मुंबई: ऐनवेळी आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द (maharashtra medical exam) करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये (students) रोषाची भावना आहे. विद्यार्थ्यांनी ही परिक्षा देण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास केला होता. त्यामुळे परिक्षा (exam) रद्द करण्याचा निर्णय अचानक का घेतला? एक-दोन दिवस आधी का नाही निर्णय घेतला? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. ऐनवेळी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द होण्यासाठी न्यासा कंपनीला जबाबदार धरण्यात येत आहे.
कंपनीच्या चुकीमुळे हे सर्व घडल्याचा आरोप होत आहे. दरम्यान न्यासा कंपनीविरोधात हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या होत्या. उत्तर प्रदेशात पेपर लीक करण्याचा तर हरियाणात निकालात गोंधळ घातल्याचा आरोप होता. पंजाबमध्ये ब्लॅकलिस्ट केल्यानंतर कंपनीने कोर्टात धाव घेतली होती. ही सर्व कागदपत्र साम टीव्हीच्या हाती लागली आहेत. त्यामुळे अशा कंपनीला कंत्राट का दिलं? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
न्यासा कंपनीच्या विरोधात आमदार श्रीकांत देशपांडे यांनी सरकारला पत्र लिहून माहिती दिली होती. चार राज्यात कारवाई झाली होती. ही सर्व माहिती देऊनही हा गोंधळ होण्याची सरकार वाट पाहात होते का? सरकार या कंपनीवर इतके मेहरबान का? हे सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.