Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

देशासह राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे.
Chhagan Bhujbal News
Chhagan Bhujbal News
Updated on

Chhagan Bhujbal News: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या भुजबळ निवास्थानी विश्रांती घेत आहेत. (Maharashtra ncp Chhagan Bhujbal corona tests positive)

मिळालेल्या माहितीनुसार, भुजबळ यांना काल अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. राज्यभरात पुन्हा कोरोना रुग्णांची वाढ होताना दिसत आहे.

Chhagan Bhujbal News
Maharashtra Politics: अखेर पोटातलं ओठावर; 2019 मध्ये नेमकं काय घडलं? तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट

काल भुजबळ येवला दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यावेळी त्यांना येवल्यावरुन नाशिकमध्ये आणलं. नाशिकच्या आपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यावेळी त्यांच्या रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या. त्या रिपोर्टमध्ये कोरोना झाल्याची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

Chhagan Bhujbal News
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब! पोलिसांना धमकीचा फोन, कारण ऐकून बसेल धक्का!

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. रुग्णवाढीचा दर सुमारे तीन टक्के इतका आहे. एच१एन१, एच३एन२ आणि इन्फ्लूएन्झा रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.