'या' दोघांची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदी निवड; बंडखोर आमदाराची Audio Clip व्हायरल

Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisisesakal
Updated on
Summary

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्याचं राजकारण हे सध्या एखाद्या घाटातल्या वळणापेक्षाही जास्त वळणं घेत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गुवाहाटीतल्या हॉटेलमधून ट्विटवर ट्विट करत आहेत. ट्विटवरुन ते थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच (Uddhav Thackeray) चॅलेंज करताना दिसत आहेत.

अशातच आता आमदार शहाजी पाटील (MLA Shahaji Patil) आणि एका कार्यकर्त्यांची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियात (Social Media) चांगलीच व्हायरल झालीय. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचं निशाण ‌फडकावलंय. या बंडामध्ये सांगोल्याचे शहाजी पाटील सहभागी झाले आहेत. एकीकडं शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीला भाजपचं (BJP) पाठबळ आहे, हे एक उघड गुपित असलं तरी याबाबत भाजप समोर येत नाहीय.

Maharashtra Political Crisis
मविआतून बाहेर पडायला तयार, पण..; राऊतांची एकनाथ शिंदेंना अट

तर, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून आपणाला भाजपचं पाठबळ असल्याचं बोललं जात आहे. अशातच शिंदे यांनी देखील आपणाला राष्ट्रीय पक्षाचं पाठबळ असल्याचं मान्य केलंय. त्यातच आता या व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये या बंडखोर आमदारांनी केलेल्या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे यांच्यामध्ये काही आधीच ठरलं आहे का? अशा चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, आमदार पाटील यांच्यासोबत एक कार्यकर्ता फोनवर बोलत असताना पाटील म्हणत आहेत, 'निवडणुकीमुळं माझं घरदार बरबाद झालं. राजकारणाचा मला कंटाळा आलाय. पण, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मला भावा सारखं आहेत. फडणवीस आणि एकनाथ शिंदे असल्यामुळं आपली कामं होतील. मला मंत्रीपदाची अपेक्षा नाहीय, असं त्यांनी स्पष्ट केलंय. आपल्याला या गटात (शिंदे गट) खूप रिस्पेक्ट मिळत आहे. मात्र, आधीच्या सरकारमध्ये कोणी विचारत देखील नव्हतं, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केलीय. आमदार पाटील यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात सध्या चांगलीच व्हायरल झालीय.

Maharashtra Political Crisis
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले..

महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये राहतात की, नाही हे मला माहीत नाही : हिमंता सरमा

ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) म्हणाले, महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये राहतात की, नाही हे मला माहीत नाही. इतर राज्यातील आमदारही आसाममध्ये येऊन राहू शकतात, तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी आपला काहीही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ते पुढं म्हणाले, पर्यटन स्थळ म्हणून आसामची स्वतःची वेगळी ओळख आहे. राज्यात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. ज्यामध्ये कोणीही येऊन राहू शकतं. महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये येऊन हॉटेलमध्ये राहत आहेत की नाही, याबाबत माझ्याकडं कोणतीही माहिती नाही, असंही त्यांनी शेवटी नमूद केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()