State Elections:महाराष्ट्रातील भाजपचे सर्व आमदार परराज्यात प्रवासाला, केंद्राकडून घेतली जाणार शाळा

भारताच्या अनेक राज्यांमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी काळात पार पडणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक राज्यामध्ये सर्व राजकीय पक्षांची जय्यत तयारी सुरु झाली आहे
BJP
BJPesakal
Updated on

Assembly Election:भारताच्या अनेक राज्यांमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी काळात पार पडणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक राज्यामध्ये सर्व राजकीय पक्षांची जय्यत तयारी सुरु झाली आहे. अशातच, केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षानेही निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे.

येणाऱ्या काळात अनेक राज्यांमधील निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवाराची यादी जाहीर केली आहे. आता बाहेरच्या राज्यातील या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे आमदार त्या राज्यात जाणार आहेत.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीची 'लिटमस टेस्ट' म्हणून राज्यातील विधानसभा निवडणुकांकडे पाहिलं जातं. तेलंगणा, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये निवडणूका जाहीर झाल्या आहेत.

त्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचे आमदार परराज्याचा प्रवास करणार आहेत. लोकसभा निवडणूका पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील आमदारांकडून केंद्र सरकार भरगच्च अभ्यास करुन घेणार आहेत.(Latest Marathi News)

BJP
Chandrayaan 3 Video : विक्रम लँडरमधून कसा दिसतोय चंद्र? 'चांद्रयान-3'ने पाठवला खास व्हिडिओ, पाहा

महाराष्ट्रातील भाजपच्या प्रत्येक आमदाराला दुसऱ्या राज्यात ७ दिवसांचा प्रवास करुन विश्लेषण करावं लागणार आहे. सकाळी ७ पासून रात्री ७ पर्यंत या आमदारांवर ॲपद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे. या काळात देशभरातील भाजपचे आमदार पक्षाचा प्रचार करणार आहेत.(Latest Marathi news)

BJP
मुंबई विद्यापीठ निवडणूक का महत्वाची? राजपुत्र विरुद्ध उद्धवपुत्र पहिल्यांदाच थेट मैदानात! मात्र सरकारने सामनाच रद्द केला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()