हिमाचल प्रदेशपासून पश्चिम बंगालपर्यंत आणि ईशान्येपासून ओडिशा व राजस्थानपर्यंत पावसाचा कहर सुरूच आहे. हिमाचल प्रदेशातील सहा जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट असताना सोमवारी मुसळधार पाऊस झाला.
पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून सखल भाग पाण्याखाली गेला आहे. झारखंडमध्येही रेड अलर्ट असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला.
हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गासह 74 रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली असून बद्रीनाथ महामार्गावर शेकडो वाहने अडकली आहेत.
हवामान खात्याने छत्तीसगड आणि मध्य प्रदेशसह किमान 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये येत्या दोन दिवसांत गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.