BCCI ने बांगलादेशविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
गुजरातमधील बरडियाजवळ द्वारका-जामनगर महामार्गावर बस आणि दोन कार यांच्यात मोठी धडक झाली आहे. यात काहींचा मृत्यू झाल्याची भीती निर्माण झाली आहे.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा घेणार आहेत. मराठा समाजातील समन्वयकाची उद्या बीड येथे बैठक होणार आहे. दसरा मेळाव्या संदर्भात बैठकीत होणार महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. बीड येथील नारायण गड येथे सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील कठुआमधील दुर्गम गावात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस शहीद झाला आहे. तर अजून एक जण जखमी झाला आहे.
नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 66 लोकांचा मृत्यू झाला आहे.
लाडक्या बहिणींना सांगतो सावत्र भावांपासून सावध रहा कारण त्यांनी पहिलेच खोडा घातला, अगदी कोर्टात गेले.. तुम्ही ताकद दिली तर तुमचा हा भाऊ दीड हजारांवर थांबणार नाही अजून वाढवून देऊ, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदार संघामध्ये सध्या अमृता फडणवीस या ॲक्शन मोडवर आलेल्या आहेत. लाडकी बहीण मेळाव्याच्या माध्यमातून अमृता फडणवीस मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आज पावनभूमी येथे झालेल्या महिला मेळाव्यात त्यांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी समजणारे एका मोठ्या नेत्याचं नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर सरळ निशाणा साधला.
मुंबईतील धार्मिक स्थळांना धमकी असल्याची माहिती देणाऱ्या मुलाचा पोलिसांनी सुगावा लावला आहे. नवी मुंबईवरून धमकीचा मेल आला होता. अल्पवयीन मुलाची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्यावर FIR दाखल करण्यात आली आहे. बंगळुरुतील कोर्टानं यासंदर्भात आदेश दिले होते. निवडणूक रोख्यांमधील पैशांच्या वापराबाबत आरोपांबाबत दाखल याचिकेवर कोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर कोर्टानं हे आदेश दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणी रात्रीच्या वेळेस ड्रोन घिरट्या घालत आहेत, त्यामुळं लोक घाबरले होते. मात्र लोकांनी घाबरून जाऊ नये एका खाजगी कंपनीकडून सर्वेक्षण सुरू आहे. त्यांनी गृह मंत्रालयाकडून परवानगी घेतली आहे असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.
राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीविषयी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत 'सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार २०२४' पुरस्कार प्रदान. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती.
इस्रायल डिफेन्स फोर्सेसने पोस्ट केली आहे की "हसन नसराल्लाह (हिजबुल्लाह नेता) यापुढे जगाला दहशत माजवू शकणार नाही." यानंतर नसराल्लाह मारला गेल्याच्या चर्चा सुरू आहेत
मुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुकीत युवासेनेने १० पैकी १० जागांवर विजय मिळवला आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे उद्दव ठाकरेंच्या उपस्थितीत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला. युवासेनेने या निवडणुकीत एकहाती विजय मिळवला आहे.
बंगळुरू येथील प्रसिद्ध ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका मेलच्या माध्यमातून आज सकाळी ही धमकी देण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये अनेक दिग्गज लोक वास्तव्य करतात. या धमकीमुळे प्रशासन अलर्ट झाले आहे.
गेले तीन ते चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस व वादळ सदृश्य स्थिती असल्यामुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद ठेवण्यात आली होती मात्र आता पुन्हा मासेमारीला सुरूवात झाली आहे.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात तयारी सुरू करण्यात आली. मंदिर स्वच्छतेबरोबरच करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चांदीच्या दागिन्यांसह इतर वस्तूंची आज मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. देवीची चांदीची उत्सव मूर्ती, चांदीची पालखी, अब्दागिरी, चांदीचे तोरण, पूजेचे साहित्य यासह अनेक चांदीच्या वस्तूंची स्वच्छता आज करण्यात आली.
पुण्यातील कॉलेज मध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार विरोधात अभाविपा आक्रमक झाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची बांधणी करणार. ओबीसीतील प्रत्येक घटकापर्यत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन एक्सप्रेसचा शुभारंभ झाला आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनांतर्गत लॉटरीद्वारे निवड झालेल्या 800 लाभार्थी अयोध्येला रवाना झाले आहेत.
संत सेनानी महाराज केशशिल्पी महामंडळासाठी नाभिक समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील नाभिक समाजाचे सरकारविरुद्ध महाधरणे आंदोलन होणार आहे. महामंडळ कार्यान्वित करून १ हजार कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. १२ प्रशासकीय अधिकारी व संचालक मंडळाची तात्काळ घोषणा करा अशीही मागणी आहे.
