Maharashtra Political News : सातपुते अन् तनपुरे या आमदारांमध्ये रंगलयं त्या ट्विटमुळे वाकयुद्ध

Political News
Political Newsesakal
Updated on

राहुरी : "आमदार प्राजक्त तनपुरेंच्या आशिर्वादानेच हिंदूंचं जबरदस्तीने धर्मांतर सुरु आहे?" असा प्रश्नार्थक आरोप आमदार राम सातपुते यांनी ट्विटरद्वारे केला. त्यावर "आमदार सातपुते यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. हिंदुत्वाच्या आडून सुपाऱ्या घेऊन अधिकाऱ्यांवर दबाव, दडपशाही करणं आमचा स्वभाव नाही." अशा शब्दात आमदार तनपुरे यांनी समाचार घेतल्याने वाकयुद्ध रंगले आहे.

Political News
Eknath Shinde : खोक्यांच्या चौकशीसाठी तयार, आमची केवळ...; संदीपान भूमरेंनी राऊतांना सुनावलं

ट्विटची चर्चा...

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ब्राह्मणी (ता. राहुरी) येथील धर्मांतराच्या दाखल गुन्ह्यातील तपासात दिरंगाई झाल्याचा ठपका ठेवून माळशिरसचे (जि. सोलापूर) आमदार सातपुते यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित केली. त्यावेळी राहुरीचे आमदार तनपुरे अनुपस्थित होते. या प्रश्नावर प्रभारी गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस निरीक्षक दराडे यांची पंधरा दिवसांत चौकशी करून, त्यांना तात्काळ जिल्हा मुख्यालयात बदली करण्याचे आदेश दिले.

राहुरीत या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. दराडे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना जनतेत पसरली. त्यांची तडकाफडकी केलेली बदली रद्द करावी. या मागणीसाठी राहुरीतील सचिन साळवे व पिंटू साळवे या तरुणांनी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.

हेही वाचा: Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

शनिवारी (ता. 24) सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नगर-मनमाड रस्ता रोको आंदोलन केले. हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त भाग घेतला. आमदार तनपुरे अग्रभागी राहिले. राज्यभर आंदोलनाचा गवगवा झाला. त्यावर आमदार सातपुते यांचे पित्त खवळले. त्यांनी ट्विटरद्वारे हल्लाबोल केला. "आज राहुरीत ख्रिश्चन मिशनऱ्यांचा हस्तक पी.आय. दराडेंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरेंच्या नेतृत्वात मोर्चा काढला. आमदार तनपुरेंच्या आशिर्वादानेच हिंदूंचं जबरदस्तीने धर्मांतर सुरु आहे? तनपुरे लक्षात ठेवा, भविष्यात तुमचा हिशोब हिंदू नक्की चुकता करतील." असे ट्विट केले.

आमदार राम सातपुते यांनी केलेले ट्विट.
आमदार राम सातपुते यांनी केलेले ट्विट. esakal
Political News
Devendra Fadanvis: 'देवेंद्र फडणवीसजी, जास्त बोलाल तर उपमुख्यमंत्रीपदही जाईल', भाजप नेत्याचा घरचा आहेर

त्यावर बोलताना आमदार तनपुरे संतापले. "आमदार सातपुते यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. हिंदुत्वाच्या आडून सुपाऱ्या घेऊन अधिकाऱ्यांवर दबाव, दडपशाही करणं आमचा स्वभाव नाही. आम्ही देखील खरे हिंदू आहोत. सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आम्ही वेळ देतो. दुसऱ्या कुठल्यातरी जिल्ह्यातील एखाद्या अधिकाऱ्यावर कुणाच्या तरी सांगण्यावरून हिंदुत्वाच्या आडून दबाव टाकण्याचे फालतू काम आम्ही करीत नाही. माझ्या मतदारसंघातील जनतेने २५ हजारांच्या फरकाने निवडून दिलं आहे. मी सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन, सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतो." असा राग व्यक्त केला.

एकमेकांच्या विरुद्ध तीव्र शब्दात आरोप- प्रत्यारोप करणारे दोन्ही आमदार सोमवारी (ता. 26) नागपूर अधिवेशनात पुन्हा विषय उकरून काढणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.