मुंबई : आज राज्यात ओमिक्रॉनचे संसर्गाचे (Omicron patients two more patients) 2 रुग्ण आढळले असून हे दोनही रुग्ण औरंगाबाद (Aurangabad) येथील आहेत. यामुळे राज्यात आतापर्यंत नमूद झालेल्या ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 110 झाली (one hundred and ten omicron patients) आहे. यापैकी 57 रुग्णांना त्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह (RTPCR test) आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. (omicron two more patients found in Aurangabad)
आज आढळलेले दोन रुग्ण हे 50 आणि 33 वर्षांचे पुरुष आहेत. यातील एकाने दुबई प्रवास केला आहे तर दुसरा एका आंतरराष्ट्रीय प्रवाशाचा निकटसहवासित आहे. या दोन्ही रुग्णांचे लसीकरण पूर्ण झालेले असून यातील एक लक्षणेविरहित आहे तर दुसऱ्याची लक्षणे सौम्य आहेत. राज्यात आतापर्यंत 729 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 162 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.