Maharashtra Rain Updates: कोकणासह 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; जाणून घ्या कशी असेल पुण्यातील परिस्थिती?

Maharashtra, Mumbai, Pune Rain Updates: शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रविवारी सकाळपासूनच संततधार सरी कोसळत होत्या.
Maharashtra, Mumbai, Pune Rain Updates
Maharashtra, Mumbai, Pune Rain UpdatesEsakal
Updated on

पुणे : कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मंगळवारपर्यंत (ता. २७) जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून ‘ॲरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर विदर्भातही पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत असल्याचे दिसून येते. गोव्यासह मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी अत्यंत जोरदार, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. वायव्य मध्यप्रदेश आणि लगतच्या पूर्व राजस्थानामध्ये तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच दक्षिण गुजरात ते दक्षिण केरळ किनारपट्टीलगत वाऱ्याची द्रोणिय रेषा जात आहे. या प्रभावामुळे राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे.

कोकणासह मध्य महाराष्ट्रात सोमवारी (ता. २६) आणि मंगळवारी (ता. २७) ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

या जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. तसेच विदर्भात बहुतांश जिल्ह्यांमध्ये गुरुवार (ता. २९) आणि शुक्रवारपर्यंत (ता. ३०) वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात बऱ्याच ठिकाणी ‘येलो अलर्ट’ दिला आहे.

पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा

पुणे आणि आसपासच्या परिसरात सोमवारी (ता. २६) आकाश सामान्यतः ढगाळ राहून अधून मधून मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर, मंगळवारी (ता. २७) आकाश सामान्यतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

Maharashtra, Mumbai, Pune Rain Updates
Unified Pension Scheme: शिंदे सरकारही राबवणार मोदी सरकारसारखी पेन्शन योजना; राज्यातील कर्मचाऱ्यांनाही मिळणार UPS प्रमाणे लाभ

पुणे शहरातील परिस्थिती

शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रविवारी सकाळपासूनच संततधार सरी कोसळत होत्या. दुपारीही पावसाच्या मध्यम सरी पडत होत्या. त्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची मात्र पावसाने तारांबळ उडाली.

पुणे जिल्ह्यात लोणावळा येथे सायंकाळी साडेपाचपर्यंत ६९.५ मिलिमीटर अशा सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर एनडीए (१३.५), चिंचवड (१२.५), शिवाजीनगर (५.०), हडपसर (३.५), कोरेगाव पार्क (३.०), वडगाव शेरी (२.०) मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Maharashtra, Mumbai, Pune Rain Updates
Cabinet Decisions: उदयनराजेंच्या संरजाम जमिनींना सूट ते कर्मचाऱ्यांच्या बदल्या; मंत्रिंडळाच्या बैठकीतील निर्णय एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.