इंदापूर विधानसभा निवडणूक 2024 साठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या मुदतीअंती 38 उमेदवारांनी 52 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवार (ता.30) रोजी करण्यात आलेल्या छाननी प्रक्रियेमध्ये विविध कारणांनी सहा अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. यामुळे इंदापूर विधानसभेसाठी 34 उमेदवारांचे 46 अर्ज कायम राहिले आहे. दरम्यान सोमवार (ता.04. नोव्हेंबर) पर्यंत अर्ज माघारीची मुदती असून त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. असे असले तरी इंदापुरात दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील व प्रवीण माने अशी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहेत.