Maharashtra Politics : बदललेल्या राजकीय समीकरणांचा अंदाज घेण्यासाठी येणाऱ्या या निवडणुकांवर सर्व पक्षांचे लक्ष

Maharashtra Politics
Maharashtra Politics sakal
Updated on

राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे, पक्षांचे झालेले विभाजन व त्यामुळे पक्ष नेतृत्वात झालेला बदल या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महाड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरणार आहेत. राज्‍यातील सत्तांतराचे पडसाद या निवडणुकांवर पडण्याची शक्‍यता असल्‍याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

महाड विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व राहिल्याने भरत गोगावले तीन वेळा आमदार झाले आहेत. माजी आमदार काँग्रेसचे माणिक जगताप यांचे निधन झाल्यानंतर त्यांची राजकीय जबाबदारी कन्या स्नेहल जगताप यांच्यावर येऊन पडली. गोगावले यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांनी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार हा गट वेगळा झाला आणि महाडमधील राजकीय समीकरणे पुन्हा बदलली आहेत.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: राज्यात भाजपला मोठा धक्का; 5 निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा विजय!

आमदार गोगावले व अदिती तटकरे यांचा पालकमंत्री पदावरून वाद, आमदार माणिक जगताप व तटकरे गटातील राजकीय वाद, स्नेहल जगताप यांचा उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश व त्यांना मिळत असलेले माजी खासदार अनंत गीते यांचे पाठबळ, गीते व गोगावले यातील मतभेद या सर्वांची प्रचिती ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये दिसणार आहे.

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढण्याची चिन्हे आहेत. पक्ष विभाजनामध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी झाल्याने विविध पक्षाचे अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने गाव पातळीवर देखील पक्षाने चाचपणी सुरू केली आहे. महाडमध्ये आमदार गोगावले यांचे प्राबल्य असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. आधीच्या काही ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेला महाविकास आघाडीचा फॉर्मुला अजित पवार गटाच्या विभाजनामुळे या वेळी बारगळणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गावामध्ये राजकीय ताकद असलेल्या उमेदवाराच्या शोधात विविध पक्षाचे प्रतिनिधी दिसताहेत.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: ना मंत्रिपद, ना पालकमंत्रिपद, Eknath Shinde यांचा पठ्ठ्या नाराज, वेगळी वाट धरणार?

गावपातळीवर चाचपणी

महाड तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दृष्टीने तसेच विधानसभेचा मागोवा घेण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार गोगावले यांच्या गटाने मोठे यश मिळवले होते. आमदार गोगावले यांचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी गाव पातळीवर सर्व पक्ष एकत्र येतात की काय, याची चाचपणी सुरू आहे. शिंदे गट, ठाकरे गट, अजित पवार गट, शरद पवार गट या गटबाजीमुळे मतदार कोणाला स्वीकारणार, याकडे भविष्यातील राजकीय समीकरणे निश्चित होणार आहेत.

महाडमधील या ग्रामपंचायतीत निवडणुका

चांढवे खुर्द, चांढवे बुद्रुक, घुरूपकोंड, किंजळोली खुर्द, काचले, कोंडीवते, कोतुर्डे, नांदगाव खुर्द, नेराव, पडवी, रावढळ, राजेवाडी शेल, किये, चापगाव, बावले मांगरूण, तळोशी, तेलंगे, तेलंगे मोहल्ला व टोळ बुद्रुक

Maharashtra Politics
Maharastra Politics : अजितदादांमुळे अहमदनगर जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.