Maharashtra MLC: राज्यपाल नियुक्त 12 ऐवजी 7 आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब? या महत्वाच्या नावांची चर्चा

पण यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, जाणून घेऊयात.
Analysis Of Maharashtra MLC Election Result 2024
Analysis Of Maharashtra MLC Election Result 2024 Esakal
Updated on

मुंबई : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ जागा भरण्यासाठीच्या हालचालीला वेग आला असून बारा ऐवजी केवळ सातच नावांची यादी मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्याकडे पाठविण्यात आल्याची चर्चा आहे. पण यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, जाणून घेऊयात.

Analysis Of Maharashtra MLC Election Result 2024
Atul Parchure: लग्नाचा 25 वा वाढदिवस अन् कॅन्सरचं निदान!

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या १२ आमदारांची नियुक्ती होणे आवश्यक असल्याने त्यादृष्टीने महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये याबाबत हालचाली सुरु होत्या. पुढील दोन दिवसांत विधानभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही नावे राज्यपालांकडे तातडीने पाठविल्याचे बोलले जात आहे.

Analysis Of Maharashtra MLC Election Result 2024
Bopdev Ghat Case Update: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील दुसरा आरोपी ताब्यात; पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक

भाजपच्या ३ आणि शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या प्रत्येकी दोन सदस्यांची नवे राज्यपालांकडे पाठविण्यात आली आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवाडी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. तर, शिवसेनेकडून मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. भाजपच्या चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि धर्मगुरू महाराज राठोड यांच्या नावांची शिफारस करण्यात आलेली असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.