सलून, ब्युटी पार्लर असोसिएशन रस्त्यावर उतरणार असं महाराष्ट्र अध्यक्ष प्रसाद चव्हाण यांनी माहिती दिली. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी सोमवारी आझाद मैदानात राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेच्या निर्विवाद विजयानंतर सुप्रिया सुळेंचं भाजपवर टीकास्त्र. एक्सवर पोस्ट करून त्यांनी भाजवर निशाणा साधला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सीनेट निवडणूकीत युवासेनेच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळविला. ही निवडणूक सत्ताधारी भाजपाकडून सातत्याने पुढे ढकलण्यात येत होती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाही सत्ताधाऱ्यांनी अशाच पद्धतीने अडवून धरलेल्या आहेत. जेंव्हा या निवडणूका होतील तेंव्हा जनता त्यांना चोख उत्तर देईल, असं त्या म्हणाल्या.
नायर रुग्णालयाच्या निलंबित सहाय्यक प्राध्यापकाविरोधात आणखीन १० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आणखीन १० विद्यार्थीनीनी तक्रारी केल्या आहेत. विनयभंगाच्या आरोपानंतर सहाय्यक प्राध्यापकाला निलंबित करण्यात आलं होतं. चौकशी समितीसमोर तक्रारी करण्यात आल्या आहेत.
तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणी सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती बीआर गवई आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. सुब्रमण्यम स्वामी आणि इतर काही याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केल्या होत्या . लाडू प्रसादामधे प्राण्यांच्या चरबीच्या भेसळीच्या आरोपाचा तपास करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली SIT स्थापन करावी अशी याचिकेत मागणी करण्यात आलीय.
मुंबईत हाई अलर्ट आहे. केंद्रीय यंत्रणांकडून अलर्ट आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाली आहे. ठिकठिकाणी मुंबई पोलिसांनी गस्त वाढवली आहे. धार्मिक स्थळे गर्दीच्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी गस्त वाढवली आहे. दहशतवादी मुंबईला लक्ष्य करणार असल्याचं केंद्रिय तपास यंत्रणांच्या इनपुट नंतर मुंबई पोलीस सतर्क झाली आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्ला संघटनेला नष्ट केल्यानंतरच आपण मरेन, अशी शपथ यूएनमध्ये व्यक्त केली होती. दरम्यान, इस्रायलकडून हिजबुल्लाच्या लक्ष्यांवर हल्ले सुरूच आहेत. दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र युनिटचा कमांडर मुहम्मद अली इस्माइल आणि त्याचा नायब हुसेन अहमद इस्माइल इस्त्रायली हवाई हल्ल्यात ठार झाला आहे.
गुवाहाटी : आसाममध्ये आंतरराष्ट्रीय सीमेनजीक तीन बांगलादेशींना अटक करण्यात आली, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली. यासंदर्भात त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. या बांगलादेशींना पुन्हा बांगलादेशात पाठविण्यात आले. बांगलादेशात अस्थिर परिस्थिती निर्माण झाल्यापासून जवळपास १०० बांगलादेशींना आसाममध्ये अटक करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, कॉरिडॉरच्या उद्घाटनासोबतच पंतप्रधान मोदी स्वारगेट-कात्रज मेट्रो विभागाची पायाभरणी करतील. विशेष म्हणजे, गुरुवारी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली होती, मात्र मुसळधार पावसामुळे हा दौरा पुढे ढकलावा लागला होता.
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नियोजित आहे. या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थींनी परीक्षेसाठी ऑनलाइन परीक्षा अर्ज विनाविलंब शुल्कासह सादर करण्याची मुदत सोमवारपर्यंत (ता. ३०) आहे.
नाशिक :अखिल भारतीय महानुभाव पंथाद्वारे शनिवार (ता. २८) रोजी महाकवी कालिदास कला मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार व कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेवर काही ठिकाणी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेकडून नॉन-इंटरलॉकिंगची कामे करण्यासाठी हार्बर मार्गावरील अंधेरी–गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर शनिवारी रात्रकालीन १० तासांचा ब्लॉक असणार आहे. इथे क्लिक करा
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातील आज (शनिवारी) स्वच्छता केली जाणार आहे. त्यासाठी सकाळी नऊपासून सायंकाळी सहापर्यंत मुख्य मूर्तीचे दर्शन बंद राहणार आहे. देवीची उत्सवमूर्ती दर्शनासाठी सरस्वती मंदिराशेजारी ठेवण्यात येणार आहे.
Latest Marathi Live Updates 28 September 2024 : दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेटच्या 10 जागांचा निकाल जाहीर झाला. यात युवासेनेला सर्व दहा जागांवर दणदणीत विजय मिळाला. तसेच करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातील आज स्वच्छता केली जाणार आहे. तर, तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सवासाठी बाजारपेठही सज्ज होत आहे. भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केलेले कागल येथील नेते समरजितसिंह घाटगे यांची कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीवरील (डीपीडीसी) नामनिर्देशित सदस्यपदावरील नियुक्ती रद्द केली आहे. राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला मध्यम ते जोरदार वादळी पावसाने तडाखा दिला आहे. सोन्याच्या भावात जोरदार वाढ झाली असून, सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी ७५ हजार रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.