'९० दिवसांत डबल प्रॉफिट!', बीटकॉईनच्या नावावर एकाला ३८ लाखांना गंडा, मलेशियन ठगबाजाला दिल्लीतून अटक

‘बीट क्वाईन’ (क्रिप्टो करन्सी)मध्ये गुंतवणूक केल्यास ९० दिवसांत दुपट्ट परतावा देण्याची थाप मारून ३८ लाखांनी फसवणूक करणाऱ्या मलेशियन नागरिकाला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली.
Bitcoin
BitcoinSakal
Updated on

Nagpur Bitcoin Fraud: ‘बीट क्वाईन’ (क्रिप्टो करन्सी)मध्ये गुंतवणूक केल्यास ९० दिवसांत दुपट्ट परतावा देण्याची थाप मारून ३८ लाखांनी फसवणूक करणाऱ्या मलेशियन नागरिकाला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. माईल लुसी ऊर्फ बहारुद्दीन बिन मोहम्मद युनुस रा. मलेशिया असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात यापूर्वी नीलेश वासनिक, अभिजित शिरगीरवार दोन्ही रा. नागपूर, शामी जैस्वाल आणि कृष्णा भांडारकर दोन्ही रा. गोंदिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. माईक लुसी या टोळीचा म्होरक्या आहे. त्याने फ्युचर बीट कंपनी स्थापन केली. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी त्याने नागपूर आणि गोंदियातील प्रत्येकी दोन युवकांची नियुक्ती केली.

वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये सेमिनार आयोजित करून लोकांना आमंत्रित केले. सेमिनारमध्ये उपस्थितांना बीट क्वॉइनबाबत माहिती देऊन गुंतवणूकदारांनी त्यांच्या फ्युचर बीट कंपनीच्या माध्यमातून बीट क्वॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास ९० दिवसांत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दिले. त्यासाठी कंपनीच्या वेबसाईटवर भेट देऊन बीट क्वॉईन खरेदी करण्याची प्रक्रिया सांगितली. (Latest Marathi News)

नागरिकांनी बीट क्वॉईन खरेदी करून मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतविल्यानंतर २०१७ मध्ये वेबसाईट बंद करून आरोपी पसार झाला. कुठल्याही प्रकारचा लाभ न देता त्याने गुंतवणूकदारांशी संपर्क तोडला आणि ३८ लाख २६ हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार होता.

Bitcoin
Satyashodhak: महात्मा फुलेंच्या जीवनकार्यावर आधारीत 'सत्यशोधक' सिनेमा टॅक्स फ्री, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

मलेशियात जाण्यापूर्वी विमानतळावर अटक

लुसीच्या शोधासाठी पोलिसांनी देशातील विमानतळासह सर्वत्र परिपत्रक पाठविले. त्यामुळे विमानतळावरील यंत्रणांना यासंदर्भात आधीच सूचना मिळाली होती. लुसी हा दिल्ली विमानतळावरून मलेशियाला जाण्याच्या तयारीत होता. विमानतळ प्राधिकरणाने त्याला ताब्यात घेतले. शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार तसेच गुन्हे शाखेचे उपायुक्त अर्चित चांडक यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक संघर्षी, हवालदार योगेश, नीलेश यांनी दिल्ली जाऊन आरोपीला नागपुरात आणले. न्यायालयाने १२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. (Latest Marathi News)

Bitcoin
Uddhav Thackrey: कायदेशीर लढाईत महत्वाची भूमिका बजावणारे ठाकरेंचे दोन शिलेदार निकालाच्या दिवशी अनुपस्थित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.