राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दु:ख आहे, यात कोणतेही सुख नाही. हे पद माझ्यासाठी योग्य नाही. अशी खंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (Bhagat Singh Koshyari Said I Am Unhappy After Becoming Governor )
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कायम आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्योतिबा फुलेंबाबत केलेल्या विधानामुळे कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर रोज टीका होतीय. त्यांनी पदावर हटवण्याची मागण होतीय. दरम्यान, त्यांनी त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली आहे.
काय म्हणाले कोश्यारी?
राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दु:ख आहे, यात कोणतेही सुख नाही. हे पद माझ्यासाठी योग्य नाही. कधी कधी मला वाटतं की मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे. परंतू मी ८० वर्षांचा झालो, त्यामुळे मी आता मुमुक्षरत्न नाही बनू शकत. मात्र, जेव्हा सन्यांसी आणि मुमुक्षरत्न राजभवनात येतात, तेव्हा मला आनंद होतो”, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली.
शुक्रवारी राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात जैन समाजाला संबोधित करताना ते बोलत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.