बाळासाहेबांनाच काय अवघ्या महाराष्ट्राला...; 'दिवाळी पहाट'साठी गौतमीला बोलावल्याने सुषमा अंधारेंचा संताप

शिवसेना शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे तसेच महिला जिल्हा संघटक यांच्यावतीने चिंतामणी चौकात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
Maharashtra news thackeray Sushma Andharana angry for calling Gautami patil for Diwali Pahat in cm shinde thane
Maharashtra news thackeray Sushma Andharana angry for calling Gautami patil for Diwali Pahat in cm shinde thane
Updated on

मुंबई- शिवसेना शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे तसेच महिला जिल्हा संघटक यांच्यावतीने चिंतामणी चौकात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिला निमंत्रित करण्यात आलं होतं. यावरुन विरोधकांनी शिंदे गटावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. ठाण्यामध्ये आज उजाडलेली दिवाळी पहाट ही वंदनीय बाळासाहेबांनाच काय अवघ्या महाराष्ट्राला सुद्धा अपेक्षित नसेल, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. (Maharashtra news thackeray Sushma Andharana angry for calling Gautami patil for Diwali Pahat in cm shinde thane )

Maharashtra news thackeray Sushma Andharana angry for calling Gautami patil for Diwali Pahat in cm shinde thane
Congress : ''पक्षातले काही लोक प्रभू श्रीरामांचा द्वेष करतात'' काँग्रेस नेत्याच्या विधानानंतर आसामचे मुख्यमंत्री म्हणाले...

दिवाळी पहाटनिमित्त आम्ही पं. बिस्मिल्ला साहेबांची सनई पं. भीमसेन जोशी यांचे भक्ती गीत किंवा पद्मजा फेणानी यांचा गोड गळा हे सगळं ऐकून होतो. पण, आता महाराष्ट्रात वेगळाच प्रकार सुरु झाला आहे, असं म्हणत अंधारेंनी हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा याप्रकरणी शिंदे गटावर घणाघात केला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा दिवाळी पहाट लावणी ने साजरी केली गेली. संस्कृती बदलली ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झाले, असं म्हणत आव्हाडांनी टोला लगावला.

Maharashtra news thackeray Sushma Andharana angry for calling Gautami patil for Diwali Pahat in cm shinde thane
Diwali 2023 : ठाणे स्मार्ट नाही, ओव्हर स्मार्ट झालं; दिवाळी पहाटेला गौतमीच्या कार्यक्रमावरून आव्हाडांचा टोला

दरम्यान, दिवाळीनिमित्त राज्यभरात उत्सहाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहेत. दिवाळी पहाट म्हणून संगीताचे कार्यक्रम आयोजन केले जातात. पण, पहिल्यांदाच दिवाळी पहाट म्हणून लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.