Latest Maharashtra News Updates: वन नेशन वन इलेक्शनमुळे पैशांची, वेळेची बचत होईल - म्हस्के

Breaking Marathi News Updates 18th September 2024: देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर.
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updates esakal
Updated on

वन नेशन वन इलेक्शनमुळे पैशांची, वेळेची बचत होईल - म्हस्के

वन नेशन वन इलेक्शनवर शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणतात, "नरेंद्र मोदी सरकारने घेतलेला हा अतिशय चांगला निर्णय आहे. शिवसेना या निर्णयाचे महाराष्ट्रात स्वागत करते आणि आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. वन नेशन वन इलेक्शनमुळे पैशांची, वेळेची बचत होईल. , आणि वेळोवेळी निवडणुका आयोजित करण्यात येणारी शक्ती विकासाला गती देईल जी अनेकदा आदर्श आचारसंहितेमुळे अडथळा ठरते..."

भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नल यांच्याविरोधात बेंगळुरूमधील हाय ग्राउंड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल

राहुल गांधी यांच्या विरोधात काँग्रेस नेते मनोहर यांनी केलेल्या तक्रारीनंतर भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नल यांच्याविरोधात बेंगळुरूमधील हाय ग्राउंड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

कोलकात्यात भाजपचा निषेध मोर्चा

कोलकात्यात भाजपचा निषेध मोर्चा सुरू आहे.

Nagpur Congress: नागपूरमध्ये काँग्रेसचं भाजपविरोधात आंदोलन

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड तसेच भाजपच्या नेत्यांकडून राहुल गांधींच्या विरोधात केलेल्या वक्तव्य विरोधात नागपूरमध्ये काँग्रेसने आंदोलन केलं. यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात नागपुरातील कमाल चौक येथे संजय गायकवाड आणि भाजप नेता तरविंदर सिंह यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला.

आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुनावणी 

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

Ajit Pawar Live: देवगिरी बंगल्यावर ‌अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक सुरु

देवगिरी बंगल्यावर ‌अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक सुरु असून बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित आहेत. महामंडळ वाटप, पक्षांतर्गत नाराजी, याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतंय.

'वन नेशन, वन इलेक्शन' भूमिकेला आमचं समर्थन - सुनील तटकरे  

'वन नेशन, वन इलेक्शन' भूमिकेला आमचे समर्थन आहेच, असं राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. भारत सरकारकडून याबाबत कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीला देखील राष्ट्रवादीनं पाठींबा दिला आहे, असंही ते म्हणाले.

महाविकास आघाडीची बैठक संपली, मुंबईतला ३६ जागांचं वाटप जवळपास पूर्ण

महाविकास आघाडीची बैठक संपली असून जागा वाटपावर अजूनही चर्चा सुरू आहे. पुढील दोन दिवस जागा वाटपावर महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू राहणार आहेत. मुख्यत्वे करून मुंबईतला ३६ जागांचा जागावाटप जवळपास पूर्ण होत असून ज्या ६-७ जागांवर तिढा आहे. या जागांवर लवकरच तोडगा काढला जाईल व उर्वरित महाराष्ट्रातल्या जागावाटप वर सुद्धा चर्चा महाविकास आघाडीचे नेत्यांकडून केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटप करताना जिंकलेल्या जागा सोडून इतर जागांवर महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे. त्या ठिकाणी कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत, यावर सुद्धा चर्चा केली जात आहे. त्यामुळं मेरिटनुसार महाविकास आघाडीच्या जागावाटप केलं जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्या नुसारच महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्मुला समोर येईल.

महापे एमआयडीसीमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उदघाटन

राज्यातील महापे एमआयडीसीमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उदघाटन होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार. सेमीकंडक्टर प्रकल्पामुळे १२ हजार कोटींची गुंतवणूक होणार.

Eknath Shinde Live: 'मला काहीतरी सांगायचंय' एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित नाटक लवकरच रंगभूमीवर

  • महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर

  • " मला काहीतरी सांगायचंय " महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ...

  • एकपात्री नाटकाद्वारे एकनाथ शिंदे यांच्या नाट्यमय राजकीय खेळीचा डाव...

  • एकपात्री नाटक, दीर्घांक द्वारे एकनाथ शिंदे काय नेमक सांगणार याबाबत उत्सुकता...

  • मुख्य भूमिकेत अभिनेता संग्राम समेळ

  • दोन दिवसात होईल अधिकृत घोषणा

  • सध्या नाटक सेन्सॉर बोर्डा कडे

Ajit Pawar Live: सोलापूरच्या अल्ताफ कुरेशी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश; अजित पवारांनी केलं खास ट्वीट

सोलापूरचे अल्ताफ कुरेशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खास ट्वीट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. सोलापूर येथील कुरेशी समाजाचे युवाध्यक्ष श्री. अल्ताफ कुरेशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. पक्षकार्यात त्यांची भक्कम साथ लाभेल असा विश्वास आहे.

Sharad Pawar Live Update: शरद पवारांचा अजित पवारांना आणखी एक धक्का

अजित पवारांचे १० नगरसेवक शरद पवारांसोबत आले आहेत.

