आज विधानसभेत विरोधकांकडून अनेक मागण्या केल्या असून काल मंजूर झालेला सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडीचे विधेयक आज विधानपरिषदेतही मंजूर झाले आहे. त्याचबरोबर पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग आठ पदरी करण्याची मागणी विरोधीपक्षनेते अजित पवारांनी केली आहे.
मराठा समाजावर सतत अन्याय होत असल्याचं कारण सांगत आत्महत्या करण्याचा प्रयत्न या तरूणाने केला आहे. दरम्यान या तरूणाला वाचवण्यात यश आलं आहे.
मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा आठ पदरी व्हावा, यासाठी सरकारने ताबडतोब हे काम हातामध्ये घ्यावे अशी मागणी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली.
थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीचे विधेयक काल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडले होते. त्याला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मान्यता दिली होती. ते विधेयक आज विधानपरिषेदही मंजूर झाले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना भावनिक पत्र लिहित आत्महत्या न करण्याचं अवाहन केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, मी एक साधा सरळ माणून असून मला तुमच्या वेदना कळतात. तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ आहे, आत्महत्या करू नका. असं अवाहन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
१) अतिवृष्टीमुळे (६५ मिमि पेक्षा जास्त) झालेली नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र, आजपर्यंत सततची मागणी लक्षात घेता, सततच्या पावसामुळे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल.
२) गोगलगायी, यलो मोझॅक यासारख्या कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन होणारे नुकसान याबाबतही पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून अशाप्रकारच्या किडीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल.
३) झालेल्या पावसाचे व इतर हवामान विषयक बाबीचे मोजमाप करण्यासाठी यापूर्वी प्रत्येक २४०० महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलेले आहे. ही संख्या अपुरी असल्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज मिळेल व विमा दावे वेगाने निकाली काढता येतील.
४) पिक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे फोन करुन सूचना देण्यात येतात. तसेच कृषि कार्यालय, तहसिल कार्यालय किंवा ज्या बँकेत विमा भरलेला आहे अशा ठिकाणी नुकसानीची सूचना/अर्ज स्वीकारले जातील व हे अर्ज ग्राह्य धरले जातील अशा लेखी सूचना विमा कंपन्यांना देण्यात येतील.
५) नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५०,०००/- (रुपये पन्नास हजार मात्र) प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरु केले जाईल.
६) नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारा मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्यात येईल. लवकरच मोबाईल अॅप्लीकेशन द्वारे ई-पंचनामा करणे, त्यासाठी आवश्यक निधीची मागणी करणे व संबंधितांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट पैसे जमा करणे अशा प्रकारची प्रणाली नव्याने विकसित करण्यात येत आहे. यामध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा (सॅटेलाइट इमेज) वापर करण्यात येणार आहे. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येईल.
(6) राज्यात ज्या ज्या क्षेत्रांमध्ये दरड कोसळणे किंवा वारंवार पूर येणे इत्यादी आपत्तीप्रवण क्षेत्र आहे तिथे लोकांना सतत धोकादायक स्थितीमध्ये रहावे लागते. अशा नागरिकांच्या पुनर्वसनाचे कोणतेही धोरण नाही. अशा क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण निश्चित करण्यात येत आहे. यामुळे होणारी संभाव्य जिवित हानी मोठ्या प्रमाणावर टाळता येईल.
८) डिजिटल शेती अभियानामध्ये बियाणांची ट्रेसेबिलिटी, ब्लॉक चेन मॉडेल, आर्टिफिशियल इन्टलिजन्स, को-ऑपरेटीव्ह सोसायटी व किसान उत्पादक समूहांच (FPO) संगणकीकरण इत्यादी कार्ये हाती घेतली जातील. यामुळे उच्च दर्जाचे बियाणे व खते शेतकऱ्यांना योग्य दरात मिळून त्यांचे उत्पन्न वाढेल.
९) आधुनिक शेतीमध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी, नॅनो युरीया, इरिगेशन ऑटोमायझेशन, कंट्रोल कल्टिव्हेशन ह्या टेक्नॉलॉजीच्या वापरास शासनाद्वारे पाठींबा दिला जाईल.
१०) पिक विविधीकरणा (Crop Diversification) अंतर्गत "तेलबिया, डाळवर्गीय पिके व फलोत्पादन" यावर विशेष भर देण्यात येऊन मूल्य साखळी विकसित करण्यात येईल. उच्च मूल्य दर्जाची पिके व फलोत्पादक पिके यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक संपूर्ण इको सिस्टिम तयार केली जाईल.
