Maharashtra Police Recruitment: ‘‘राज्यात २०२२, २०२३ मध्ये रिक्त झालेली १०० टक्के पदे भरण्यासाठी निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे आगामी काळात पोलिसांच्या आणखी १७ हजार ४७१ जागांवर भरती होणार आहे. ही भरती १० टक्के मराठा आरक्षणासह होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली. विधान परिषद नियम २५९ आणि २६० अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. ‘
‘एप्रिल ते डिसेंबर २०२३ या नऊ महिन्यांतील एकत्रित कालावधीत महाराष्ट्र परकी गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटक, गुजरात, दिल्ली या तिन्ही राज्यांच्या बेरीजे इतकी परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. यापूर्वी २०२२-२३ या कालावधीतही एक लाख १८ हजार ४२२ कोटी रुपयांची गुंतवणूक आपल्याकडे आली होती. त्यामुळे महाराष्ट्र सातत्याने देशात पहिला आहे,’’ असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
गेल्या दोन वर्षांतील तुलना केली तर २०२३ मध्ये ७७ गुन्हे कमी आहेत. राज्यात सध्या ५० सायबर पोलिस ठाणी आणि ५१ सायबर प्रयोगशाळा सुरू आहेत. नवीन राज्यस्तरीय सायबर केंद्र लवकरच सुरू केले जाईल. यासाठी ८०० कोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. त्याशिवाय २० गस्ती नौका खरेदी करण्यासाठी ११७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पोलिसांना समुद्रात पोहण्याचे अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
‘‘माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येची घटना गंभीरच आहे. याप्रकरणी त्यांच्या अंगरक्षकालाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी थांबणार नाही. लोकप्रतिनिधींना धमक्या देणारे दूरध्वनी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,’’ अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. ठाकरे गटाचे मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाइव्हदरम्यानच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राजकीय वर्तृळात एकच खळबळ उडाली होती.
अमली पदार्थांविरोधात कडक कारवाई
पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण एक हजार ८३७ किलो एमडी जप्त करण्यात आला. त्याची किंमत तीन हजार ५८० कोटी रुपये असून, याप्रकरणी दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आठ आरोपींचा शोध सुरू आहे. राज्यातील सर्व रासायनिक कारखान्यांच्या तपासणीची मोहीम हाती घेण्यात येईल, असल्याची माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.