MLC Election Results: काँग्रेसने ट्रॅप लावला अन् गद्दार बरोबर अडकले; त्या आमदारांची यादी हायकमांडकडे सादर

Maharashtra MLC Election Results 2024: काँग्रेसची सात आमदार फुटल्याची माहिती आहे. याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
congress
congress
Updated on

मुंबई- विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. काँग्रेसची सात आमदार फुटल्याची माहिती आहे. याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विधान परिषदेत गद्दारी करणाऱ्या आमदारांची यादी हायकमांडकडे सादर केली जाणार आहे.

गद्दारांवर कारवाई करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या बैठकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्याबाबत चर्चा झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्याचे हायकमांडचे आदेश मिळाल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या काही आमदारांनी पक्षाच्या विरोधात काम केल्याने शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला आहे.

congress
MLC Election Result: "लोकसभेला फसवून मतं घेतली त्याची सूज आता उतरायला लागली"; विजयानांतर CM शिंदेंचा मविआवर हल्लाबोल

मागे चंद्रकांत हंडोरे यांच्या निवडणुकीवेळी देखील गद्दारी झाली होती. याच गद्दारांची ओळख पटवण्यासाठी काँग्रेसने लावलेल्या ट्रॅपमध्ये गद्दार बरोबर अडकले आहेत. काँग्रेसने मदतान करण्यासाठी दोन गट केले होते. २६ ते २७ आमदारांचा गट सातव यांना मतदान करणार होता. तर, दुसऱ्या गटाला जयंत पाटलांना मतदान करण्यास सांगितले होते. त्यांना डमी पत्रिकेवर खुना करण्यास सांगितले होते.

काँग्रेसच्या चिंतन बैठकीत त्या गद्दारांवर कारवाई करण्याबाबत चर्चा झाली आहे. या गद्दार आमदारांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधून फुटलेल्या आमदारांवर कारवाईसाठी हायकमांडला रिपोर्ट सादर झाल्याची माहिती 'साम टीव्ही'ने दिली आहे.

विधान परिषदेमध्ये महायुतीच्या ९ उमेदवारांचा विजय झाला आहे. तर, महाविकास आघाडीच्या २ उमेदवारांचा विजय झाला आहे. काँग्रेसचे सात आमदार फुटले आहेत. डमी मतपत्रिकेद्वारे काँग्रेस गद्दार आमदारांचा शोध घेणार आहे. डमी पत्रिका देऊन त्यावर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा असा पसंतीक्रम द्यायचा होता. काँग्रेसने मतदान करताना आमदारांचे गट तयार केले होते. कोणत्या उमेदवाराला कोणता पसंतीक्रम द्यायचा हे सांगितलं होतं.

congress
MLC Election: १०० कोटी अन्… शरद पवारांच्या आमदाराने सांगितला फुटलेल्या मतांचा रेट

A नावाच्या आमदाराला चौथी पसंती दर्शवताना उजव्या कोपऱ्यात मार्क करायचं होतं. तर, B उमेदवाराला तिसरा पसंतीक्रम देताना डाव्या कोपऱ्यात मार्क करायचे होते. आमदारांच्या डमी मतपत्रिकेमध्ये याची नोंद करून ठेवण्यात आली होती. संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सतेज पाटील, अभिजीत वंजारींची निवडणूक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली होती. सूचना दिली त्यानुसार मतदान झालं का नाही हे पाहणं निवडणूक प्रतिनिधींचे काम होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com