Mhada Home : गृहस्वप्न स्वप्नच राहणार! चालू वर्षात म्हाडा केवळ १२ हजार ७२४ घरेच उभारणार

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) सन २०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला.
MHADA Home scheme
MHADA Home schemesakal
Updated on
Summary

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) सन २०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला.

मुंबई - मुंबई, पुण्यात राहणाऱ्या नोकरदार वर्गाचे या शहरात आपल्या स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असते. मात्र चालू वर्षात म्हाडाने राज्यात केवळ १२ हजार ७२४ घरे प्रस्तावित केली आहेत. त्यामुळे अनेकांचे गृहस्वप्न यावर्षी अपूर्ण राहण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) सन २०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. यात प्राधिकरणाच्या मुंबई, पुणे, कोंकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या प्रादेशिक मंडळांतर्फे एकूण १२,७२४ घरांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ५८००.१५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईत २१५२ घरांची उभारणी प्रस्तावित

मुंबई मंडळाअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात २१५२ घरांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी ३६६४.१८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर मुंबईतील इतर महत्वाच्या अँटॉप हिल (वडाळा) येथील गृहनिर्माण योजनेसाठी २४ कोटी रुपये, बॉम्बे डाईंग मिल (वडाळा) योजनेसाठी ३० कोटी रुपये, कोपरी पवई येथील गृहनिर्माण योजनेसाठी १०० कोटी रुपये, कन्नमवार नगर विक्रोळी येथील योजनेसाठी २१३.२३ कोटी रुपये, मागाठाणे बोरिवली येथील योजनेसाठी ५० कोटी रुपये, खडकपाडा दिंडोशी येथील गृहनिर्माण योजनेसाठी १८ कोटी रुपये, पहाडी गोरेगाव येथील गृहनिर्माण योजनेसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.

कोंकण मंडळाअंतर्गत ५६१४ घरांची उभारणी प्रस्तावित

कोंकण मंडळाअंतर्गत ५६१४ घरांची उभारणी करण्याचे प्रस्तावित असून सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात त्यासाठी ७४१.३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंडळांतर्गतच्या विरार बोळींज गृहनिर्माण प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात १० कोटी रुपये, बाळकुम ठाणे गृहनिर्माण प्रकल्पासाठी ३३ कोटी रुपये, माजिवाडे ठाणे संयुक्त भागीदारी प्रकल्पासाठी ३५ कोटी रुपये, मिरारोड टर्न की प्रकल्पासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

मुंबईतील बहुचर्चित प्रकल्पांसाठी करण्यात आलेली तरतूद

बीडीडी चाळींचा पुनर्विकास योजनेसाठी २२८५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गोरेगांव सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपये, धारावी पुनर्विकास प्रकल्प टप्पा १ ब साठी ५९ कोटी रुपये तर पोलिस गृहनिर्माण प्रकल्प वसाहतीच्या पुनर्विकासासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राज्यातील इतर मंडळे आणि निधीची तरतूद

मंडळ प्रस्तावित सदनिका सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात निधी

पुणे मंडळ ८६२   ५४०.७० कोटी

नागपूर मंडळ १४१७ ४१७.५५ कोटी

औरंगाबाद मंडळ १४९७ २१२.०८ कोटी

नाशिक मंडळ ७४९ ७७.३२ कोटी

अमरावती मंडळ ४३३ १४६.२४ कोटी

सन २०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पात शून्य तूट

प्राधिकरणाच्या सन २०२३-२०२४ च्या १०१८६.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व सन २०२२-२०२३ च्या सुधारित ६९३३.८२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची नुकतीच मान्यता मिळाली आहे. सन २०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पात शून्य तूट तर सन २०२२-२०२३ च्या सुधारित अर्थसंकल्पात ११३६.४७ कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()