Maharashtra Floor Test: सेनेनंतर NCP मध्येही फूट? पाच आमदार राहिले होते गैरहजर

Maharashtra Floor Test Today News
Maharashtra Floor Test Today Newsesakal
Updated on

विधानसभेचं अध्यक्षपद जिंकत शिंदे-भाजपा सरकारने मोठा विजय मिळवला आहे. आता त्यांची दुसरी कसोटी आज विधानसभेत लागणार आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुट पडल्याची चर्चा रंगली आहे.(Maharashtra Floor Test Today News)

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रविवारी झालेल्या सभापती निवडणुकीच्या मतदानात राष्ट्रवादीचे पाच आमदार गैरहजर होते. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षात मोठे वादळ येऊ शकते असे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.(Sharad Pawar News)

Maharashtra Floor Test Today News
भगतसिंगाच्या फाशीनंतर ब्रिटीशांना आनंद झाला तसा...; सामनातून राज्यपालांवर टीका

राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी केवळ 46 आमदारच सभापतीपदाच्या मतदानात भाग घेण्यासाठी विधानभवनात पोहोचू शकले. यातील नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात आहेत. (Maharashtra Floor Test Today)

तर, दत्तात्रेय भरणे, बबन शिंदे, नीलेश लंके, दिलीप मोहिते आणि अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे पाच आमदार रविवारी मतदानात सहभागी झाले नव्हते. तसेच मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनीही मतदान केले नाही.

Maharashtra Floor Test Today News
ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? राऊतांचा शिंदे गटाला टोला

मतदान प्रक्रियेदरम्यान गैरहजर राहणारे यातील बहुतांश आमदार हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करायचा होता. अशातच काही आमदार मतदानाला उपस्थित न राहिल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

भरणे यांनी 1 जुलै रोजी त्यांची आई गिरिजाबाई गमावल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले. मोहिते आणि बनसोडे विधानभवनात उशिरा पोहोचल्याने त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ दिले नाही. लंके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अशी कारणे पाच आमदार गैरहजर असण्यामागे देण्यात आली.

Maharashtra Floor Test Today News
सेनेला झटका! वाटाघाटी करायला गेलेले फाटकही गेले शिंदे गटात

राज्यात नवं शिंदे सरकार स्थापन झालं. काल राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठी लढाई जिंकली. नुकतीच विधानसभा अध्यक्ष निवडणुक पार पडली. या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर निवडून आले आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी आता सुरु झाली आहे. शिंदे गटाच्या बंडखोर ३९ आमदारांपैकी १५ जणांना मंत्रिपदे मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.