११) कृषी क्षेत्रामध्ये सुगंधीत व औषधी वनस्पती लागवड व उत्पादन करण्यासाठी त्यांना योग्य त्या सुविधा व केंद्रा समवेत सहजीवन साधण्याचे कार्य प्रभावी पध्दतीने हाती घेतले जाईल.
१२)केंद्रशासित योजनांची सुयोग्य अमलबजावणी करण्यासाठी सुनियोजित पध्दतीने कार्य केले जाईल. जसे की, “अॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड मध्ये प्रोजेक्ट मॉनिटरींग युनिट सक्षम करुन जलद गतीने दिशा देण्याचे काम केले जाईल.जैविक शेती व नैसर्गिक शेती या संदर्भात केंद्राच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील जेणेकरुन आपली शेती विष मुक्त होईल.
१४) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी करण्यासाठी शेत शिवार ते बाजारपेठे पर्यंत असणारी संपूर्ण दर्जात्मक साखळी तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील. किसान उत्पादक समूहास प्रोत्साहन देण्यासाठी कार्य केले जाईल.
१५) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी सर्वकष कृती आराखडा शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयाने तयार करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबतचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर केले जाईल.
महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे, म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतक-यांच्या पोटीच जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचंच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची देशाची भूक भागवण्याचंही काम करताहात, म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल, तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे.
परंतु, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जातं, तुमच्यातलेच काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा मार्ग पत्करतात... हे चित्र पाहून मात्र माझं मन एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषण्ण होऊन जातं....वाटतं, की आपल्याच घरातलं कुणी आपण गमावलंय....
लक्षात घ्या, माझ्या शेतकरी भावांनो, तुम्ही आहात तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे... तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्या-पाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे, की 'रडायचं नाही, लढायचं....'
शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका... आत्महत्या करू नका... मी तुमच्यासारखाच रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात. काळजाला भिडतात. या आसमानी संकटातून, या सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखतं यश सामावलेलं असतं....
मी आणि माझं सरकार सतत २४ तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे, याची खात्री बाळगा... जीव देणं बंद करूयात, जीव लावूयात एकमेकांना...
चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूयात आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया!
जय महाराष्ट्र !
आपलाच,
एकनाथ शिंदे
दूसरीकडे विधानभवनातही या प्रकऱणावरुन मोठा वाद झाला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना थेट धारेवर धरलं. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही या प्रकरणाची माहिती घेतली असून संबंधित शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच त्याला सर्व मदत केली, जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे.
ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. १८ लाख हेक्टर नुकसान झालंय. त्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करायला पाहिजे होते. मजुराला एकरकमी मदत करण्याची मागणी केली होती, पण तीही विचारात घेतली नाही. असे आरोप अजित पवारांनी केले आहेत.
विधानभवनाच्या बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. कांदळगावच्या एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. साताऱ्यातील कांदळगावचे शेतकरी सुभाष भानुदास देशमुख यांनी आज विधिमंडळ परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सुभाष देशमुख यांनी विधान भवनाबाहेर रॉकेल अंगावर टाकत स्वत:ला पेटवून घेतलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवत देशमुख यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंबईत संदेश दळवी (वय २४ ) या गोविंदाचा मृत्यू झाला आहे. यानंतर विरोधकांकडून सत्ताधारांवर जोरदार टीका झाली. दरम्यान, विधानसभेत मुख्यंमंत्री शिंदे यांनी संदेश दळवी यांच्या कुटुंबियांना 10 लाखाची मदत दिली जाईल अशी माहिती दिली. तसेच, जखमींना दोन अवयव निकामी झालेल्यांना मुख्यमंत्री निधीतून ७ लाख रुपये मदत, एक अवयव निकामी झालेल्यांना ५ लाख व मृत गोविंदा पथकाला १० लाख मुख्यमंत्रीसहायत्ता निधीतून दिला जाईल असे मुख्यमत्री यांनी सांगितले.
एका मंत्रीमहोदयांनी पायऱ्यांवर आपल्या सर्वांसमोर आम्हाला विचारलं की ५० खोके तुम्हाला हवेत का? म्हणजे नक्की ५० खोक्यांमध्ये होतं काय? आम्ही आज फिफ्टी-फिफ्टीची बिस्किटं हातात घेतली होती. पण त्यांच्या हातात अजून काही ५०-५० चं होतं का? ते गुवाहाटीला का गेले? हा मोठा प्रश्न आहे.
या तात्पुरत्या गद्दार सरकारचे मंत्रीमहोदय जे बोलले, त्यांचं वक्तव्य या देशानं बारकाईने ऐकलं पाहिजे. अशा मस्तीमध्ये कुणीही मंत्री पायऱ्यांवर दुसऱ्यांना खुलेआमपणे ऑफर देऊ शकतो का? याचा विचार जनतेनं करायला हवा.
