Maharashtra Rain Update: मुंबईत आज पावसाची शक्यता, मराठवाड्यात जोर ओसरला; जाणून घ्या राज्यातील स्थिती

Mumbai pune Rain IMD Update weather: चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Mumbai Weather: मुंबईत यलो अलर्ट, येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता?
Mumbai Weather: sakal
Updated on

मुंबई- भारतीय हवामान विभागाच्या (India Meteorological Department (IMD))अंदाजानुसार, आज मुंबईमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तसेच, वातावरण ढगाळ राहील. तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होणार आहे.

मुंबई आणि परिसरामध्ये 24 तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नवी मुंबई परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रात्री मुंबई आणि नवी मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. चेंबूर भागात सकाळच्या सुमारात जोरदार सरी बरसल्या.

Mumbai Weather: मुंबईत यलो अलर्ट, येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता?
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाचं पुनरागमन! पुढचे चार दिवस कसा असेल पाऊस?

राज्यात पावसाची स्थिती कशी

हवामान विभागाने आज अनेक राज्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, नागपूर, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.