Monsoon Session: दोन विधेयकं मंजूर, मुख्यमंत्र्यांनी गाजवला दिवस

eknath shinde
eknath shindesakal
Updated on

दोन विधायके मंजूर, मुख्यमंत्र्यांनी गाजवला दिवस

नव्या सरकारच्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनात आज दोन विधेयकं मंजूर झाली आहेत. या विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत अनेक विरोधकांचे किस्से सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या फटकेबाजीमुळे सभागृहात विरोधकही पोट धरून हसले.

थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचे विधेयक मंजूर

आज विधानसभेत दोन प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून त्यामध्ये थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीच्या प्रस्तावाला विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांनी मंजूरी दिली.

जनतेतून सरपंच,नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयावर विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे उत्तर 

राज्यातील ९ हजार ग्रामपंचायतींनी थेट जनतेतून सरपंच निवडीची मागणी केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे ऐकतो, त्यावरून हा निर्णय घेतला आहे असं म्हणत आम्ही सक्षम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

"जे काही झालं ते का झालं? हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यावर मी जास्त बोलणार नाही. जेव्हा एखादा निर्णय घेतला जातो तेव्हा अनुभवामुळेच बदलला जातो. अजित दादाही म्हणाले होते की, जनतेतून नगराध्यक्षांची निवड करण्यात यावी." असं मुख्यमंत्री विधानसभेत बोलताना म्हणाले आहेत.

विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू

यावेळी मुख्यमंत्र्यांनी थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचं विधेयक मांडलं आहे.

विधानसभेत भास्कर जाधव आणि शंभुराज देसाई आमनेसामने

विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव आणि शिंदे गटाचे शंभुराज देसाई हे आमनेसामने आले आहेत. "सत्तेच्या बाहेर भाजपवाले माशासारखे तडफडत होते" अशी टीका भास्कर जाधव यांनी तर, जाधव काव काव का करतात? अशी टीका शंभुराज देसाई यांनी केली आहे.

सगळीच कारागृह मोकळी करा; बिल्किस बानो प्रकरणावरुन वातावरण तापलं!

बिल्किस बानो प्रकरणातल्या आरोपींना भारतात ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त सोडण्यात आलं आहे. मग इतर गुन्ह्यातल्या आरोपींनाही सोडा. एकाला एक आणि बाकीच्यांना दुसरा, असं का? सगळी कारागृहं मोकळी करा. कायदा समान असायला हवा, अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी अधिवेशनात केली आहे.

नगराध्यक्षांच्या जनतेतून निवडीच्या विधेयकाला जोरदार विरोध

नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून झाली तर पारदर्शक कारभार होईल, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातलं विधेयक सभागृहात मांडलं. मात्र त्यावरुन शिंदेंना विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. हे विधेयक मागे घेण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. नगराध्यक्ष जनतेतून निवडायचाय, तर मुख्यमंत्रीही जनतेतूनच निवडा, अशी मागणीही अजित पवारांनी केलीय. शिवाय, आमच्यासोबत सत्तेत असताना या विधेयकाला विरोध केला आणि आता तुम्हीच याची मागणी करताय, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री शिंदेंना सुनावलं आहे.

मेटेंच्या निधनानंतर आमदारांच्या ड्रायव्हर्ससाठी प्रशिक्षण शिबिर

विनायक मेटे यांच्या अपघातानंतर आमदारांच्या वाहन चालकांना ड्रायव्हिंगचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. २४ ऑगस्टला सकाळी दहा ते एक या वेळात वाय बी सेंटरमध्ये हे शिबिर होणार आहे. आमदारांच्या सुरक्षेसाठी हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे.

'चला, काही तरी मिळालं' ; सभागृहात शिरसाटांना आमदारांचा टोला

आज अधिवेशनाच्या कामकाजास सुरुवात झाली. तेव्हा विधानसभेचे तालिका सभापती संजय शिरसाट यांची सभागृहात एन्ट्री होताच उपस्थित आमदारांनी संजय शिरसाट यांचे स्वागत करत 'चला काही तरी मिळाल', असा टोमणा मारला. त्यावर सभागृहात चांगलाच हशा पिकला.

विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधक जमले. पुन्हा 50 खोके, एकदम ओेके

शिंदे-फडणवीस सरकारविरोधात विरोधक पुन्हा आक्रमक झाले आहेत. विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधक पुन्हा 50 खोके, एकदम ओेके अशी घोषणा देताना दिसत आहेत.

तसेच, गद्दारांची भाकरी; भाजपची चाकरी अशी घोषणाही विरोधक देताना दिसत आहेत. जाहीर करा, जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा. पन्नास खोके, एकदम ओके ,खाऊन खाऊन 50 खोके; माजलेत बोके, ईडी ज्याच्या घरी; तो भाजपच्या दारी अशी घोषणाही विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधक देताना दिसत आहे.

सरकार याबाबत सकारात्मक पाऊले उचलेल- फडणवीस

अजित पवारांच्या मागणीनंतर चौथी लेन सुरू करण्याबाबतमी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करीन. सरकार याबाबत सकारात्मक पाऊले उचलेल. ड्रायव्हरचा जबाब बदलत आहे. घातपात आहे की नाही याची शंका उपस्थित होऊ नये म्हणून सीआयडी याचा तपास करत आहे. यात शासकिय मदत मिळण्यास काही त्रूट झाली आहे का ? याचाही स्वतंत्र तपास केला जाईल. मंत्री- आमदार यांनी शक्यतो रात्रीचे प्रवास टाळा.... या अपघातातून आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. असे आवाहनही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं.