गद्दार आहेत. त्यांना गद्दारच म्हणणार. महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून ते निघून गेले. त्यांना गद्दार म्हणायचं नाही तर काय म्हणायचं?” असा सवाल त्यांनी केला आहे.
जे गद्दार आहेत तर त्यांना गद्दारच म्हणावं लागेल आणि भाऊ असते तर भाऊच म्हणालो असतो असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. जे नवीन सरकार आहे हे तथाकथित हिंदुत्ववादी सरकार असून पुण्यातील देखाव्यासाठी परवानगी नकारणे हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न करत या सरकार एकासुद्धा प्रश्नाला हात घातला नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
हे सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. अजूनही गोविंदांना जाहीर केलेली मदत मंडळापर्यंत पोहोचली नाही. सरकारने गोविंदांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण जाहीर केलं आहे पण त्यांना हे आरक्षण कसं मिळणार याचं स्पष्टीकरण सरकारने द्यावं असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना केला.
स्थहिती सरकार हाय हाय...विकासकामांना स्थगित देणाऱ्या धिक्कार असो. अशी घोषणाबाजी करत ओला दुष्काळ जाहिर करा अशी मागणी विरोधकांनी केली. फिफ्टी, फिफ्टी चलो गुवाहाटी अशी घोषणा त्यांनी बिस्कटचा पुडा दाखवत केली. या आंदोलना शिवसेना नेते अदित्य ठाकरेंचा देखील सहभाग होता.
भंडारा जिल्ह्यात महिला अत्याचाराची घडलेली घटना अतिशय लाजिरवाणी आहे. या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासून या प्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या महिलेवर उपचार सुरू आहेत. या महिला मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून प्राथमिक मदत देण्यात आली आहे. या प्रकरणात लाखनी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्यातील पीएसआय आणि एएसआय यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसंच महिला एलपीसीवर कारवाई करण्यात आली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्यावर विधानसभेत चर्चा करण्यात आली. मुंबईतील सर्व रस्त्यांच काँक्रिटीकरण करणार अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच, पुढील २ वर्षात मुंईत खड्डे शोधूनदेखील सापडणार नाही. मुंबईतील रस्त्ये खड्डे मुक्त करणार. पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
यासोबतच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार अशी घोषणा करत मुंबईतील ६०३ किलोमीटर रस्त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. कारण अतिवृष्टी आणि पुराच्या नुकसानीबाबत सरकार काय निर्णय घेतं, हे दुपारपर्यंत कळेल, अशी शक्यता आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करणार की मदतीबाबत सरकार वेगळा निर्णय घेणार हे पहावं लागेल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलीय, शिवाय राज्यभरातील शेतकरी दिलासा देण्याची मागणी करतायत. आज याबाबत सरकार निवेदन करणार असल्याचं काल दोन्ही सभागृहात सरकारकडून सांगण्यात आलंय.
आज संध्याकाळी महाविकासआघाडी सरकारची बैठक होणार आहे. 5:30- 6:00 अशी बैठकीची वेळ असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्दैवाने दहीहंडी दरम्यान गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १० लाखाची मदत मिळणार, जबर जखमी झालेल्या गोविंदांना साडे सात लाख रुपये मिळणार अशी घोषणा केली होती. घोषणा केल्यानंतर इन्शा्रांस तर्फे 10 लाख देण शकतं नाही. त्यामुळे जखमी गोविंदांना तातडीने मदत द्या. अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. यासोबतच, अजय चौधरी यांनी पण काही गोविंदा जखमी आहेत त्यांना मदत करावी असेही त्यांनी सांगितले.
तसेच, अतोनात शेटलारी वर्गाचं नुकसान झालं आहे. आज पण बरेच लक्षवेधी आहेत. पूरग्रसतांबदल जे काही प्रश्न आहे तर त्या सगळ्या बदल बरीच चर्चा झाली आहे. सगळ्यांचं एकमत नुकसानावर झालं आहे. शेतकरी पुन्हा उभा कसा राहिल याकडे गंभीरतेने लक्ष दिले पाहिजे. आता सरकार यावर काय जाहीर करेल माहित नाही. जे कोणी भूमिका मांडतील त्यावर राईट तू रिप्लाय आहे.
तसेच, आमदारानीं दिलेल्या मागण्यानंवर न्याय कसा मिळेल यावर चर्चा होईल. मेळघाट मध्ये 18 तारखेला जे घडलं त्यावर चर्चा केली आहे. आज त्या चर्चेला आज उद्या वेळ मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.