NCP New Cabinet Ministers : अजित पवार उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादीच्या 'या' आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

अजित पवारांनी बंड केल्यानं राज्यात नवं राजकीय समीकरण तयार झालं.
NCP New Cabinet Ministers : अजित पवार उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादीच्या 'या' आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
Updated on

मुंबई : अजित पवारांनी बंड केल्यानं राज्यात नवं राजकीय समीकरण तयार झालं. त्यानुसार, अजित पवार यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुसऱ्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरुन राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. (Maharashtra New Cabinet Ajit Pawar DCM and these MLAs of NCP took oath as ministers)

NCP New Cabinet Ministers : अजित पवार उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादीच्या 'या' आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
Ajit Pawar: अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का? राष्ट्रवादीच्या आमदाराच्या विधानानं खळबळ

'या' आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

  1. अजित पवार

  2. छगन भुजबळ

  3. दिलीप वळसे पाटील

  4. हसन मुश्रीफ

  5. धनंजय मुंडे

  6. धर्माराव अत्राम

  7. आदिती तटकरे

  8. संजय बनसोडे

  9. अनिल पाटील

NCP New Cabinet Ministers : अजित पवार उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादीच्या 'या' आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
Ajit Pawar: अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का? राष्ट्रवादीच्या आमदाराच्या विधानानं खळबळ

NCPच्या आमदारांमध्ये 'ही' कॉमन गोष्ट

राष्ट्रवादीच्या ज्या आमदारांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्यामध्ये ईडीच्या कारवाई ही कॉमन गोष्ट आहे. कारवाईच्या भीतीपोटीच या आमदारांनी सरकारसोबत हातमिळवणी केली असल्याचं बोललं जात आहे.

  1. अजित पवार - जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना घोटाळा तसेच राज्य सहकारी बँक घोटाळा

  2. छगन भुजबळ - एक साखर कारखाना आणि ५५ कोटींची जमीन ईडीनं २०१६ मध्ये जप्त केली होती. याप्रकरणी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता.

  3. प्रफुल्ल पटेल - इक्बाल मिर्ची प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांची प्रॉपर्टी जप्त

  4. हसन मुश्रीफ - ३५ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा

  5. धनंजय मुंडे - आपल्याविरोधातही ईडीच्या कारवाईच्या हालचाली सुरु असल्याचं मुंडेंनी म्हटलं होतं.

  6. दिलीप वळसे पाटील - वळसे पाटील यांच्यावरही ईडीचा वॉच आहे.

NCP New Cabinet Ministers : अजित पवार उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादीच्या 'या' आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी माझा व्हिप लागू होणार; आव्हाडांनी दिला थेट इशारा

ईडीची भीती कोणाला? पवारांनी स्वतः सांगितली नाव

आमच्या ज्या आमदारांना ईडीचे प्रॉब्लेम आहेत. त्यामध्ये छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, अजित पवार, नवाब मलिक जे तुरुंगात आहेत, अशी माहिती स्वतः शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.