Maharashtra Ministers: पाच मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याच्या बातम्यांवर देसाई भडकले; मीडियाला दिलं जाहीर आव्हान!

शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaiesakal
Updated on

मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्याकाही दिवसांपासून मंत्रिमंडळातून शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची चर्चा सुरु होत्या. यासंदर्भातील काही बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. पण या सर्व बातम्यांमध्ये काहीही तथ्थ नाही, असं स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं आहे. तसेच ज्या मीडियानं या बातम्या दिल्या त्यांना त्यांनी थेट आव्हानही दिलं. (Maharashtra Ministers no truth in news that five ministers will withdrawl ShivSena challenge to media)

Shambhuraj Desai
Video: दिल्ली NCRमध्ये भूकंपाचे झटके! शेजारील चार राज्येही हादरली: Earthquake

देसाई म्हणाले, गेले दोन-तीन दिवस झाले माध्यमांमध्ये शिवसेनेच्या काही मंत्र्यांच्या बातम्या प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात दाखवल्या जात होत्या. जाणीवपूर्वक काही मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करुन त्यांना दिल्लीनं आणि भाजपनं त्यांच्याबाबत काही निर्णय घेतले असून मुख्यमंत्र्यांनी याबाबत फेरविचार करावा अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या.

Shambhuraj Desai
Cabinet Decision: " शेतकऱ्यांना मोठी मदत ते विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ" ; मंत्रिमंडळाच्या बैठकितील महत्त्वाचे निर्णय!

याबाबत अशी कुठलीही वस्तूस्थिती नाही, ज्या बातम्या मीडियानं दाखवल्या त्यात तथ्य नाही. या बातम्या टेबल स्टोरी आहेत, यामध्ये कुठलंही तथ्य नाही. ज्यांनी या बातम्या दिल्या त्या पत्रकारांना आमचं जाहीर आव्हान आहे की, जर या बातम्या चुकीच्या ठरल्या तर तुम्ही त्या मंत्र्यांची माफी मागणार आहात का? ज्या मंत्र्यांचा उल्लेख तुम्ही त्यांचे फोटो वापरुन वाहिन्यांवर आणि प्रिंटमध्ये बातम्या चालवल्या त्यांच्या बाबतच्या बातम्या खोट्या ठरल्या तर तुम्ही माफी मागणार का? शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार चांगलं काम करतं आहे, हे काम असंच करत राहू" असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.