घटणार आहे. महायुती शंभरचा आकडा पार करणार नाही असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला.

Jammu And Kashmir Election Live: जम्मू आणि काश्मीरमध्ये शांततेत मतदान सुरू

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. राजोरीच्या नौशेरा येथील मतदान केंद्र 51 वर मतदारांची गर्दी आहे.

नौशेरा विधानसभा मतदारसंघाचे रिटर्निंग अधिकारी बाबू राम टंडन म्हणाले की, " सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे सर्व ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे. मतदानासोबतच नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे."

Jammu And Kashmir Vidhan Sabha Live: जम्मू आणि काश्मीरमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 10.22% मतदान

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत 10.22% मतदान झालेले आहे.

Ncp Leader Sharad Pawar Live: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी शरद पवार यांची भेट घेतली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवार यांच्या सोबत पिचड कुटुंबाची अर्धा तास चर्चा झाली. सध्या पिचड कुटुंबीय भाजपमध्ये आहे. महायुतीत अकोले विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटत असल्यामुळे पिचड कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्याच्या तयारीत आहेत.

BJP-Shivsena Live: भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार

भाजपचे जिल्हा सरचिटणीस वैजापूरचे डॉ दिनेश परदेशी आज दुपारी बारा वाजता मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश करणार आहेत. वैजापूर विधानसभा मतदारसंघात दिनेश परदेशी यांनी दोनदा विधानसभा निवडणूक लढवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वैजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास दिनेश परदेशी इच्छुक आहेत

Mumbai Crime: रात्रीच्या वेळी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत आरोपीला अटक

अंधेरी पूर्वेकडील गुंदवली मेट्रोस्थानक परिसरात रात्रीच्या वेळी 22 वर्षीय तरुणाच्या दुचाकीचा पाठलाग करून दोन तोळ्याची सोन्याची चैन चोरी करणाऱ्या आरोपीला अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. शम्स उर्फ जॉनी समीर इब्राहिम सय्यद (27 वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून पोलीस तपासात अंधेरी आणि विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून दोन तोळे सोन्याची चैन आणि एक पल्सर बाइक जप्त केली आहे. मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तेरा पेक्षा अधिक गुन्हे नोंद आहेत.

Congress Live: काँग्रेसची पुण्यात पुन्हा एकदा होणार महत्वाची बैठक

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने येत्या ३० सप्टेंबरला बैठक होणार आहे. काँग्रेस भवन येथे निरिक्षक हरिद्वारचे आमदार काझी निजामुद्दीन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात,आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थित अढावा बैठक होणार आहे.

त्यानिमीत्त काँग्रेस भवन येथे काल बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह आमदार रविंद्र धंगेकर इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Sanjay Ghatge LIVE : इरिगेशन फेडरेशनचे उद्या ठिय्या आंदोलन, माजी आमदार संजय घाटगे यांची माहिती

कोल्हापूर : सर्वच शेती पंपधारक शेतकरी व सहकारी पाणीपुरवठा संस्थांना सरसकट मोफत विजेचा लाभ मिळावा. तसेच शेती पंपाची मागील थकबाकी निरंक करावी, या मागणीसाठी गुरुवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आहे, अशी माहिती राज्य इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर व माजी आमदार संजय घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Mohit Kamboj LIVE : भाजप नेते मोहित कंबोज यांना दिलासा, दंडाधिकारी कोर्टानं स्वीकारला क्लोजर रिपोर्ट

भाजपा नेते मोहित कंबोज यांना दिलासा मिळाला आहे. सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट दंडाधिकारी कोर्टानं स्वीकारला आहे. सेंट्रल बँक प्रकरणी हा दिलासा मिळाला. बँकेनं दिलेल्या तक्रारीच्या आधारावर सीबीआयनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

Gujarat Accident LIVE : भरधाव वाहनाने कारला दिली जोराची धडक; अपघातात जखमी व जीवितहानीची भीती

साबरकांठा, गुजरात : हिम्मतनगर येथे भरधाव वाहनाने कारला जोराची धडक दिलीये. यात जखमी व जीवितहानी होण्याची भीती आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी हजर झाले आहेत.

Beed Latest News : अंगावर वीज पडून दोन कामगारांचा जागीच मृत्यू

जातेगाव : बीड येथून कामावरून गावाकडे परत चाललेल्या कामगारांच्या अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी गेवराई तालुक्यात घडली. बाबुराव सूर्यभान पिंपळे (वय २७) व लहू उद्धव खरात (वय ३२) दोन्ही रा. अर्धमसला ता. गेवराई जि. बीड अशी मृतांची नावे आहेत.

Kolhapur Latest News : शाळा बंद आंदोलन आजऐवजी आता शुक्रवारी होणार

कोल्हापूर : जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ व संस्थाचालक संघातर्फे आयोजित आजचे (ता. २५) शाळा बंद आंदोलन शुक्रवारी (ता. २७) होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या दौऱ्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने ५ सप्टेंबरला शिक्षकदिनी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षण विरोधी घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सामूहिक रजा व मोर्चाचे आयोजन केले आहे.

NCP Controversy LIVE : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी होईल.

Jammu and Kashmir Election LIVE : राजौरी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर गर्दी

आज विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान करण्यासाठी लोक राजौरी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर रांगेत उभे आहेत. भाजपने विबोध गुप्ता यांना तर, काँग्रेसने इफ्तकार अहमद यांना उमेदवारी दिली आहे.

Weather Alert LIVE : मुंबई, रायगडसह कोकणात पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात पुढील ३-४ तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कालपासून मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे.

Governor C. P. Radhakrishnan LIVE : राज्यपाल राधाकृष्णन आज कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आज (ता. २५) कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. ते दुपारी तीनला शासकीय विश्रामगृह येथे येतील. त्यानंतर ते जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, पर्यावरण, क्रीडा, प्रसार माध्यमे, आदी क्षेत्रांतील विविध व्यक्तींशी संवाद साधणार आहेत. गुरुवारी (ता. २६) सकाळी अकराला ते हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होतील.

Amit Shah LIVE : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापुरात

कोल्हापूर : राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापुरात येणार आहेत. यावेळी ते महासैनिक दरबार हॉल येथे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. केंद्रीय पर्यावरणमंत्री भुपेंद्र बघेल, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मेळाव्यानंतर राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली जाणार आहे.

Jammu and Kashmir Election LIVE : जम्मू-काश्‍मीरमध्ये विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज

Latest Marathi Live Updates 25 September 2024 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील आज कोल्हापुरात येणार आहेत. मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे उपोषण करणारे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. इचलकरंजीतील आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाला आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर आज त्यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील मिळाला आहे. जम्मू-काश्‍मीरमध्ये विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण पहायला मिळत असून काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.