भविष्यात काही अपघात घडल्यास त्या ठिकाणी तात्काळ मदतीसाठी अचूक लोकेशन मिळाले यासाठी पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) प्रणाली बसवली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

घटनेनंतर सुरूवातीला चर्चा होते आणि प्रश्न मागे पडतो- अजित पवार

सध्याची सर्वात वाहतूक कोंडी ही पुणे मुंबई एक्सप्रेस वरती आहे. सध्या ६ लेन आहे. ते ८ लेन करण्यांत याव अशी मागणी यावेळी अजित पवारांनी केली. म्हणजे अवजड वाहतुकीला जागा मिळेल. अनेक ठिकाणी कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दंड बसत आहेत. अनेक आमदार यांना लाखो रुपयांचा दंड बसला आहे. त्याचं म्हणन आहे की महिन्या भरात जे कमवल तेवढ यात गमवावा लागतं. विनायक मेटे यांच्या पन्तीचा हा मला फोन आला होता. दुसरं कोणावर अशी वेळ येऊ नये यासाठी अंमलबजावणी केली पाहिजे. घटनेनंतर सुरूवातीला चर्चा होते आणि प्रश्न मागे पडतो. त्यामुळे या गोष्टीची गंभीर दखल घ्या.

विनायक मेटेंच्या अपघातावेळी काय घडलं

चालकाने केलेला प्रश्न खरा की खोटा हा प्रश्न उपस्थित होत आहे. चालकाचा अंदाज चुकल्याने विनायक मेटेंच्या गाडीचा अपघात. मेटेंच्या चालकाने ११२ ला फोट केला होता. टनेलजवळ या असे त्याने सांगितले पण तिथे काहीच नव्हत. ड्रायव्हर भांभवलेला होता. आयआरबीची गाडी सात मिनीटांत अपघातजवळ पोहचील. ड्रायव्हारने लोकेशन नीट सांगितल असत तर मुंबई पोलिस वेळेवर पोहचले असते.

यंत्रणा बदलण गरजेंच आहे. ही केस सीआयडीला वर्ग करण्यात आली आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

जालन्यातील प्राचीन मूर्तीची चोरी; राजेश टोपेंनी मांडला मुद्दा

समर्थ रामदास यांच्या जन्मगावातील राममंदीरातील ऐतिहासीक मूर्ती आज पहाटे चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. जवळपास ४५० वर्ष जून्या असलेल्या या पंचधातूच्या मूर्ती चोरीला गेल्या. हा मुद्दा राष्ट्रवादी नेते राजेश टोपे यांनी मांडला.

आज सकाळी यासंदर्भात माहिती मिळाली. तात्काळ या लोकांना अटक करण्यात यावी. असा आदेश देण्यात आला आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभेत संजय गांधी नीराधार योजनेवर चर्चा

दुसऱ्यादिवशी काय घडलं?

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. आरोग्याच्या सबंधित विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना सावंतांची चांगलीच दमछाक झाली. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. अखेरीस प्रश्न मागे ठेवावा लागला. त्यानंतर बीड येथील स्त्री भृण हत्या प्रश्नी उत्तर देताना बीड जिल्हा यासाठी प्रसिद्ध आहे असं वक्तव्य आमदार भारती लव्हेकर यांनी केलं, त्यानंतही विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला.((Maharashtra Monsoon Assembly Session)

मुंबई गोवा महामार्गावरुन विधानसभेत गोंधळ, मुंबई-गोवा हायवेवर अडीच वर्षात काही काम झालं नाही का? असा प्रश्न भाजपनं सेनेच्या आमदारांना विचारला, त्यावर भास्कर जाधव यांनी गेल्या 12 वर्षात हे चंद्रकांतदादा, नितीन गडकरींचं अपयश आहे का असा प्रति सवाल केला

पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा, बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या संदर्भात लक्षवेधी, फडणवीस म्हणाले, राज्यात ज्या ठिकाणी असं सुरु आहे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल.

हरिहरेश्वर येथे सापडलेल्या एके 47 प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा, संपूर्ण माहिती घेऊन काही वेळात देवेंद्र फडणवीस सभागृहात निवेदन केलं.

पहिल्या दिवशी काय घडलं?

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 17 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्रोपदी मुर्मू यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्द्ल अभिनंदन केलं. तसेच जगदीप धनखड यांचंही उपराष्ट्रपती निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचं अभिनंदन केलं. ((Maharashtra Monsoon Assembly Session)

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये मदत देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, विधिमंडळात सादर झालेल्या पुरवणी मागणीत याची तरतूद करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला 17 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. 17 आणि 18 ऑगस्ट रोजी दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या. यानंतर आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांचा जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता. आरोग्य व्यवस्था तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्याचं चित्र दुसऱ्या दिवशी पाहायला मिळालं होतं. आज राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, रस्त्यांची दुरावस्था, राज्यातील कायदा सुव्यवस्था यासह अन्य मुद्द्यांवरुन अधिवेशनाचा तिसरा दिवसही गाजणार. (Maharashtra Monsoon Assembly Session Live Updates Eknath Shinde Devendra Fadanvis Ajit Pawar)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()