मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार असल्याची चर्चा सुरु आहे. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीकडे रवाना झाल्याचं वृत्त आहे. नंतर उपमुख्यमंत्री अजित पवारही दिल्ली जाणार आहेत. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे. त्यामुळं दिल्लीत काहीतरी महत्वाच्या राजकीय घडामोडी सुरु असल्याची चर्चा आहे. (Maharashtra Politics Cabinet expansion and Portfolio Fadnavis leave for Delhi Ajit pawar will also go)
काल रात्री खातेवाटपा संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीला अजितदादा, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उपस्थित होते. सोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. या बैठकीत अर्थ सोडून इतर सर्व खाते वाटप निश्चित करण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण अर्थ खात्यासंदर्भात निर्णय आज होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
या बैठकीत झालेली चर्चा दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींना कळवली जाईल आणि तिथून होकार आल्यानंतर ताबडतोब खाते वाटप जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे, अशी माहितीही सुत्रांकडून कळते आहे. यामध्ये काही शिवसेनेची आणि काही भाजपची खाती राष्ट्रवादीला देण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Marathi Tajya Batmya)
याचसाठी फडणवीस दिल्लीकडे रवाना झाले आहेत तर अजितदादा संध्याकाळी सहा नंतर दिल्लीकडे रवाना होतील. पण यामुळं आजच मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप होईल की नाही याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.