Amaravti Live Updates: अमरावतीत अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल

Jammu And Kashmir Elections 2024 Live Updates: जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी दुपारी १ वाजेपर्यंत ४१.१७ टक्के मतदान.

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी दुपारी १ वाजेपर्यंत ४१.१७ टक्के मतदान.

  • अनंतनाग- 37.90%

  • डोडा- 50.81%

  • किश्तवार-56.86%

  • कुलगाम-39.91%

  • पुलवामा -29.84%

  • रामबन-49.68%

  • शोपियान-38.72%

Maharashtra Assembly Elections 2024  Live Updates: महायुतीची जागावाटपाची चर्चा महिना अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

  • महायुतीतील तीनही पक्ष आग्रही असलेल्या जागांचा तिढा वरिष्ठ पातळीवर दिल्लीत अमित शाहा यांच्याकडे सोडवला जाणार- सूत्र

  • अजित पवार-एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणविस- एकनाथ शिंदे या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत दोन स्वतंत्र बैठका झाल्या

  • ज्या कॉमन जागांवर आग्रह आहे, अश्या जागांबाबत चर्चाही झाली. मात्र, ज्या जागांवर तीनही पक्ष आग्रही आहेत. अश्या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही

  • महायुतीतील तिनही पक्ष ज्या जागांवर आग्रही आहे, अशा वाद असेलेल्या जागांबाबत अमित शाहा यांच्याकडे बैठक धेत तोडगा काढला जाईल

  • लोकसभेच्यावेळी तीनही पक्ष आग्रही असलेल्या जागांबाबत अमित शाहांनी बैठक घेऊन तिढा सोडवलेला होता

Eknath Shinde Live Updates: महामंडळ जागा वाटप संदर्भात आज सीएम सोबत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस बोलणार

महामंडळ जागा वाटप संदर्भात आज सीएम सोबत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस बोलणार महामंडळ वाटप करताना भाजपा आणि एनसीपी पक्षाच्या कोट्यातील महामंडळ वाटप लवकर करावे ही भूमिका आहे.

पण अंतर्गत पक्षात वाद नको यामुळे महामंडळ जागा वाटप करावे का? याबाबत आज अजित पवार त्यांच्या नेत्यांसमवेत संवाद करण्याची शक्यता. एनसीपी पक्षाच्या कोट्यात असलेल्या महामंडळांचे वाटप लवकर करावे यासाठी अजित पवार आग्रही

Balasaheb Thorat Live: भाजपा आणि महायुतीच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला - बाळासाहेब थोरात

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजप आणि महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका करत म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणाला यांनी कलंक लावला आहे. २०१४ पासून सुरु झालेला हा नकारात्मक प्रवास आता अधिक तीव्र होत चालला आहे. थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधत त्यांच्या मूक पाठिंब्याचा आरोप केला आहे.

Congress Live: संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करून अटक करा; काँग्रेसची मागणी

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाख रुपये इनाम देण्यात येईल अशी भाषा केली होती. या विरोधात काँग्रेस आणि भीम शक्ती संघटना आक्रमक झाली आहे. आज चेंबूर मध्ये काँग्रेस खासदार आणि भीम शक्ती संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत हांडोर यांच्या नेतृत्वात संजय गायकवाड यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संजय गायकवाड हे नेहमी अशी वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी हांडोरे यांनी केली आहे.

Assembly Elections LIVE :  राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट कोकण दौऱ्यावर, अजित पवार आणि शरद पवारांची जनसंपर्क मोहीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार 21 सप्टेंबरला कोकण दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जनसन्मान यात्रा शनिवारी चिपळूणमध्ये होणार आहे. अजित पवारांच्या दौऱ्यानंतर शरद पवार देखील कोकणात जाणार आहेत. शरद पवार २२ आणि २३ सप्टेंबरला कोकणात दौरा करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवार या दौऱ्यात कोकणातील परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Congress Live: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बैठकांचे सत्र

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसकडून 20 सप्टेंबरपासून तीन दिवस मॅरेथॉन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या निवडीसंदर्भात चर्चा होईल. नांदेड आणि इतर महत्त्वाच्या भागांच्या संदर्भातही विचारविनिमय होणार आहे. भाजपचे माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या काँग्रेसमध्ये संभाव्य प्रवेशावरही चर्चा अपेक्षित आहे.

Nashik Live: धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षणाला आदिवासी आमदारांचा विरोध, देणार सामूहिक राजीनामे

सोमवारी सर्व आदिवासी आमदार आणि नेते मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी आमदार आक्रमक झाले असून सोमवारी बैठकीत निर्णय न घेतल्यास सर्व २५ आदिवासी आमदार सामूहिक राजीनामे देणार असल्याची माहिती इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी दिली.

