Sports : महाराष्ट्राच्या खेळाडूंची गरुडझेप

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा : जलतरणपटू अपेक्षाची सहा पदके
Sports
Sports Sakal
Updated on

भोपाळ- महाराष्ट्राच्या खेळाडूंची खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी शुक्रवारीही कायम राहिली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ५३ सुवर्ण, ५३ रौप्य व ४७ ब्राँझपदकांना गवसणी घातली.

एकूण १५३ पदकांसह महाराष्ट्र पदकतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. हरियानाने (३९, २६, ४८) ११३ पदकांसह दुसरे; तर मध्य प्रदेशने (३५, २५, २६) ८६ पदकांसह तिसरे स्थान पटकावले. महाराष्ट्राची जलतरणपटू अपेक्षा फर्नांडिस हिने सहा पदकांवर नाव कोरले.

जलतरणपटूंच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने या क्रीडा प्रकारातही आपली मोहोर ठसठशीतपणे उमटवली. तलवारबाजी या प्रथमच समावेश करण्यात आलेल्या खेळातही महाराष्ट्राने आपले नाणे खणखणीत वाजवले. या क्रीडा प्रकारात शुक्रवारी महाराष्ट्राने दोन सुवर्णपदकांची कमाई केली.

मुलींच्या विभागात अपेक्षा फर्नांडिसने २०० मीटर वैयक्तिक मिडले शर्यत जिंकताना २ मिनिटे २४.९१ सेकंद अशी वेळ दिली. कर्नाटकाच्या तीन धावपटूंचे आव्हान तिने सहाव्या लेनमधून अगदी सहज पार केले. त्यानंतर अपेक्षाने प्रतीक्षा डांगी, झारा जब्बार, अनन्या नायक यांच्यासह महाराष्ट्राला ४ बाय १०० मीटर मिडले रिले शर्यतीत सुवर्णपदक मिळवून दिले.

महाराष्ट्राच्या चमूने ४ मिनिटे ३०.४२ सेकंद वेळ दिली. अपेक्षाचे हे या स्पर्धेतील पाचवे सुवर्णपदक ठरले. मुलींच्याच २०० मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात महाराष्ट्राच्या चार खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या होत्या. यातून मुंबईच्या पलक जोशीने २ मिनिटे २४.०२ सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदक मिळविले.

ठाण्याची प्रतीक्षा डांगी ब्राँझपदकाची मानकरी ठरली. मुलांच्या ८०० मीटर शर्यतीत वेदांत माधवनचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. वेदांतने ८ मिनिटे ३१.१२ सेकंद वेळ दिली. पण, त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अखेरच्या १५० मीटर मध्ये गुजरातच्या देवांश परमारने त्याला मागे टाकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.