Maharashtra Police: मुंबईतील तरुणाच्या अपहरणाचा डाव उधळून लावण्यात रायगडमधील रसायनी पोलिसांना यश आले आहे. निशांत मोटे (रा. कुलाबा) असे या तरुणाचे नाव असून, त्याचे नवी मुंबईतील तुर्भे येथून माथेरानच्या १० जणांनी अपहरण केले
. मात्र तरुणाच्या नातेवाईकांनी ११२ क्रमांकावर तात्काळ संपर्क साधल्याने पोलिसांनी खालापूर हद्दीत नाकाबंदी करून अपहरणाचा डाव उधळून लावला. हॉटेल व्यवहारातून झालेल्या वादातून हे सोमवारी (ता. ९) रात्री हे अपहरणाचे थरारनाट्य झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
कुलाबा येथील निशांत मोटे याचे माथेरानमधील १० जणांनी तुर्भे येथून अपहरण केले. निशांतला सफेद रंगाच्या कारमधून (एमएच-४६ बीयु ६५५१) माथेरान येथे घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिस महासंचालक (डीजी) कंट्रोल यांच्याकडून अलिबाग येथील रायगड नियंत्रण कक्षाला मिळाली.
रसायनी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शत्रुघ्न माळी यांनी तात्काळ साह्यक आर. कोळेकर, महिला पोलिस वाय. जाधव, सुवर्णा खाडे, प्रीती कांबळे, स्वप्नाली लोटके, चालक एस. डफळ तसेच वाहतूक शाखेकडील एस गडाख, आर धापटे यांना दांडफाटा येथे नाकाबंदीसाठी रवाना केले.
संशयित कार सोमवारी रात्री साडेआठच्या दरम्यान शेडुंग टोलनाका पार करून दांडफाटा येथील नाकाबंदी चुकवून पुढे गेल्याची माहिती मिळाल्याने नाकाबंदीसाठी असलेल्या पोलिसांनी या कारचा पाठलाग केला. नियंत्रण कक्षाने कारचे ठिकाण चौक येथील सीएनजी पंपजवळ असल्याचे सांगितले.
त्यानुसार पोलिसांनी लोधिवली चौक येथील सीएनजी पंपावरून कारचा शोध घेत चालक राज ससाणे (रा. नेरळ पाडा, कर्जत) याला ताब्यात घेतले. तसेच निशांतची सुटका केली. इतर अपहरणकर्ते पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.