Devendra Fadnavis: वडेट्टीवारांना पाडायला गेले अन् फडणवीस अपयशी झाले... वाचा भन्नाट किस्सा

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
Updated on

Devendra Fadnavis:  काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. अजित पवार गट शिवसेना-भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाल्यानंतर गेल्या महिनाभरापासून विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. यापूर्वी अजित पवार या पदावर होते. अजित पवार यांनी ३० जून रोजी या पदाचा राजीनामा दिला आणि २ जुलै रोजी सरकारमध्ये सहभागी झाले.

वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले. अजित पवार हे विजय वडेट्टीवार यांना आसनापर्यंत घेऊन गेले.विरोधी पक्षनेतेपदासाठी घेऊन जात असताना सभागृहात दोन्ही बाजूंनी जोरदार हशा पिकला. खरे तर काही काळापूर्वी ते स्वतः या पदावर होते आणि आता ते सरकारसोबत बसले आहेत. यावेळी सभागृहात विजय वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी एक भन्नाट किस्सा सांगितला. एक कठीण पोटनिवडणूक होती. विजय वडेट्टीवार यांना त्यांच्या कर्तृत्वाने अनेक संधी मिळाली. विधानपरिषदेत, फॉरेन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये त्यांनी काम केले. प्रत्येक संधीचा त्यांनी समाजाकरीता आणि पक्ष वाढवण्याकरीता फायदा केला. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेमध्ये विदर्भातील प्रमुख नेते म्हणून विजय वडेट्टीवार यांच्याकडे पाहल्या जायचे. ज्यावेळी राणे साहेबांनी त्या काळात शिवसेना सोडली. राणे यांना साथ देणारे विजयभाऊ देखील होते. त्यावेळी कठीण अशाप्रकारची निवडणूक होती. पोटनिवडणूक होती. त्या पोटनिवडणुकीत विजय भाऊंना पाडण्यासाठी आम्ही सगळे गेलो होतो. कारण ते नुकतेच शिवसेना सोडून काँग्रेसकडून उभे राहिले होते. आम्हाला युतीमध्ये त्यांना पराजीत करायचे होते.

Devendra Fadnavis
Nashik News : अरे बापरे ; शस्त्रक्रिया होती उजव्या पायाची आणि डॉक्टरने केली डाव्या पायाची

पण त्यावेळी मी बघितलं की त्यांचा संपर्क दांडगा होता. त्या पोटनिवडणुकीत ते निवडून आले. त्यानंतर सातत्याने ते निवडून आले. २०१४ मध्ये त्यांनी चिमूरच्या ऐवजी ब्रम्हपूरी मतदारसंघ निवडला. वेळेवर त्यांनी हा मतदारसंघ निवडला होता. ब्रम्हपूरी सारख्या मतदार संघात पहिल्यांदा गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी देखील विजय मिळवला. त्यांचा संपर्क केवळ एका मतदारसंघापूर्ता मर्यादीत नाही हे त्यांनी दाखवून दिले.

२०१० मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यावेळी विविध खात्याचे राज्यमंत्रीपद देखील वडेट्टीवार यांच्याकडे होते. २०१४ च्या शेवटच्या टप्प्यात विखे पाटील विरोधीपक्षनेते म्हणून आमच्याकडे आले. त्यावेळी आपण विरोधीपक्षनेता झाला. त्यावेळी देखील तुम्ही तुमची छाप पाडली, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

Devendra Fadnavis
Gyanvapi : 'ज्ञानवापी' प्रकरणात नवा ट्विस्ट! 'मंदिर नव्हे, मशीद नव्हे, हा बौद्ध मठ...', सुप्रीम कोर्टात याचिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.