एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आलं. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. बुधवारी उशीरा रात्री ठाकरेंनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्त केला. त्यानंतर दुसऱ्यादिवशी म्हणजेच आज खासदार संजय राऊत यांनी बंडखोर नेत्यांवर हल्लाबोल चढवला.
माध्यामांशी संवाद साधताना राऊत यांनी, ठाकरेंचा घात केला आता माझ्याकडे बोट का दाखवता? असा सवाल उपस्थित केला. आणि एक दिवस आधी चहा घेतला , गुवाहाटीत गेल्यावर माझ्यावर टीका केली. अशी खंत संजय राऊतांनी व्यक्त केली. (Sanjay Raut on Rebel MLA's)
पुढे म्हणाले, दगाबाजी करायची मग कारण कशाला देता. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना वचन दिल होत. आणि महाराष्ट्राच्या हितासाठी संजय राऊत झटले. त्यामुळे मला जबाबदार धरणार आहात तर धरा.
तुम्ही काय करणार आहात. तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार आहात का ? की तुमचा नेता मुख्यमंत्री होणार आहे ? असा सवाल उपस्थित करत तुम्हाला आता धुणी भांडीच करावी लागणार आहेत. अशा शब्दात राऊतांनी बंडखोर आमदारांवर हल्लाबोल चढवला.
उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्द्वारे जनतेशी संवादादरम्यान हा मोठा निर्णय घेतला. यापार्श्वभूमिवर राऊत यांनी भाष्य केलं. ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यांना कशाप्रकारे राजीनामा द्यावा लागला हे ठाकरेंनी अत्यंत सयंमी भाषेत जनतेला सांगीतले. आपल्याच लोकांनी दगाबाजी केली त्यामुळे खुर्चीला चिटकून राहण्यात अर्थ नव्हता. ठाकरेंनी कधीही सत्तेची लालसा नव्हती. पवारांच्या विनंतीमुळे ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्विकारलं होता. असे राऊत यांनी यावेळी सांगितलं.
तुम्ही स्वाभिमानाची मीठ भाकरी सोडून जी चाकरी करत आहात. त्याचा तुम्हाला भविष्यात पश्चाताप होईल. एकनाथ शिंदे हे कडले शिवसैनिक. अनेक वर्ष त्यांनी सेनेसाठी काम केलंय. शिंदेंसोबत गुलाब राव पाटील असतील. असे अनेक नेते आहेत ज्यांनी सेनेसाठी काम केलं आहे. पक्षासाठी त्यांनी संघर्ष केला आहे. त्यांनी आता वेगळा मार्ग स्विकारला आहे. त्यामुळं दोष देण्यात अर्थ नाही. असे राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.
बाळासाहेबांची सेना संपवण्याचा प्रयत्न करु नये. महाराष्ट्राच्या हितासाठी काम कराव. सरकार पाडण्याच कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालं. असे सांगत नवीन सरकार पडाव म्हणून मी कोणतेही प्रयत्न करणार नाही. असेदेखील राऊतांनी यावेळी सांगितलं.
शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही, शिवसेनेसाठी सत्ता जन्माला आली आहे. हा बाळासाहेब ठाकरेंचा नेहमीच मंत्र राहिला आहे. आम्ही पुन्हा स्वबळावर काम करू आणि सत्तेत येऊ. असा प्रबळ विश्वासदेखील राऊतांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.