Arvind Kejriwal Live: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १५ दिवसांत मुख्यमंत्री निवास सोडणार

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १५ दिवसांत मुख्यमंत्री निवास सोडणार. सरकारी निवासस्थान रिकाम केल्यानंतर केजरीवाल जनतेमध्ये राहणार असल्याचं समजतंय पण ते कुठे मुक्काम करणार हे अद्याप ठरलेले नाही. मुख्यमंत्र्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व सरकारी सुविधाही केजरीवाल सोडणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी दिली.

Pooja Chavhan Case Live: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सीबीआय चौकशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल आहे. फॉरेन्सिक लॅब रिपोर्ट आणि सिडीआर रिपोर्ट उघड करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल आहे.

Latest Maharashtra News Live Updates: आमदार अपात्रता प्रकरणी आजही सुनावणी होणार नाही

आमदार अपात्रता प्रकरणी आजही सुनावणी होणार नाही. आज देखील प्रकरण नंबर १ ऐकलं जाणार असल्याने यावर सुनावणी होणार नाही. उद्या या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

semiconductor projects Live: राज्यातील पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे आज होणार उद्घाटन

सेमीकंडक्टर प्रकल्पावरून महाविकास आघाडीने महायुतीवर हल्लाबोल केला होता. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. सेमीकंडक्टर प्रकल्पामुळे १२ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. आज शिंदे व फडणवीसांकडून महा विकास आघाडीचा खरपूस समाचार घेण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातील एमआयडीसी मध्ये होणार उद्घाटन होणार आहे.

MVA Meeting Live: महाविकास आघाडीची दुपारी एक वाजता बैठक

महाविकास आघाडीची दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. गणेशोत्सव नंतर जागा वाटपावर पुन्हा एकदा महाविकास आघाडी चर्चा करणार आहे. महाविकास आघाडीचे मुंबईचे जागावाटपावर आज अंतिम चर्चा होणार असल्याची माहिती आहे. मुंबई सोबत महाराष्ट्रातील इतर जागांवर सुद्धा महाविकास आघाडीचे नेते चर्चा करणार आहेत.

Pune Crime Live: गणपती विसर्जनाच्या दिवशी पुण्यात दोन खून

विश्रांतवाडी मध्ये महिलेचा खून झाला आहे, तर बालेवाडी परिसरात कामगाराचा खून झाला आहे. तुषार बालवडकर यांच्या जागेत ग्रीन ड्रीम नर्सरी बावधन या ठिकाणी मयत इसम नामे प्रवीण कुमार भोला महतू (वय 26 वर्ष राहणार सदर (मूळ बिहार ) याचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी आज पहाटे धारदार हत्याराच्या साह्याने गळा कापून जिवे मारले आहे.

Ajit Pawar Live: पुण्याहून अजित पवार थेट मुंबई मध्ये राष्ट्रवादी कार्यालयात

उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याहून थेट मुंबई मध्ये राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यालयात विधानसभेसाठी आणि महामंडळासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत अजित पवार सवांद साधणार आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 11.11% मतदान

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये पहिल्यांदा निवडणुका होत आहेत. विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील जागांसाठी सकळी 9 वाजेपर्यंत 11.11 टक्के मतदान झाले आहे.

Amruta Fadnavis Live: वर्सोवा बीचवर स्वच्छता मोहिम; अमृता फडणवीस, आयुष्मान खुरानाचा सहभाग

अभिनेता आयुष्मान खुराना वर्सोवा बीचवर समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाला होता. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या.

PM Modi US Visit Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ सप्टेंबर अमेरिका दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ सप्टेंबर अमेरिका दौऱ्यावर जाणार असून, ते क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील. ते संयुक्त राष्ट्रांच्या 'समिट ऑफ द फ्युचर'मध्येही सहभागी होणार आहेत.

NCP And Shiv Sena MLA Hearing Live: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केलं नाही म्हणून ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर मागच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी ३ तारखा निश्चित केल्या होत्या मात्र त्यावर सुनावणी झाली नव्हती. पण यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Weather Updates Live: उत्तर प्रदेशसह 11 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने बुधवार, 18 सप्टेंबर रोजी दोन केंद्रशासित प्रदेशांसह एकूण 11 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मते, ईशान्य छत्तीसगडवरील नैराश्य उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि आज उत्तर मध्य प्रदेश आणि दक्षिण-पूर्व उत्तर प्रदेशमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडू शकतो.

Jammu And Kashmir Election Live: "लोकशाही बळकट करा", जम्मू आणि काश्मिरमधील जनतेला पंतप्रधानांचे आवाहन

"जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू होत असताना, मी आज मतदान करणाऱ्या मतदारसंघातील सर्वांना मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन करतो. मी विशेषत: तरुणांना आवाहन करतो की सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बाजावावा" असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

Jammu And Kashmir Election Live: जम्मू आणि काश्मिर विधानसभेसाठी आज पहिल्या टप्प्यात मतदान

काल अनंत चतुर्दशीसह राज्यासह देशभरात गणेश उत्सव जल्लोषात पार पडला. दरम्यान दिल्लीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या मुख्यमंत्री पदासाठी निवड केली आहे. आज जम्मू आणि काश्मिरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.

यासह आज देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सहाव्यांदा उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.

यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.