Maharashtra MLC Election : अमरावतीमध्ये मोठा फटका! ७३ मतं बाद, रणजीत पाटलांच्या जिल्ह्यात...

Maharashtra MLC Election
Maharashtra MLC Election
Updated on

राज्यातील नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Maharashtra MLC Election)

सर्वात चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर निवडणूक निकालांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अमरावती पदवीधर मतदारसंघात मते बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. 

अमरावतीत २६५ पोस्टल मतांपोकी ७३ मते बाद झाली आहेत. १९२ मतं वैध ठरली आहेत. स्वयंघोषणा पत्र लावले नसल्याचे हे मतं बाद ठरवण्यात आली आहेत. याचा मोठा फटका उमेदवारांना बसू शकतो.

Maharashtra MLC Election
Ajit Pawar : "नवीन पायंडे पाडू नये..." ; पुणे पोलिसांच्या मास्टर प्लॅनवर अजित पवार संतापले

अमरावतीमध्ये पोस्ट मतं मोजनी संपली आहे. बाद झालेल्या मतांमध्ये अकोला जिल्ह्यातील आकडा मोठा आहे. भाजप उमेदवार रणजीत पाटील यांच्या जिल्ह्यातील ३४ मतं बाद झाली आहेत. अमरावतीमध्ये १९ तर वाशिममध्ये एक मतं बाद झाले आहे. बुलढाणा १२ तर यवतमाळमधील ७ मतं बाद करण्यात आली आहेत. 

Maharashtra MLC Election
Adani Group Row : अदानी समूहाच्या वादात आता RBI ची उडी ; बँकांकडून मागितली महत्त्वपूर्ण माहिती

कोकणात शेकापला मोठा धक्का

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. शेकापच्या बाळाराम पाटलांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघात भाजपने बाजी मारली आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे २० हजार ६६८ मतांनी विजय मिळवला.

Maharashtra MLC Election
Pune Bypoll Election 2023: कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीबाबत अखेर अजित पवार बोलले; म्हणाले, प्रत्येकाला...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.